माझी भारत भूमी मराठी निबंध |Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language: विद्यार्थ्यांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझी भारत भूमी मराठी निबंध. हा एक वैचारिक निबंध प्रकार आहे.

तुम्ही Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi निबंध तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक marathi nibandh उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

माझी भारत भूमी मराठी निबंध | Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language

Credit ~ My Perfect Words Youtube Channel

‘सुजलाम, सुफलाम, मलयज शीतलाम
सस्यशामलाम, मातरम, वंदे मातरम ||’

असे ज्या भूमीचे वर्णन केले आहे, ती भारत भूमी माझी मातृभूमी आहे. माझ्या भारतमातेला फार मोठी वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक मोठे राजे, सम्राट येथे होऊन गेले. या प्राचीन देशाची संस्कृतीही महान आहे. आजही या संस्कृतीचे महात्म्य जगात शिरोधार्य मानले जाते.

भारत हा वीरांचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मेवाडचा राजा प्रताप सिंह अशा वीरांना आजही कोणी विसरू शकत नाही. त्या प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी, ज्ञानभूमी होती. जगातील वेगवेगळ्या देशांतून माणसे येथे ज्ञान संपादन करण्यास येत होती. याचा उल्लेख अनेक चिनी प्रवाशांनी आपल्या लेखनात केला आहे.

प्राचीन काळी तत्वज्ञान, अध्यात्म यांची भूमी म्हणून माझ्या भारत भूमीला ओळखले जायचे. आजही जगातून अनेक विद्वान लोक भारतात अभ्यास करायला येतात. याबरोबरच आयुर्वेद, गणित आणि विज्ञानातील अनेक संकल्पना भारताने जगाला दिल्या आहेत. निसर्गही माझ्या भारत भूमीवर प्रसन्न आहे.

गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादि नद्यांनी भारतभूमी सुजलाम केली आहे. त्यामुळे येथे सृष्टीची विविध रुपे पाहायला मिळतात. भव्य हिमालय आम्हापुढे उदात्ततेचा व महानतेचा आदर्शच उभा करतो.

माझ्या भारतभूमीच्या तिन्ही बाजूंना महासागर पसरलेला आहे. सागर हा अथांग आहे. रत्नांचे आगर आहे. असा हा सर्वसमावेशक सागर आमच्या मनाला विशालता देतो.

भारत भूमी ही वृक्ष, पाने, फुले व फळे याच्या दृष्टीने समृद्ध आहे. ही विविधता भारत भूमीतील सर्व माणसांत आहे.

भिन्न भाषा, धर्म, पंथ आणि भिन्न विचार यांनी माझ्या भारत भूमीची संस्कृती सजलेली आहे. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे.

भारतीय संस्कृती म्हणजे सहस्त्र पाकळ्यांचे कमळच जणू!

भारतात विविध भाषा बोलल्या जातात आणि या भाषांतील साहित्यही समृद्ध आहे. संस्कृत भाषा ही आमची प्राचीन भाषा आहे. या भाषेत रामायण, महाभारत यांसारखे महान ग्रंथ लिहिले गेले आहेत. भागवतगीता आजही जगाला मार्गदर्शक ठरत आहे.

भारतभूच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची कहाणीही जगाला स्फूर्तिदायक आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला अनेक नैसर्गिक संकटांना आणि परकीय आक्रमनाना तोंड त्यावे लागले. तरीही भारत अखंड राहिला. भारतात हरित क्रांति, श्वेत क्रांति आणि औद्योगिक क्रांति झाली. कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहिला नाही.

आजच्या संगणकाच्या युगातही भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणू शकतो की माझी भारत भूमी ही स्वर्गपेक्षाही श्रेष्ठ आहे.

इतर महत्वाचे निबंध >>

निष्कर्ष: माझी भारत भूमी मराठी निबंध

तर विद्यार्थ्यांनो हा होता Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language निबंध. आम्हाला आशा आहे की माझी भारत भूमी मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल.

तुम्ही Mazi Bharat Bhumi Essay in Marathi Language हा निबंध ‘माझी मातृभूमी निबंध‘, ‘माझी मायभूमी निबंध‘ या विषयांवर देखील लिहू शकता.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment