पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी |Marathi Essay on Pustakache Atmavrutta

Marathi Essay on Pustakache Atmavrutta: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी. हा एक कल्पनाप्रधान निबंध प्रकार आहे.

तुम्ही Marathi Essay on Pustakache Atmavrutta in English हा निबंध तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक Marathi Nibandh उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी

Credit ~ Learn With Jeevan

Marathi Essay on Pustakache Atmavrutta 200 Words

मित्रानो ! मी एक पुस्तक बोलतोय. होय, खरंच एक पुस्तक बोलतोय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल की, एक पुस्तक कसं काय बोलायला लागले? परंतु आजच्या हरवत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मी माझे महत्व आणि माझी उपस्थिती याबद्दल लोकांना सांगण्यासाठी आज बोलायला आले.

मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्या साठी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्या मध्ये सामावलेल्या कित्तेक माहितीचा, ज्ञानाचा संग्रह आहे. माझ्या मध्ये लिहिलेले ज्ञाश हे मर्यादित आहे जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

पुस्तक म्हणून मी माहिती संग्रहित करण्याचे अतिशय उपयुक्त साधन आहे. म्हणूनच माझ्यामध्ये कित्येक पाने जोडलेले असतात व या सर्व पानांचा मिळून मी एक पुस्तक बनतो. माझे ज्ञान लोकांना सहजरीत्या प्राप्त व्हावे याकरिता मला मोठमोठ्या ग्रंथालयांमध्ये संग्रहित करून ठेवले जाते.

माझ्यामुळेच आपल्यातील बहुतांशी लोक शिक्षित झालेले आहे तर काही लोकांनी माझ्यातील ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती केली आहे. मी पुस्तक माझ्यामुळेच लोकांना इतिहासाची माहिती झाली. माझ्या मुळेचं लोकांना आपल्या भारत देशाचा इतिहास माहिती झाला, भूगोल माहिती झाला.

परंतु आजच्या काळातील लोकांसाठी माझे महत्व कमी होत चालले आहे त्यांना पुस्तक म्हणजे केवळ कंटाळवाणे वाटत आहे. आपल्या देशाचा जसजशी प्रगती होत गेली देशांमध्ये नवीन तंत्रज्ञान उदयास आले त्यामध्ये मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप अशा साधनांची निर्मिती झाली. त्यामुळे लोक आज मला पूर्णताचा विसरलेले आहेत. त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर ते मोबाईल चा वापर करून माहिती सहज रित्या उपलब्ध करून घेत आहेत.

परंतु आज जे लोक विसरतात आहे ते मोबाईल आणि कॉम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचन मिळवलेले ज्ञान आणि माहिती जीवनामध्ये कायमस्वरूपी त्यांच्या लक्ष्यात राहते हे आजच्या लोकांना जमत ठाऊकच नाही. परंतु तुम्ही हे विसरता कामा नये की, तुम्हाला जीवनामध्ये एखादे ध्येय साध्य करायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता पुस्तकाचा सहारा घ्यावा लागेल

शेवटी सांगायचे एवढेच की, पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत. पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे इतर कोठेही मिळत नाही त्यामुळे पुस्तके तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

इतर महत्वाचे निबंध >>

  • फुलाचे आत्मवृत्त निबंध | Fulache Atmavrutta Nibandh
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Shetkaryache Atmavrutta
  • सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Sainikache Atmavrutta

निष्कर्ष: Marathi Essay on Pustakache Atmavrutta

तर विद्यार्थ्यांनो हा होता पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध. आम्हाला आशा आहे की Marathi Essay on Pustakache Atmavrutta तुम्हाला आवडला असेल.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, Marathi Essay on Pustakache Atmavrutta PDF किंवा इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment