{सर्व इयत्तेसाठी} माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Marathi Nibandh

Mazi Shala Marathi Nibandh: आज आपण माझी शाळा निबंध मराठी या विषयावर निबंधलेखण करणार आहोत.

शाळा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कणा असतो. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा वाटा असतो. एक आई-वडील, दुसरे आपला परिसर आणि तिसरा आणि तितकाच महत्वाचा भाग म्हणजे आपली शाळा.

लहानपणीचा जास्त वेळ आपण शाळेतच घालवतो. एक यशस्वी आणि आदर्श व्यक्ति होण्यासाठी असणारे सर्व संस्कार आपल्याला शाळेतूनच मिळतात.

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आवडत्या निबंधला – Majhi Shala Nibandh

माझी शाळा निबंध 10 ओळी |Majhi Shala Marathi Nibandh 10 Line

माझी शाळा निबंध 20 ओळी

Mazi Shala Marathi Nibandh Class 3 – दिलेल्या माझी शाळा निबंध 10 ओळी तुम्ही इयत्ता तिसरी साठी ‘माझी शाळा माहिती‘ किंवा Majhi Shala Nibandh Marathi साठी वापरू शकता.

  1. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा, रामपुरवाडी हे आहे.
  2. माझ्या शाळेची इमारत खूप प्रशस्त व सुंदर आहे.
  3. माझ्या शाळेतील सर्व वर्गखोल्या हवेशीर आहेत.
  4. माझ्या शाळेत इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत वर्ग आहेत.
  5. माझ्या शाळेत एक सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा व संगणक कक्ष आहे.
  6. माझ्या शाळेत एकूण ९ शिक्षक आहेत. |Mazi Shala Nibandh
  7. माझ्या शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे.
  8. आम्ही शाळेत सर्व राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करतो.
  9. माझी शाळा एक ‘स्वच्छ सुंदर शाळा’ व आदर्श शाळा आहे.
  10. मला माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा निबंध 2 पेज |Majhi Shala Nibandh Marathi 2 Pages

मुद्दे: [ शाळेचे नाव – कोठे आहे – शाळेची इमारत – वर्ग – विद्यार्थी – शाळेची वेळ – हेडमास्तर – शिक्षक – खेळाचे मैदान – ग्रंथालय – शाळेबद्दल तुमचे मत ]

“गुरुने दिला द्यानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा”

खरोखरच किती सुंदर अर्थ दडला आहे या ओळींमध्ये! असा गुरुकडून द्यानरूप वारसा मिळणारा आमचा एकमेव द्यानमळा म्हणजे माझी शाळा.

माझ्या शाळेचे नाव आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय आहे. शहरातील सर्वोत्तम शाळा म्हणून माझ्या शाळेला ओळखले जाते.

आमच्या शाळेत सुमारे ८०० विद्यार्थी शिकतात, माझी शाळा इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत आहे.

शाळेत ४० शिक्षक कर्मचारी असून ४ शिपाई आणि एक द्वारपाल आहे. |Majhi Shala Nibandh in Marathi

माझी शाळा शहराच्या गजबजाटापासून दूर शांततेच्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्हाला अभ्यास करताना कोणतीही अडचण येत नाही.

शाळेच्या आजूबाजूला भरपूर हिरवळ आहे, त्यामुळे तेथील वातावरण चांगले आहे आणि शाळेला ५० खोल्या आहेत.

माझ्या शाळेत एक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, आणि ग्रंथालय देखील आहे. जिथे आम्ही वर्तमानपत्रे तसेच अनेक महत्वाची पुस्तके वाचतो.

शाळेत मुख्याध्यापकांच्या बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय बांधण्यात आले आहे. ते अतिशय सुंदर आहे, तेथे चांगली सजावट करण्यात आली आहे.

कचरा सगळीकडे पसरू नये म्हणून माझ्या शाळेत ठिकठिकाणी कचरापेट्या बसवण्यात आले आहे.

माझ्या शाळेत एक मोठे मैदान आहे. जिथे आम्ही मुले रोज खेळ खेळतो. दर आठवड्याला कबड्डी, खो-खो, क्रिकेट असे अनेक खेळ खेळायला आम्हाला शिकवले जाते.

शाळेत एनसीसी आणि स्काऊट देखील आहे.

काही दिवसांपूर्वीच आमच्या शाळेत वार्षिक उत्साह साजरा करण्यात आला, त्यात आम्ही आनंदाने सहभागी झालो. आम्हाला पुरस्कारही मिळाला. |Mazi Shala Marathi Nibandh

माझ्या शाळेतील सर्वजण खूप चांगले आहेत. शिक्षक अभ्यासही खूप चांगला शिकवतात.

म्हणूनच माझी शाळा मला खूप आवडते.

शाळेचा एक आदर्श विद्यार्थी असल्याचा मला खूप अभिमान आहे.

Download – Mazi Shala Marathi Nibandh Pdf

माझी शाळा स्वच्छ शाळा निबंध |Majhi Shala Nibandh Marathi

कागद नाही कुठे
नाही पाला पाचोळा
वर्ग, परिसर ही स्वच्छ जसा
तशी स्वच्छ, सुंदर माझी शाळा!

माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. माझ्या शाळेचे नाव ‘सरस्वती विद्यामंदिर’ असे आहे. माझी शाळा पुणे या शहरात आहे.

माझ्या शाळेची इमारत भव्य व खूप सुंदर आहे. माझ्या शाळेत १ ते १० पर्यंतचे वर्ग आहेत. तसेच सभागृह, वाचनालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह आणि खेळाचे मोठे मैदान आहे. माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर असतो.

माझ्या शाळेतील सर्व शिक्षक प्रेमळ व प्रतिभावान आहेत. ते आम्हाला फक्त शिक्षणच नाही तर चांगले संस्कार व मार्गदर्शनही देतात.

माझ्या शाळेत शिस्तीला खूप महत्व आहे. |Mazi Shala Marathi Nibandh

शाळेत मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक स्पर्धा, राष्ट्रीय सण, जयंती असे कार्यक्रम आयोजित केले जाते.

माझ्या शाळेत शिक्षणाबरोबरच विद्यार्थी भारताचा सुजान नागरिक कसा होईल याकडे लक्ष दिले जाते.

या सर्व वैशिष्ट्यामुळेच माझी शाळा आदर्श शाळा आहे.

मला माझ्या शाळेचा खूप अभिमान वाटतो. |Majhi Shala Nibandh in Marathi

मला माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी |Mazi Shala Marathi Nibandh Class 5

Mazi Shala Marathi Nibandh Class 5

“हि आवडते मज मनापासूणी शाळा
लाविते लळा जशी माऊली बाळा”

माझ्या शाळेचे नाव ‘कन्या विद्यामंदिर शाळा’ असे आहे. माझी शाळा मला खूप आवडते.

माझी शाळा प्राथमिक शाळा आहे. इयत्ता पहिले ते सातवी पर्यंतचे वर्ग येथे शिकवले जातात. माझ्या शाळेत बालमनांवर चांगले संस्कार व सुविचार घडवले जातात.

माझी शाळा घरापासून अगदी थोड्याच अंतरावर निसर्गरम्य परिसरात आहे. सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची झाडे तसेच स्वच्छ सुंदर परिसर आहे. |Mazi Shala Marathi Nibandh

माझी शाळा ११ वाजता भरते व ५ वाजता सुटते.

शाळेची सुरुवात प्रार्थना ने होते त्यामुळे आमचे मन दिवसभर प्रसन्न राहते.

माझ्या शाळेत खेळण्यासाठी भव्य क्रीडांगण आहे. दररोज १ तास शिक्षक आम्हाला खेळण्यासाठी देतात. त्यातूनच आमचा व्यायाम देखील होतो.

आम्ही शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो त्यातूनच आमच्यात छंद जोपासले जातात व व्यक्तिमत्त्व विकास होतो.

आमच्या शाळेत प्रजासत्ताक दिन व स्वतंत्र दिन साजरे केले जातात. तेव्हा तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करून सकाळी प्रभातफेरी घेतली जाते. |Mazi Shala Marathi Nibandh

त्याच दिवशी विविध स्पर्धा व भाषणांचे आयोजन केले जाते त्यामुळे आमच्या विविध कलागुणांना वाव मिळतो.

माझ्या शाळेत चार शिक्षक आहेत व चार वर्गखोल्या आहेत. शाळेची इमारत अतिशय प्रशस्त व स्वच्छ आहे. विविध नकाशचित्रे असणार्‍या बोलक्या भिंती आहेत.

शाळेच्या समोरच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे.

माझ्या शाळेत गरीब व गरजू मुलांना मोफत गणवेश दिला जातो त्यामुळे गावातील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित नाही. |Mazi Shala Marathi Nibandh

शाळेत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक व व्यक्तिमत्त्वाचे धडे शिकवले जातात. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे.

माझ्यासाठी माझी शाळा हेच मंदिर व शिक्षक हेच देवता आहे. म्हणूनच माझी शाळा मला खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी |Mazi Shala Marathi Nibandh Class 7

Mazi Shala Marathi Nibandh Class 7

माझ्या शाळेचे नाव ‘मॉडर्न हायस्कूल’ आहे. माझी शाळा खूप मोठी आहे. शाळेत एक ग्रंथालय व एक प्रयोगशाळा आहे.

माझ्या शाळेत एक मोठे सभागृह तसेच एक भव्य मैदान देखील आहे. तेथे आम्ही रोज खेळतो.

आमचे शिक्षक आम्हाला छान शिकवतात.

शाळेच्या परिसरात आम्ही विद्यार्थ्यानी खूप झाडे लावली आहेत. आम्ही त्या वृक्षांची काळजीही घेतो. त्यामुळे काही दिवसाने शाळेच्या चारही बाजूंना हिरवी वृक्षराजी निर्माण होते.

आमच्या शाळेतील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. |Marathi Nibandh Majhi Shala

मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. आमचे शिक्षक खूप प्रेमळ आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक शिस्तीविषयी अतिशय कडक आहेत; पण ती शिस्त पाळण्यात आम्हालाही आनंद वाटतो. |Mazi Shala Marathi Nibandh

शाळेत वेळेवर येणे, नेहमी डाव्या बाजूने चालणे, वर्गात अभ्यासाकडे नीट लक्ष देणे, मधल्या सुट्टीतही बेशिस्त न होणे, कोठीही कचरा न करणे अश्या चांगल्या सवयी आम्हाला विद्यार्थीदशेतच लागल्या आहेत.

माझ्या शाळेतील सर्व शिक्षक आम्हां विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यासाठी दक्ष असतात.

असे हे पवित्र विद्यामंदिर माझी शाळा मला खूपच प्रिय आहे.

Mazi Shala Marathi Nibandh Class 8

Majhi Shala Nibandh

माझी शाळा ही मंदिरासारखी आहे जिथे आपण विद्येचे द्यान घेण्यासाठी जातो. जिथे मुले शिकून सुसंस्कृत आणि सभ्य नागरिक बनतात.

कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ति म्हणजे त्या राष्ट्रातील मुले ही असते आणि ही संपत्ति शाळेत ठेवलेली असते.

माझ्या शाळेचे नाव ‘आदर्श विद्यालय’ असे आहे. माझी शाळा मुंबई या शहरात आहे.

माझ्या शाळेची इमारत पाच मजली आहे आणि त्यात पहिले ते दहावी साठी प्रत्येकी चार वर्ग तसेच सभागृह, वाचनालय, लेबोरेटरी आणि खेळण्यासाठी खूप मोठे मैदान आहे.

तसेच शाळेची एक सुंदर अशी फुलबाग आहे.

अशी माझी भव्य आणि सुंदर शाळा आहे. |Majhi Shala Nibandh in Marathi

बागेत ज्याप्रमाणे फुले असतात त्याप्रमाणे शाळेत मुले असतात.

हसत, खेळत, गोष्टी सांगत माझे शिक्षक मुलांना शिक्षण देतात. तसेच चांगले संस्कार ही आमच्यावर करतात.

भारताचा सुजान नागरिक कसा तयार होईल याकडे माझ्या शाळेचे लक्ष असते.

माझ्या शाळेत वेळोवेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके दिली जातात. त्याचबरोबर हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती दिली जाते.

शाळेत अनेक स्पर्धा आणि मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते व विजेत्यांना बक्षिसे दिली जातात.

या सर्व वैशिष्ट्यांमुळेच आज माझी शाळा एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.

माझ्या शाळेचा मला खुप अभिमान आहे.

Mazi Shala Marathi Nibandh Class 10

Mazi Shala Marathi Nibandh

माझ्या शाळेचे नाव ‘आदर्श विद्यामंदिर आहे’. ती गावपासुन थोडी दूर निसर्गरम्य परिसरात वसलेली आहे. माझी शाळा अर्ध्या एकरच्या क्षेत्रात पसरलेली आहे.

शाळेत एक मोठे मैदान आहे जिथे आम्ही रोज खेळ खेळतो आणि मज्जा करतो.

माझी शाळा सेमी-इंग्रजी शाळा आहे आणि मुख्य भाषा मराठी आहे. शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत.

शाळेत प्रत्येक वर्गात अ आणि ब तुकड्या आहेत आणि प्रत्येक तुकडीत ५० विद्यार्थी आहेत.

माझी शाळा ग्रामीण भागात आहे. |Mazi Shala Marathi Nibandh

शाळेत पटसंख्या वाढवण्यासाठी आमची शाळा दरवर्षी मोहीम चालवते, आणि याचे परिणाम खूप चांगले आहेत.

माझ्या शाळेत शिक्षणाबरोबरच आमच्यावर उत्तम संस्कार कसे होतील याकडे नीट लक्ष दिले जाते.

शाळेत सर्व भारतीय सण, नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथि साजरे केले जातात. तसेच चित्रकला, नृत्य, खेळ, गायन, भाषण, निबंध लेखन, वाचन असे अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझी शाळा व्यक्तीगत लक्ष देते. |Mazi Shala Marathi Nibandh

आमच्या शाळेचा निकाल नेहमीच उत्कृष्ट असतो. मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ९९ टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. याचे सर्व श्रेय आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि प्राचार्यसरांना जाते.

माझी शाळा जारी ग्रामीण भागात असली तरी खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करते.

पालक हे जाणून खुश आहेत की त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. माझ्या शाळेला जिल्हास्तरावर ‘माझी आदर्श शाळा‘ हा पुरस्कार ही मिळाला आहे.

मला अशा शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे.

मला खात्री आहे माझी शाळा असेच गुणवंत, अष्टपैलू विद्यार्थी तयार करत राहील आणि आमचे भविष्य सुंदर, कार्यक्षम बनवण्यात मदद करत राहील. |Mazi Shala Marathi Nibandh

कधी नसावी सुट्टी मजला
न कधीच यावा उन्हाळा
अशी असावी माझी शाळा
यावा न मजला कंटाळा…!

काही महत्वाचे निबंध:

निष्कर्ष- Mazi Shala Essay in Marathi

आम्हाला आशा आहे की दिलेली माझी शाळा माहिती / Majhi Shala Marathi Nibandh तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरेल.

दिलेले सर्व निबंध हे इयत्ता पहिले ते बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरतील.

परीक्षेमध्ये Mazi Shala Marathi Nibandh शीर्षक खालीलप्रमाणेही असू शकतो –

माझी शाळा निबंध 20 ओळी, माझी शाळा माहिती, माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी, माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी, माझी शाळा स्वच्छ शाळा निबंध.

Majhi Shala Nibandh Marathi तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना तो शेअर नक्कीच करा जेणेकरून त्यांनाही याची मदद होईल.

तुम्ही कितवीला आहात आणि कोणत्या शाळेत शिकत आहात हे आम्हाला खाली कमेन्ट करून नक्कीच सांगा. आम्हालाही तुमच्याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment