{2024} जाहिरात लेखन मराठी 8वी, 9वी, 10वी | Jahirat Lekhan in Marathi

Jahirat Lekhan in Marathi: या लेखामध्ये आपण जाहिरात म्हणजे काय आणि मराठी जाहिरात लेखन कसे आणि का केले जाते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याच एक प्रभावी माध्यम म्हणजेच जाहिरात होय. जाहिरात ही एक उत्तम कला व शस्त्र आहे.

परीक्षेमध्ये प्रश्न क्र. ५ (अ) मध्ये विचारल्या जाणार्‍या तीन लेखन प्रकारापैकी हा एक प्रकार आहे. यासाठी तुम्हाला ५ गुण दिले जातात.

अनेकदा जाहिरातीचे युग, जाहिरात एक कला, जाहिरातीचे महत्व अश्या विविध प्रकारे जाहिरात लेखन निबंध देखील परीक्षेमध्ये विचारला जातो.

त्यामुळे Jahirat Lekhan in Marathi हा एक महत्वाचा प्रश्न म्हटले तरी त्यात काही चुकीच नाही.

आज आपण एक आकर्षक जाहिरात लेखन कसे करावे हे अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत.

Table of Contents

जाहिरात म्हणजे काय? | What is Jahirat Lekhan in Marathi

ग्राहक आणि उत्पादक या मधला एक महत्वाचा दुवा म्हणजेच जाहिरात होय.

जाहिरात हे एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. रेल्वेस्टेशन, चित्रपट, बस, टीव्ही सगळीकडेच आपल्याला जाहिराती पहायला मिळतात.

एकूणच, या जाहिरातींनी संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे.

या जाहिराती का बरं केल्या जातात? काय हेतु असतो या जाहिरातींमध्ये?

एखादी गोष्ट पुन्हा-पुन्हा आपल्या कानावर पडते आणि मग कळत नकळत ती गोष्ट म्हणजेच ते प्रॉडक्ट आपल्या मनावर बिंबत. त्यामुळे अर्थातच ते आपल्या परिचयाच होऊन जातं.

हे लक्षात घेऊन याच मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून ही जाहिरात केली जाते.

आजच्या या स्पर्धेच्या युगात जाहिरात खूपच महत्वाची ठरते.

आपले प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसे चांगले व वेगळे आहे हे या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले जाते.

मराठी जाहिरात लेखन कसे लिहावे? |Jahirat Lekhan in Marathi

Credit ~ Arts And Edu.

जाहिरात लेखन करताना खलील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. | How to write Jahirat Lekhan in Marathi:

  1. जाहिरात तयार करताना मथळा (Headings) उपमथळा (Sub-Headings) तयार करावा.(म्हणी किंवा वाक्प्रचार वापरुन तुम्ही मथळा आकर्षक बनवू शकता)
  2. लयबद्ध शब्दरचना जाहिरात अधिक आकर्षक बनवते.
  3. जाहिरात लेखन लिहताना शब्दमर्यादा ५० ते ६० इतकीच असावी. (६ गुण आहेत म्हणून संपूर्ण पेज लिहावा असे गरजेचे नाही). तुम्ही जाहिरात किती आकर्षिक लिहता याकडे भर दिला जातो.
  4. जाहिरातीची भाषा साधी, सोपी, पण वेधक असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल. (प्रॉडक्टचे नाव ठळक अक्षरात लिहावे).
  5. शब्दरचना किचकट व बुद्धीला ताण द्यायला लावणारी नसावी.
  6. विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम. (जाहिरात वाचून जर समोरच्या चेहर्‍यावर थोड हसू येत असेल तर त्या व्यक्तिला तुमच्या जाहिरातीमध्ये अधिक रुचि वाटेल. त्यामुळे तुम्ही एखादी विनोदी ओळ तुमच्या जाहिरातीमध्ये लिहू शकता).
  7. प्रॉडक्टची चार-पाच वैशिष्टे असणे गरजेचे.
  8. जाहिरात लिहताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा. (स्थळ, काळ आणि वेळ, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आयडी जाहिरातीमध्ये असावे).
  9. जाहिरात लेखनाला मिळणारे गुण पुर्णपणे तुम्ही जाहिरात आकर्षक कशी लिहता यावर अवलंबून असते . (जास्त मोठे- मोठे चित्र काढणे टाळावे).
  10. जाहिरात पेननेच लिहावी, पेन्सिलने नाही.

जाहिरात लेखन मराठी 8वी, 9वी, 10 वी |Jahirat Lekhan in Marathi 10th Class

Marathi Language Jahirat Lekhan in Marathi – जाहिरात लेखनासाठी कृतिपत्रिकेत तुम्हाला खालीलप्रमाणे कोणत्याही प्रकारची कृती जाईल.

  1. दिलेल्या विषयावरून जाहिरात लेखन करणे – यामध्ये तुम्हाला एखादा विषय दिला जाईल त्यावरून तुम्हाला जाहिरात लेखन करावे लागते. उदा., साबणाची जाहिरात (Jahirat Lekhan in Marathi on Soap), पेन ची जाहिरात तयार करा.
  2. दिलेल्या जाहिरातीवरील कृती सोडवणे – तुम्हाला पहिल्यापासूनच एक जाहिरात दिली जाईल आणि त्यानुसार काही प्रश्न दिले जातील ते तुम्हाला सोडवणे गरजेचे आहे.
  3. दिलेल्या शब्दांवरून जाहिरात लेखन करावे – या कृतीमध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले असतात आणि तेच शब्द वापरुन तुम्हाला जाहिरात लेखन करावे लागते.
  4. दिलेल्या जाहिराती अधिक आकर्षक स्वरुपात लिहणे – या कृतीमध्ये तुम्हाला एखादी जाहिरात अगदी सोप्या पद्धतीत दिलेली असते. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करून ती जाहिरात आकर्षक बनवावी लागते.

दिलेले मराठी जाहिरात लेखन Marathi Jahirat Lekhan नमुने हे इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

Jahirat Lekhan in Marathi 10th Class, Jahirat Lekhan in Marathi 9th Class, Jahirat Lekhan in Marathi 8th Class साठी विविध जाहिरातींमध्ये वापरता येतील असे काही शब्द व वाक्ये:

  • शुद्धतेची कमी किमतीत कमी
  • ग्राहकांचे समाधान हाच आमचा आनंद
  • ग्राहकांचे समाधान हाच आमचा नफा
  • ना नफा ना तोटा ,अनुभव हीच खात्री
  • अवश्य भेट द्या ,घरपोच सुविधा
  • बालक, महिला, अपंगांसाठी विशेष सोय
  • एकदा वापरुन खात्री करा , ऑर्डरप्रमाणे घरपोच सुविधा
  • भव्य सूट, एक घ्या एक मोफत मिळवा
  • भव्य प्रदर्शन व विक्री

जाहिरात लेखन मराठी छत्री रेनकोट पाऊस |Jahirat Lekhan in Marathi Chatri Raincoat Paus

जाहिरात लेखन मराठी 10 वी: छत्री, रेनकोट, पाऊस या शब्दांपासून जाहिरात लेखन करा.

Jahirat Lekan Marathi 
      
      पावसाळा आला | तयारी ठेवा |
        छत्री हवी | रेनकोट हवा ||

     विकास छत्री आणि रेनकोट 
  एकच विश्वसनीय आणि दर्जेदार ब्रँड...

* सुबक, टिकाऊ *आकर्षक, विविध रंगांत 
* पुरुष, स्त्रिया व मुलांसाठी * ५० वर्षे अग्रेसर 


         विकास छत्री व रेनकोट 

आजच खरेदी करा, पावसाचे स्वागत करा..
                
                सर्वत्र उपलब्ध 

  पत्ता - स्वामी रोड, पुणे ४३२३४२
  ईमेल - vikaschatri@gmail.com  
  संपर्क - ९८xxxxxxxx 
                                                                              
        नियम व अटी लागू..

पहा: सरावासाठी आणखी काही छत्री, रेनकोट, पाऊस जाहिरात नमुने


जाहिरात लेखन आईस्क्रीम पार्लर |Jahirat Lekhan in Marathi ice cream Parlour

जाहिरात लेखन विषय – आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करा.

जाहिरात लेखन मराठी 10 वी 

          प्रचंड होतोय उकाडा 
        आईस्क्रीम खा थंड थंड...!

      आस्वाद आईसक्रीम पार्लर 

       आमच्या येथे उपलब्ध प्रकार:
                                            
           * मलाई आईस्क्रीम
           * चिकू   * आंबा
           * चॉक्लेट * अननस 
           * ड्रायफ्रूट्स इ. 

२००/- रुपयांच्या आईस्क्रीम खरेदीवर 
२ चॉक्लेट कोन अगदी मोफत

                 त्वरा करा..
आजच आस्वाद आईस्कीमला भेट द्या.
            संधीचा लाभ घ्या.


पत्ता - आस्वाद आईस्क्रीम पार्लर, वरळी नाका, मुंबई ४०००६८ 
ईमेल - aaswadicecream@gmail.com  
संपर्क - ९७xxxxxxxx

पहा: सरावासाठी 5+ आईस्क्रीम पार्लर जाहिरात नमुने | Jahirat Lekhan in Marathi ice cream Parlour


जाहिरात लेखन बेकरी |Jahirat lekhan in marathi 10th class bekri

विषय – बेकरी जाहिरात लेखन मराठी (jahirat lekhan bakery cake specialist ice cream taaje padarth grahak samadhan)

खालील शब्दांवरून जाहिरात करा. (बेकरी, केक स्पेशलिस्ट,आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान)

Jahirat Lekan Marathi

       एकच ध्यान, ग्राहकांचे समाधान 
   ताजे आणि खमंग पदार्थांची मेजवानी 

                       
               बेकर्स पॉइंट 

शहरातील एकमेव केक आणि आईसक्रीम स्पेशलिस्ट...


    *चॉक्लेट केक *स्ट्रॉबेरी केक 
    *रसमलाई केक *मॅंगो केक
    *फोटो केक *अननस केक 

       ऑनलाईन सुविधा उपलब्ध 


वेळ: सकाळी ७:०० ते रात्री १०:०० 


आमचा पत्ता- गाळा नं. १५, वाशी ४००xxx
ईमेल - bakerspoint@gmail.com 
संपर्क - ९७xxxxxxxx

जाहिरात लेखन दिवाळी |Jahirat Lekhan in Marathi Diwali

विषय (Jahirat Lekhan Diwali Farar) – दिवाळी फराळ विक्रेते

 जाहिरात लेखन मराठी 9वी 

              || शुभ दिपावली ||


चिवडा अन् कारंजीचा खमंग स्वाद घेवूया, 
लाडू अन् चकलीसोबत दिवाळीचा आस्वाद घेवूया


      अन्नपूर्णा दिवाळी फराळ 
                                     
          एक खमंग अनुभव....


  *चकली *शेव *शकरपाळी *करंजी
  *चिवडा *बेसन लाडू *अनारसे      


  घरगुती खमंग, खुसखुशीत फराळ मिळेल.
  घरपोच डिलिव्हरी सुद्धा मिळेल.
 परदेशात फराळ पाठवण्याची सोय.


   १०००/- रु खरेदीवर आकर्षक भेट 
 
          आजच ऑर्डर करा...


पत्ता - समर्थ अपार्टमेंट, मीरा कॉलनी, सांगली ५६
ईमेल - annapurnadiwali@gmail.com
संपर्क - ८७xxxxxxxx

मोबाईल जाहिरात लेखन मराठी |Jahirat Lekhan Marathi Mobile

जाहिरात लेखन विषय – Mobile Jahirat Lekhan in Marathi

Jahirat Lekan Marathi

     खुशखबर! खुशखबर! खुशखबर!


            राज मोबाइल शॉप 


आपण आपला जुना फोन वापरुन कंटाळलात?
आपला मोबाइल खूप स्लो चालत आहे?

                        
             स्वप्न खरे ठरेल....

              बंपर ऑफर 

   (१ ते २६ जानेवारी ३०% सवलत)

         आमचे विशेष आकर्षण 

       *खात्रीशीर मोबाईल दुरूस्ती
       *कमीत कमी दुरूस्ती खर्च
       *रिपेयरिंग फक्त १ तासात 


 वेळ: सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत 

पत्ता - राज मोबाईल शॉप, पुणे ५३
ईमेल - rajmobileshop@gmail.com
संपर्क - ८७xxxxxxxx

पहा: सरावासाठी आणखी काही मोबाईल जाहिरात नमुने | Mobile Jahirat Lekhan in Marathi


जाहिरात लेखन अलका ड्रेसेस | Jahirat Lekhan in Marathi 10th Class Alka Dresses

जाहिरात लेखन मराठी 9वी  

            सेल!  सेल!  सेल! 


तुमच्या मुलांसाठी स्मार्ट गणवेश शोधत आहात?

            आजच भेट द्या..


             अलका ड्रेसेस 

 उत्तम दर्जा - परवडणारी किंमत 
 
    सर्व शाळांचे गणवेश उपलब्ध.. 

       आमची खास वैशिष्ट्ये:
    *न चुरगळणारे दर्जेदार कापड
    *शेवटपर्यंत चमकदार राहणारे रंग
    *कधीही न उसवणारी शिलाई 
    *तंतोतंत मापाचे कपडे

      २ गणवेशावर २०% सवलत 

  सवलत दि. १५ जून ते २५ पर्यंत फक्त 


पत्ता: अलका ड्रेसेस, नाशिक ४२२१०१ 
ईमेल - contact@alkadresses.com 
संपर्क - ९०xxxxxxxx

जाहिरात लेखन मराठी प्लास्टिक बंदी | Jahirat Lekhan Plastic Bandi

Jahirat Lekan in Marathi 10th Class 

प्लास्टिक वर बंदी - उत्तम आरोग्याची संधी 


           कागदी पिशव्या 

प्लास्टिक हटवा - पर्यावरण वाचवा 


स्वस्त, सुंदर, टिकाऊ, विविध आकाराच्या 
       कागदी पिशव्या उपलब्ध 

          आजच खरेदी करा!

      ५० पिशव्यांवर २०% सूट 

सर्व प्रकारचे ऑनलाइन ऑर्डर स्वीकारले जातील. 


संपर्क- युनिक स्टेशनरी, लिंक रोड, ठाणे ४३
संपर्क - ०२२ xxxxxx

जाहिरात लेखन पुस्तक | Jahirat Lekhan Pustak

जाहिरात लेखन मराठी 10 वी 

एक-एक अक्षर शिकूया, द्यानाचा डोंगर चढूया.


        मनोहर पुस्तक प्रदर्शन 

  जीवनात असतो पुस्तकांचा मेल 
  प्रदर्शनात असतो त्यांचा खेळ  


  या या पुस्तक प्रदर्शनाला या 
  आपल्या आवडीचं पुस्तक घ्या..

    प्रदर्शनाची विशेषता:
*विविध विषयांवरील पुस्तके
*मुलांसाठी आवडत्या गोष्टींची,
प्रयोगांची, कोड्यांची पुस्तके 
*छोटयांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन 
*नामवंत साहित्यिकांची पुस्तके उपलब्ध 
*वाचण्यासाठी सोय 


 ५ पुस्तकांच्या खरेदीवर १ पुस्तक मोफत 

    कालावधी - १ ते १५ ऑगस्ट २०२३ 
   वेळ - संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत 


स्थळ - नेहरू विद्यालय मैदान, दादर (प) 
संपर्क- ७७xxxxxxxx

मास्क जाहिरात मराठी | Mask Chi Jahirat Marathi

Jahirat Lekan Marathi
 
     खुशखबर! खुशखबर! खुशखबर!

आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्क मिळण्याचे एकमेव ठिकाण..

       संजीवनी मास्क सेंटर 

     वैशिष्ट्ये:
 *विविध रंगात व आकारात उपलब्ध 
 *सर्जिकल, कॉटन अशा अनेक प्रकारामध्ये
 *होलसेल ऑर्डर 

     ५० मास्क खरेदीवर ५% सवलत
 
वेळ - सकाळी १०:०० ते संध्याकाळी १०:०० पर्यंत 

ठिकाण - संभाजी मैदान, गोखले मार्ग, ठाणे (प.)
संपर्क - ६८xxxxxxxx

जाहिरात लेखन व्यायामशाळा | Jahirat Lekhan Vyayam Shala

जाहिरात लेखन नमुना 

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे 'व्यायाम'!

  मा. मोहन माने यांची व्यायामशाळा 
योगासने व व्यायाम हीच आयुष्याची गुरुकिल्ली..

       वैशिष्ट्ये -
       *नि:शुल्क रजिस्ट्रेशन 
       *आधुनिक सामग्री 
       *तज्ञ प्रशिक्षक
       *वातानुकूलित प्रशस्त जागा 
       *सोईस्कर वेळ 

   वेळ - सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत 

पत्ता- यशवंत व्यायामशाळा, मारुती रोड, दादर (पू.)
ईमेल - yashwantfitness@yahoo.in 
संपर्क - xxxxxxxxx

केस तेलाची जाहिरात | Jahirat Lekhan in Marathi on Hair Oil

जाहिरात लेखन नमुना मराठी pdf 

केसांची वाढ करणारे एकमेव तेल...

केश राजा तेल 

खास आवळा, ब्राम्ही वापरुन बनवलेले 
शुद्ध केश राजा तेल 

वैशिष्ट्ये -
*केस गळती थांबते 
*केसांची वाढ पटापट होते
*चमकदार केस 

आता नवीन पॅक फक्त 30 रु. मध्ये 

सर्व मेडिकल आणि जनरल स्टोअर मध्ये उपलब्ध  

हे देखील पहा:

FAQs: Jahirat Lekhan in Marathi Pdf

जाहिरात लेखन पुस्तक, जाहिरात लेखन मराठी 9वी बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न खालीलप्रमाणे:

जाहिरात लेखन कसे करावे ते सांगा?

जाहिरातीची भाषा साधी, सोपी, पण वेधक असावी. शब्दमर्यादा ५० ते ६० इतकीच असावी.

जाहिरातीचे प्रकार किती?

जाहिरातीचे मुख्यत: दोन प्रकार पडतात. वर्गीकृत आणि प्रदर्शनीय.

जाहिरात म्हणजे काय ते सांगून जाहिरातीचे घटक स्पष्ट करा?

ग्राहक आणि उत्पादक या मधला एक महत्वाचा दुवा म्हणजेच जाहिरात होय. आपले प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसे चांगले व वेगळे आहे हे या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले जाते.

निष्कर्ष: Marathi Jahirat Lekhan

आम्ही आशा करतो की विद्यार्थ्यांना मराठी जाहिरात लेखनाचे Marathi Jahirat Lekhan नमुने आवडले असतील.

मराठी जाहिरात लेखन Marathi Language Jahirat Lekhan in Marathi ही एक कला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे.

mpscmarathi.com वर अनेक प्रकारचे मराठी जाहिरात लेखन नमुने उपलब्ध आहेत ज्यांचा सराव करून तुम्ही जाहिरात लेखनाची कला विकसित करू शकता आणि आकर्षक Marathi Jahirat Lekhan करू शकता.

तर Jahirat Lekhan in Marathi या विषयावरचा आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला तसेच इतर कोणत्याही विषयावर तुम्हाला जाहिरात बनवून हवी असेल तर मला खाली कमेन्ट करून कळवा.

1 thought on “{2024} जाहिरात लेखन मराठी 8वी, 9वी, 10वी | Jahirat Lekhan in Marathi”

  1. ऑइल मिल आणि धान्य सफाई केंद्र यांची जाहिरात करायची आहे

    Reply

Leave a Comment