Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi: आज आपण ‘माझ्या स्वप्नातील भारत निबंध‘ या विषयावर निबंधलेखन करणार आहोत.
खरतर देश म्हटलं तर त्याला भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ हा असतोच. भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलेला असतो. जस की चुका, सुधारणा, चांगल्या-वाईट आठवणी आणि अस बरच काही.
देशाच्या इतिहासकडे निरखून पाहताना उद्याचे भविष्य त्या इतिहासापेक्षा अजरामर व्हावं हेच स्वप्नं प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात असत.
चला तर मग आपण सुरुवात करूया… माझ्या स्वप्नातील भारत निबंध! (Majhya Swapnatil Bharat Nibandh)
माझ्या स्वप्नातील भारत कविता |Mazya Swapnatil Bharat Charoli in Marathi
माझ्या स्वप्नातील भारत निबंध लिहताना विद्यार्थ्यांनी खालील कवितेचा वापर करावा जेणेकर निबंध अजून चांगला होईल परिणामी तुम्हाला चांगले गुण मिळतील.
माझ्या स्वप्नातील भारत कविता:
ज्या भूमीवर स्वातंत्र्यसाठी बलिदान केले लाखोंनी,
ज्या भूमीवर जन्म घेतला महान पराक्रमी थोर पुरुषांनी ||
ज्या राष्ट्रात होत नाही विदेशींवर द्वेष,
तो आहे माझा भारत देश ||
ज्या भूमीने घेतली शिवरायांची शिकवण,
त्यांच्या पदस्पर्शाने झाली ही भूमी पावन ||
ज्या पुण्यभूमीच्या सत्य पुरुषाने परभावले लंकेश,
तो आहे माझा भारत देश ||
ज्या राष्ट्रात आहेत विविध प्रांत भाषा आणि धर्म,
ज्या देशात लोकांचे ध्येय असते चांगले कर्म ||
ज्या देशात महान मानला जातो संतांचा उपदेश,
तो आहे माझा हा भारत देश ||
माझ्या स्वप्नातील भारत निबंध 300 शब्द |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
Majhya Swapnatil Bharat Nibandh for Class 8 to 12
“जिथे शेतकरी, सैनिक व स्त्रीयांना आदराचे स्थान असेल,
श्रीमंतीचे गुणगान नसून खर्या अर्थाने माणुसकीचे गुणगान असेल!
जातियता, धर्मीयता, भ्रष्टाचार, अंधश्रद्धेचे नाव नसेल,
असा माझ्या स्वप्नातील भारत विकसित असेल!”
गेल्या शतकांपासून भारत देशाने बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुसामाजिक या सार्याच वर्तुळामध्ये स्थिर प्रगती केली आहे.
आपला भारत देश त्याच्या प्राचीन इतिहासासाठी आणि विविधतेत असलेल्या एकटेसाठी ओळखला जातो.
मला माझ्या भारताचा अभिमान आहे. मी माझ्या स्वप्नातील भारताला एक महान राष्ट्र बनवण्याची कल्पना करतो.
आधीच्या काळात भारताला ‘सोने की चिडिया’ नावाने ओळखले जायचे. परंतु वर्तमान काळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे. |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
माझ्या स्वप्नातील भारत चित्र असे असेल जेथे सर्व लोक सुख, शांती, व प्रेमाने राहतील. जिथे प्रत्येक नागरिक साक्षरतेच्या छत्रछायेखाली विसावेल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
हा भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. जिथे द्यान फक्त रोजगार किंवा नोकरीपर्यंत मर्यादित नसेल.
जे नागरिक लहानपणी शिक्षण घेऊ शकले नाहीत त्यांना प्रौढ शिक्षणाद्वारे साक्षर बनवण्याची जबाबदारी घेतली जाईल. प्रत्येक नागरिक सुखी-समाधानी राहील. हीच माझ्या स्वप्नातील भारताची खरी प्रगती ठरेल.
“स्वप्न मनीषा पूर्णत्वास जाऊन मिळावी
भारत देशा स्वनुभूती होऊन यावी”
माझ्या भारत देशात वैद्यानीक विविध महत्वपूर्ण शोधत मग्न असतील. असे महान शोध लावले जातील ज्याने सारे विश्व चक्क होईल. देशात निरंतर प्रगती आणि विकास साधले जातील.
माझ्या स्वप्नातील भारतात स्त्री-पुरुष दोघांना समान भाव दिला जाईल. भ्रष्टाचार नसेल. कोणावरही अन्याय होणार नाही.|Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे
दे वरचि असा दे..
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे
मतभेद नसू दे..”
असा भारत जिथे एकमेकांना कमी न लेखले जावे. जिथे सर्व जाती, धर्म, पंथ यांच्यात भेदभाव असू नये. जिथे सर्वांना समान न्याय, हक्क मिळावेत.
प्रत्येक भारतीयाला भारतीय असल्याचा अभिमान असेल अशा भारताचे स्वप्न मी पाहतो.
जिथे स्त्रियांचा आदर ही पहिली शिकवण दिली जाईल. कोणीही गरीबांना कमी लेखणार नाही आणि सर्वधर्मिक लोक आनंदाने सुखी समाधानी राहतील. (भविष्यातील भारत निबंध मराठी)
माझ्या भारताला आदर्श देश मानले जाईल. जिथे प्रत्येक परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य नीटनीटके असेल. सुस्वच्छतेचे उच्च प्रमाण राखण्यात येईल. पाण्याची कमतरता नसेल आणि रोगराईचे प्रश्न दूर केले जातील.
माझ्या स्वप्नातील भारतात सर्वांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. जिथे उच्च न नीच याची तुलना केली जाणार नाही.
तंत्रद्यानाणे परिपूर्ण असलेला भारत, सुसंस्कृतीने संस्कारक्षम असलेला भारत, जैविक शेतीने भरभराटीस आलेला भारत, सुशिक्षित तरुणांच्या बळाने जगात स्वत:च प्रबळ स्थान निर्माण करणार्या भारताचे स्वप्न मी पाहतो.
जातीपातीच्या विचारांना आहुती देवून प्रगतीकडे वाटचाल करणारा भारत, अभ्यास आणि योग्य दिशेने वाट दाखवणारा, पर्यावरणपूरक, निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला भारत पहायचाय मला!
माझ्या स्वप्नातील भारत उभा राहण्यासाठी एक क्रांतीपर्व पेटवले पाहिजे! एक साहित्यिक चळवळ उभी राहिली पाहिजे. देशप्रेमाची लाट जनसमुदायात पसरली पाहिजे. |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
कृषि क्रांति, मानवक्रांती, अध्यात्म ओळख, शैक्षणिक प्रगती, खेळ, पर्यावरण समतोल या सर्व गोष्टींचा मेळ एक होऊन माझा भारताला या जागाच प्रतिनिधीत्व करताना मला पाहायचाय!
हे देखील वाचा:
- माझा देश निबंध |Maza Desh Marathi Nibandh
- माझा देश महान निबंध |Maza Desh Mahan Nibandh
- माझ्या स्वप्नातील भारत भाषण |Majhya Swapnatil Bharat Bhashan
माझ्या स्वप्नातील भारत निबंध २ |Majhya Swapnatil Bharat Nibandh
Mazya Swapnatil Bharat Nibandh for Class 1 to 7
“जिथे शेतकरी, सैनिक व स्त्रीयांना आदराचे स्थान असेल,
श्रीमंतीचे गुणगान नसून खर्या अर्थाने माणुसकीचे गुणगान असेल!
जातियता, धर्मीयता, भ्रष्टाचार, अंधश्रद्धेचे नाव नसेल,
असा माझ्या स्वप्नातील भारत विकसित असेल!”
आपल्या भारतीय संविधानात न्याय, समता, बंधुता या मूल्यांचा समावेश केलेला आहे. आपले भारतीय संविधान हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
मला माझ्या भारताचा अभिमान आहे. मी माझ्या स्वप्नातील भारताला एक महान राष्ट्र बनवण्याची कल्पना करतो.
माझ्या स्वप्नातील भारत असा असेल जेथे सर्व लोक सुख, शांती, व प्रेमाने राहतील. हा भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
आधीच्या काळात भारताला ‘सोने की चिडिया’ नावाने ओळखले जायचे. परंतु वर्तमान काळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे.
आज आपला देश बर्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसर्या देशांवर अवलंबून आहे. मी अशा भारताची कल्पना करतो जो पुर्णपणे संपन्न असेल.
काही महत्वाचे निबंध:
- माझी आई बेस्ट मराठी निबंध {2023} Mazi Aai Nibandh in Marathi
- माझे बाबा अप्रतिम निबंध | Maze Baba Nibandh in Marathi
- माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Marathi Nibandh
- माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh
- पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
- मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध {2023} Mi Pakshi Zalo Tar Nibandh
निष्कर्ष: Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
आम्ही आशा करतो की तुम्हाला माझ्या स्वप्नातील भारत निबंध (Majhya Swapnatil Bharat) नक्कीच आवडल असेल. दिलेले निबंध तुम्ही अनेक विषयांवर लिहू शकता. जसे की,
माझ्या स्वप्नातील भारत 2047 निबंध, माझ्या स्वप्नातील भारत चित्र, भविष्यातील भारत निबंध मराठी, महापुरुषांच्या स्वप्नातील भारत निबंध इत्यादि.
Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुमच्या इयत्तेसकट खाली कमेन्ट करून नक्की सांगा. व तुमच्या वर्ग मित्रांना हा निबंध शेअर करा.
mpscmarathi.com वर लिहिले गेलेले सर्व निबंध शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लिहिण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा होईल.
धन्यवाद!