5+ माझा आवडता छंद निबंध |Majha Avadta Chhand Nibandh

Majha Avadta Chhand Nibandh: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझा आवडता छंद खो खो निबंध. हा एक वर्णनात्मक निबंध प्रकार आहे.

तुम्ही हा निबंध तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक माझा आवडता छंद निबंध उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

माझा आवडता छंद निबंध विषय | Majha Avadta Chhand

  1. माझा आवडता छंद चित्रकला | Maza Avadta Chand Chitrakala
  2. माझा आवडता छंद नृत्य | Maza Avadta Chand Marathi Nibandh Dance
  3. माझा आवडता छंद क्रिकेट निबंध | Maza Avadta Chand Cricket
  4. माझा आवडता छंद सायकल चालवणे | Maza Avadta Chand Cycling
  5. माझा आवडता छंद वाचन | Maza Avadta Chand Vachan
  6. माझा आवडता छंद पोहणे | Maza Avadta Chand Pohane Nibandh
  7. माझा आवडता छंद फूटबॉल | Maza Avadta Chand Football

माझा आवडता छंद खो खो निबंध

Majha Avadta Chhand Nibandh Kho Kho

Credit ~ Shining Students Youtube Channel

मला खेळायला खूप आवडते. खेळल्यामुळे माझे शरीर तंदुरुस्त राहते. तसे पाहता आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. जसे क्रिकेट, कबड्डी, हॉकी, फूटबॉल, टेबल टेनिस इत्यादि. पण या सर्वांमध्ये मला खो खो हा खेळ खूप आवडतो. एक प्रकारे हा माझा छंदच आहे.

खो खो हा पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. कोणत्याही साधनांशिवाय खेळला जाणार हा खेळ शरीरसाठी अत्यंत लाभदायी आहे. मी माझ्या मित्रांसोबत हा खेळ खेळतो.

खो खो खेळासाठी दोन संघांची आवश्यकता असते. या खेळात प्रत्यक्ष मैदानात नऊ खेळाडू आणि राखीव तीन असे एकूण बारा खेळाडू असतात. दोन बाजूला दोन खांब रोवून हा खेळ खेळला जातो. या दोन खांबांच्या मध्ये पाठलाग करणार्‍या संघाचे आठ खेळाडू बसलेले असतात आणि एक खेळाडू विरोधी संघातील खेळाडूंना शिवण्यासाठी धावणार असतो.

विरोधी संघातील खेळाडूंना पकडणारा खेळाडू आपल्या संघातील खेळाडूंच्या पाठीवर हात लावून ‘खो’ बोलतो. मग खो मिळालेला खेळाडू आता पकडण्यासाठी धावतो. विरोधी खेळाडूला शिवल्यास तो बाद होतो आणि संघाला गुण मिळतो. अशा प्रकारे ज्या संघाचे जास्त गुण तो संघ विजयी ठरतो. यामध्ये दोन्ही संघांना पाठलाग व बचाव करण्यासाठी संधि मिळते.

माझा आवडता छंद खो खो आहे. माझ्या शाळेत खो-खो चे उत्तम प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे मी या खेळात तरबेज झालो आहे. मला या खेळातच माझी कारकीर्दी घडवायची आहे. या खेळाचे नियम अत्यंत सोपे आहेत. तसेच या खेळामुळे रोगप्रतिकारक शक्ती व चपळता वाढते.

हा खेळ खेळल्याने मी खूप उत्साही व आनंदी राहतो. म्हणून माझा आवडता छंद Majha Avadta Chhand Nibandh खो खो आहे.

निष्कर्ष: Majha Avadta Chhand Nibandh

तर विद्यार्थ्यांनो हा होता माझा आवडता छंद खो खो निबंध. आम्हाला आशा आहे की Majha Avadta Chhand Kho Kho निबंध तुम्हाला आवडला असेल.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment