7+ माझा आवडता छंद मराठी निबंध |Maza Avadta Chand Essay in Marathi

Maza Avadta Chand Essay in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझा आवडता छंद मराठी निबंध. हा एक वर्णनात्मक निबंध प्रकार आहे.

तुम्ही हा निबंध तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक Marathi Nibandh उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

माझा आवडता छंद मराठी निबंध

मित्रांनो, Maza Avadta Chand Essay in Marathi विषयावर विविध निबंध खाली दिले आहेत. यापैकी तुमच्या आवडीच्या विषयावर मराठी निबंध माझा आवडता छंद लिहू शकता.

  1. माझा आवडता छंद चित्रकला | Maza Avadta Chand Chitrakala
  2. माझा आवडता छंद नृत्य | Maza Avadta Chand Marathi Nibandh Dance
  3. माझा आवडता छंद क्रिकेट निबंध | Maza Avadta Chand Cricket
  4. माझा आवडता छंद सायकल चालवणे | Maza Avadta Chand Cycling
  5. माझा आवडता छंद खो खो | Maza Avadta Chand Kho Kho
  6. माझा आवडता छंद वाचन | Maza Avadta Chand Vachan
  7. माझा आवडता छंद पोहणे | Maza Avadta Chand Pohane Nibandh
  8. माझा आवडता छंद फूटबॉल | Maza Avadta Chand Football

माझा आवडता छंद वाचन | Maza Avadta Chand Nibandh 2 Page

Credit ~ Shining Students Youtube

Maza Avadta Chand Essay in Marathi 200 Words

एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला आवडणे म्हणजे छंद. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो आणि प्रत्येकजण तो छंद जोपासतो आपली आवडती गोष्ट करण्यात आपल्याला आनंद मिळतो, ती गोष्ट आपण तासंतास करू शकतो, त्यालाच छंद असे म्हणतात.

लहानपणी मला बऱ्याच गोष्टी आवडायच्या जसे- खेळ खेळणे, T.V. बघणे, चित्र काढणे, गायन करणे, हया गोष्टी करतांना मला फार आनंद व्हायचा, मजा यायची.

एके दिवशी माझ्या वडिलांनी मला एक गोष्टीचे पुस्तक आणून दिले आणि मी ते पुस्तक वाचले. पुस्तकातील गोष्टी वाचतांना मला जो आनंद झाला तो मी या आधी कधी अनुभवला नव्हता. हळूहळू मी आणखी पुस्तके वाचू लागलो. माझी आवड लक्षात घेता माझे आई-वडिल मला वेगवेगळी पुस्तके आणून देवू लागले. माझ्या या आवडीचे छंदात रूपांतर झाले. म्हणूनच आज माझा आवडता छंद वाचन Maza Avadta Chand Vachan आहे.

वाचनामुळे माझे अनेक फायदे झाले आहेत. माझी स्मरणशक्ती वाढली आहे याचा मला शालेय अभ्यासात भरपूर फायदा झाला आहे. वाचनाची आवड असल्यामुळे मी माझी सगळी पुस्तके आधीच वाचून टाकली आहेत.

वाचनामुळे मला अनेक क्षेत्रातील गोष्टींचे ज्ञान आहे. इतिहास, विज्ञान, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, मनोरंजन, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील पुस्तके मी वाचली आहेत. नित्य वाचन केल्याने माझे ज्ञान वाढत आहे. इतिहास, विज्ञान, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, मनोरंजन, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील पुस्तके मी वाचली आहेत. नित्यवाचन केल्याने माझे ज्ञान वाढत आहे.

मी माझा छंद जोपासण्यासाठी कधी वाचनालयातून पुस्तका आणतो किंवा इंटरनेटच्या साहयाने नवीन- नवीन माहितीचे वाचन करतो.

माझ्या मते ज्या व्यक्तिला वाचनाचा छंद आहे असा व्यक्ति आयुष्यात कधी ही एकटा पडू शकणार नाही कारण पुस्तके ही एक चांगली मित्र असतात. आजच्या या विज्ञान युगामध्ये स्वतःच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी वाचनाचा छंद फार उपयुक्त आहे.

माझा आवडता छंद सायकल चालवणे

Maza Avadta Chand Essay in Marathi

माझा आवडता छंद सायकल चालवणे हा आहे. सायकल हा एक जीवनाचा अत्यंत महत्वाचा असा साधन आहे जे मानवी शरीर व स्वास्थासाठी उपयुक्त आहे. मी माझी सायकल रोज स्वच्छ पुसून ठेवतो आणि तिची निगा राखतो.

सायकल चालवल्याने आनंद आणि आत्मसंतुष्टी वाढते. सायकल हे एक आरोग्याकरक वाहन असून वाहनांच्या तुलनेत सर्वांत आधुनिक मानले जाते.

सायकल विविध फायदे देणारे एक आरोग्याकरक साधन आहे. मानसिक तणावात सायकल चालवणे फायदेशीर ठरते. इतर वाहनांसारखे सायकल ला पेट्रोल डीजल ची गरज भासत नाही त्यामुळे प्रदूषण होत नाही व आपले पर्यावरण स्वच्छ राहते.

आजच्या धावपळीच्या दिवसात सायकल माणसाला एक उपयोगी सोबती आहे. सायकलमध्ये चालवण्याचा आनंद व जोडण अत्यंत अनुभवणीय असतो. कोणतेही दूरचे काम कमी वेळेत पूर्ण करता येते.

लहान उद्योगधंधे करणार्‍यांना सायकल खूप उपयोगी पडत आहे. कित्येक प्रवाशी लांबची सफर सायकलवरच करतात. रहदारीचे नियम पाळून सायकल चालवणे महत्वाचे आहे.

सायकल चालवण्याचे असे अनेक विविध फायदे आहेत त्यामुळे माझा आवडता छंद सायकल चालवणे हा आहे.

माझा आवडता छंद क्रिकेट निबंध

Maza Avadta Chand Marathi Nibandh Cricket |Maza Avadta Chand Essay in Marathi

मला खेळायला खूप आवडते. खेळल्यामुळे माझे शरीर तंदुरुस्त राहते. तसे पाहता आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, वॉलीबॉल, फूटबॉल, खो खो, कबड्डी इत्यादि. पण या सर्वांमध्ये मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो. एक प्रकारे हा माझा छंदच आहे.

छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आपल्याला खूप आनंद वाटतो. शरीर व मनाला आनंद देण्यासाठी विविध छंद जोपासले जातात.

आज भारतात क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मी रोज संध्याकाळी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात जातो. क्रिकेट मध्ये एका टिम मध्ये एकूण 11 खेळाडू असतात. क्रिकेट खेळण्यासाठी बॅट बॉलची आवश्यकता असते.

क्रिकेट खेळल्याने शरीर स्वछ आणि मजबूत बनते. तसेच शरीराची प्रतिरोधक क्षमता देखील वाढते. याविरुद्ध अनेक मानसिक फायदे होतात.

क्रिकेट खेळल्यामुळे माझे अभ्यासात चित्त लागते. क्रिकेटमुळे एकाग्रता वाढते व वाचलेले लक्षात ठेवायला मदत होते. त्यामुळे माझा आवडता छंद क्रिकेट हा आहे.

मी कायम क्रिकेट खेळत राहीन आणि सर्वांना आवाहन करेन की त्यांनीही क्रिकेट खेळण्याचा छंद जोपासावा.

माझा आवडता छंद पोहणे

Maza Avadta Chand Pohane Nibandh | Maza Avadta Chand Essay in Marathi

रोजच्या कामातून मनाला विरंगुळा मिळावाअसे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी वेळातवेळ काढून माणूस आपला छंद जोपासत असतो. आपण आवडीने, मनापासून, आनंदाने ज्या ज्या गोष्टी करतो त्यांना छंद म्हणता येईल.

प्रत्येकाचा छंद निरनिराळा असतो. कोणाला व्यायाम करायला आवडते तर कोणाला दूर फिरायला जायला आवडते. कोणी चित्र काढून आनंद मिळवतो तर कोणी गाणी ऐकून. कोणाला कशाचा छंद असेल याचा काही नेम नाही.

मला लहानपणापासून पोहण्याचा खूप आवड आहे. त्यामुळे माझा आवडता छंद पोहणे हा आहे. मी पाच वर्षांचा असतांना माझ्या बाबांनी मला पोहायला शिकवले. जवळच्या स्वीमिंग पुलमध्ये ते मला पोहायला घेऊन जात असत. सुरुवातीला मला पाण्यात उडी मारायला खूप भीती वाटायची. नाकातोंडात पाणी गेले की नको ते पोहणे असे वाटायचे. पण मला पोहायला शिकवायचेच असा बाबांनी निश्चय केला होता.

काही महिन्यातच मी पोहायला शिकलो. आता मी धरणात, नदीत, पाटावर आणि समुद्रात देखील मनसोक्तपणे पोहतो. पाण्यात वेगवेगळ्या प्रकारे सूर मारतो.

मित्रांसोबत पोहण्याची मजा काही वेगळीच असते. पोहताना आम्ही वेगवेगळे खेळ देखील खेळतो. पाण्यात उलटे पोहणे, जास्त वेळ पाण्यावर तरंगणे अशा वेगाने पोहणे अशा शर्यती लावतो.

पोहणे हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. महत्वाचे म्हणजे हा व्यायाम करताना कंटाळा येत नाही उलट मज्जाच येते. पोहण्याच्या शर्यतीत मी नेहमी पहिला येतो. आता मी इतरांना देखील पोहायला शिकवतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडच्या विहिरीत आणि नदीत तर मी कितीतरी वेळ पोहत असतो.पोहण्याचा मोह मला आवरत नाही. अशाप्रकारे पोहण्याचा छंद मला खूप खूप आनंद देतो.

निष्कर्ष: Maza Avadta Chand Essay in Marathi

तर विद्यार्थ्यांनो हे होते विविध विषयावर माझा आवडता छंद मराठी निबंध. आम्हाला आशा आहे की Maza Avadta Chand Essay in Marathi तुम्हाला आवडले असतील.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment