वाक्य आणि वाक्यांचे प्रकार | vakyache prakar in marathi

नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या लेखामध्ये आपण मराठी व्याकरणातील वाक्य आणि वाक्याचे प्रकार | vakyache prakar in marathi या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

स्पर्धा परिक्षेमध्ये अनेकदा ‘वाक्य प्रकार ओळखा‘ हा प्रश्न विचारला जातो त्यामुळे आज आपण अगदी सोप्या भाषेत Vakyache Prakar in Marathi Grammer शिकणार आहोत.

वाक्य म्हणजे काय? | Marathi Vakya

अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य होय. प्रत्येक वाक्य हे शब्दांचे बनलेले असते.

वाक्यात केवल शब्दाची रचना करून चालत नाही तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते.

वाक्याचा अर्थ स्पष्ट कळण्याकरीता वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) परस्परांशी संबंध काय हे कळणे महत्वाचे असते.

प्रत्येक वाक्यात कर्ता आणि क्रियापद हे महत्वपूर्ण भाग मानले जातात. जर क्रियापद सकर्मक असेल तर त्या वाक्यातील कर्म हे तिसरा महत्वाचा भाग मानला जातो.

या तीन शब्दांबरोबरच वाक्यामध्ये विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये आणि विधानपूरक इत्यादि शब्द येतात.

वाक्यात येणार्‍या प्रत्येक शब्दाचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडलेला असतो. वाक्यातील या शब्दांच्या संबंधातून आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो.

शिका >> मराठी जाहिरात लेखन

वाक्याचे प्रकार व उदाहरणे | Vakyache Prakar in Marathi

marathi vakya

वाक्याचे प्रकार पाहताना मराठीत वाक्याचे प्रमुख दोन प्रकार तसेच एकूण 12 प्रकार पडतात.

Vakyache Prakar in Marathi Class 10, Vakyache Prakar in Marathi Class 9, Vakyache Prakar in Marathi Std 8 सर्व इयत्तेसाठी उपयुक्त वाक्याचे प्रकार व उदाहरणे:

अर्थावरून पडणारे प्रकार | Vakyache Prakar in Marathi Class 10

1. विधानार्थी वाक्य मराठी (Vidhanarthi Vakya in Marathi)

ज्या वाक्यात कर्त्याने केवल विधान केलेले असते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

विधानार्थी वाक्य उदाहरण:

  • मी खेळतो.
  • रिया काम करते.
  • मी वाचतो.

2. प्रश्नार्थी वाक्य – ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो, त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

उदा.

  • तू काय काम करतेस?
  • कोण आहे मैदानात?

3. उद्गारार्थी वाक्य (Udgararthi Vakya in Marathi) –

ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात, त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

उदा.

  • अबब! केवढा मोठा साप.
  • शाब्बास! शेवटी तुझा पहिला नंबर आलाच.

4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात.

उदा.

  • मला जेवण करायला आवडते.
  • मला डॉक्टर व्हायचे आहे.

5. नकारार्थी वाक्य – ज्या वाक्यातून स्पष्टपणे नकार दर्शवला जातो, त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

  • मला मासे आवडत नाही.
  • आई कधी आराम करत नाही.

विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार | Vakyache Prakar in Marathi Class 9

#1. केवल वाक्य (Keval Vakya)- ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते, त्यास केवल वाक्य असे म्हणतात.

उदा: Keval Vakya Examples in Marathi

  • रमेश जेवण करतो.
  • समीर क्रिकेट खेळतो.

#2. संयुक्त वाक्य – जेव्हा एका वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, त्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणतात.

उदा:

  • मी मदद केली तसे सर्व काम संपले.
  • शाळा सुटली आणि राम घरी आला.

#3. मिश्र वाक्य – जेव्हा वाक्यातील एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ही उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, त्या वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात.

उदा: Mishra Vakya Examples in Marathi

  • पुढे नोकरी लागावी म्हणून तो शहरात आला.
  • आईने हाक मारली म्हणून सीमा घरी आली.

क्रियापदाच्या रूपावरुन पडणारे प्रकार | Vakyache Prakar in Marathi Std 8

1. स्वार्थी वाक्य – ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

स्वार्थी वाक्य उदाहरण मराठी:

  • मुले शाळेत गेली,
  • खेळाडू मैदानावर सराव करतात.

2. आज्ञार्थी वाक्य (Adnyarthi Vakya in Marathi) –

ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इ. गोष्टींचा बोध होतो, अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

उदा:

  • कृपया शांत बसा. (विनंती)
  • देवा सर्वांना सुखी ठेव. (प्रार्थना)
  • तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. (आशीर्वाद)
  • कृपया, मला तुझे पुस्तक दे. (विनंती)
  • विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. (उपदेश)

3. विध्यर्थी वाक्य – ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.

उदा:

  • परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्य)
  • आज बहुतेक पाऊस पडेल. (शक्यता)
  • अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. (योग्यता)

4. संकेतार्थी वाक्य – जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थ वाक्य म्हणतात

संकेतार्थी वाक्य उदाहरण मराठी:

  • जर गाडी मिळाली तर वेळेवर पोहोचलो असतो.
  • जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

आपण काय शिकलो?

विद्यार्थ्यांना आता मराठी वाक्याचे प्रकार नक्कीच समजले असतील अशी मला खात्री आहे.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या वर्ग मित्रांना नक्कीच शेअर करा जेणेकरू त्यांनाही Vakyache Prakar in Marathi Grammer समजण्यास मदद होईल.

तुम्हाला अजूनही काही शंका असल्यास खाली कमेन्ट करून कळवा.

पुढे वाचा:

  • वाक्प्रचार मराठी | Vakprachar in Marathi
  • अव्यय मराठी | Avyay in Marathi
  • शब्दांच्या जाती | Shabdanchya Jati
  • समास मराठी | Samas in Marathi
  • 100+ विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd
  • विरामचिन्हे मराठी | Viram Chinh in Marathi

वाक्य म्हणजे काय व्याख्या लिहा?

संपूर्ण अर्थ व्यक्त करणार्‍या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात.

वाक्याचे प्रकार किती?

मराठीत वाक्याचे एकूण 12 प्रकार पडतात.

स्वार्थी वाक्य म्हणजे काय?

वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर ते स्वार्थी वाक्य होय.

संयुक्त वाक्य म्हणजे काय?

जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment