{अतिशय सुंदर } स्वच्छतेचे महत्व निबंध |Swachata Che Mahatva Nibandh

Swachata Che Mahatva: आजच्या या लेखामध्ये आपण स्वच्छतेचे महत्त्व यावर निबंध लिहणार आहोत.

स्वच्छता हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपले शरीर, सभोवतालचे परिसर इत्याद्धी गोष्टींची निगा राखणे म्हणजेच स्वच्छता होय.

दैनंदिन जीवनात Swachata Che Mahatva जाणून घेऊन त्यांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.

स्वच्छता विषयी निबंध या लेखाद्वारे आपण स्वच्छतेचे महत्त्व माहिती जाणून घेऊ.

चला तर मग सुरवात करूया… Swachata Che Mahatva Marathi Nibandh !

स्वच्छतेचे महत्व निबंध 10 ओळी |Swachata Vishay Mahiti

  1. संत गाडगेबाबा यांनी सर्वात स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटवून दिले.
  2. स्वच्छता हा निरोगी आयोग्याचा पाया आहे.
  3. स्वच्छतेच्या अभावामुळेच अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
  4. आपल्या जवळील परिसर स्वच्छ असेल तर आपल्याला शुद्ध हवा, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल.
  5. स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते व आयुष्य देखील वाढते.
  6. प्रत्येक शाळांमधून मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाते.
  7. आपल्या जवळील परिसराबरोबरच आपल्या शरीराची स्वच्छता ठेवणे देखील महत्वाचे आहे.
  8. ‘आपला परिसर स्वच्छ परिसर’ ही मोहीम सतत राबवली पाहिजे.
  9. ‘स्वच्छता’ हा देखील एक दागिनाच आहे.
  10. ‘हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे’ असे नेहमी म्हटले जाते. ते अगदी खरे आहे.

स्वच्छतेचे महत्त्व निबंध 500 शब्द |Swachata Che Mahatva Nibandh 500 Shabd

स्वच्छतेचे महत्त्व यावर निबंध लेखण मराठी:

‘चला सर्वजण एकत्र येऊया,
हा सगळा परिसर स्वच्छ करूया!’

स्वच्छता ही आपली पहिली आणि महत्वाची जबाबदारी आहे. सगळ्यांना समजले पाहिजे की अन्न आणि पाणी या प्राथमिक गरजेबरोबर स्वच्छता सुद्धा म्हटले तर वावगे ठरणार नाही.

स्वच्छा व निरोगी राहण्यासाठी आपण साफ सफाई करण्याची सवय आचरणी लावणे गरजेचे आहे.

बालपण हा सगळ्यांच्या जीवनातील सुखद काळ असतो. त्यावेळी आपल्याला चालणे, बोलणे, खणेपिणे इत्यादि गोष्टी शिकवल्या जातात. त्याच वेळी मुलांना स्वच्छतेची सुद्धा शिस्त लावली पाहिजे.

आपले अस्तित्व हे इतर प्राण्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. इतर प्राणी नैसर्गिकरीत्या सुरक्षित असतात. त्यांना अती स्वच्छतेची गरज भासत नाही.

परंतु माणूस हा स्वच्छतेने बांधला गेला आहे. काही दिवस अंघोळ जरी केली नाही तर रोगराई, आजार, अस्वच्छता आसपास पसरते. त्यासाठी शरीर आणि परिसर स्वच्छ राखणे महत्वाचे आहे.

आज समाजात स्वच्छता नसल्याने गंभीर परिस्थिति उत्पन्न झाली आहे. |Swachata Che Mahatva Nibandh

सरकार आणि सामाजिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतेच! पण अत्यंत प्राथमिक स्तरावर म्हणजे व्यक्तीगत स्वरावर देखील स्वच्छतेबाबत सजग असणे गरजेचे आहे.

ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापन हे दोन वेगवेगळे घटक असून त्यांचा वापर आपण जैविक खतासाठी करू शकतो.

घरात कचरा असेल तर स्वत: झाडू घेऊन तो स्वच्छ केला पाहिजे. प्लास्टिक कचर्‍याचे लवकर विघटन होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर टाळणेच चांगले!

सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वत:हून घाण न करणे, परिसरात कचर्‍याची कुंडी ठेवणे आणि त्यातच कचरा टाकणे, असे काही मुख्य हेतु ठेवून तुम्ही त्याची अमलबजावणी सामाजिक स्तरावर देखील करू शकता.

परिसरातील स्वच्छता म्हणजे सर्व पर्यावरणातील घटकांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. नदी, नाले, डोंगर, जमीन, हवा प्रदूषित होऊ न देणे हे देखील स्वच्छतेतेच काम आहे.

जर ही स्वच्छता नसेल तर आपल्याला प्रदूषण, साथीचे रोग अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यातच वाढत चाललेल्या जगण्याच्या स्पर्धेमुळे खूप सारी नैतिकमूल्ये लयास गेलेली आहेत. |Swachata Che Mahatva Nibandh

मानवी स्वार्थ वाढत आहे. निसर्गाची दयनीय अवस्था आज आपल्याला त्यामुळे पाहावयास मिळत आहे.

प्रदूषण हटवून आपण निसर्गाची स्वच्छता राखली पाहिजे.

शुद्ध स्वरूप आणि निखळ आनंद यांची प्राप्ती आणि जाणीव होण्यासाठी शरीर, मन, घर, परिसर अशा सर्व स्तरांवर स्वच्छता करणे आवश्यक आहे.

अशा जाणिवेतून आणि मग प्रत्यक्ष घडणार्‍या कृतीतून आपण एक स्वच्छ, सृजनशील आणि विकसित समाज घडवू शकतो. |Swachata Che Mahatva Nibandh

स्वच्छता घोषवाक्य |Cleanliness Slogans in Marathi

खाली दिलेले Slogans On Cleanliness in Marathi तुमच्या स्वच्छतेचे महत्त्व निबंध किंवा स्वच्छतेचे महत्त्व माहिती मध्ये वापरुन तुमचं निबंध अधिक आकर्षिक रित्या लिहू शकता.

Swacch Bharat Abhiyan Slogan in Marathi | Slogans on Cleanliness in Marathi

  • स्वच्छ भारत – निरोगी भारत
  • स्वच्छता शिका – आरोग्याला जिंका
  • घरोघरी नारा – स्वच्छ परिसर ठेवा
  • गांधीजींनी दिला संदेश – स्वच्छ ठेवा भारत देश
  • स्वच्छतेच्या नियमांचे पालन करू, घर-अंगण स्वच्छ ठेवू
  • रंग भगवा त्यागाचा – मार्ग स्वीकारू स्वच्छतेचा
  • स्वच्छ-सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर
  • ठेवा साफ-सफाई घरात, हेच औषध सर्व रोगात
  • स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे मरण

स्वच्छता विषयी निबंध 2 |Swachata Che Mahatva Marathi Nibandh

‘स्वच्छता असे जेथे,
आरोग्य वसे तेथे|’

स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन, व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते.

आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्वाचे आहे तसेच स्वच्छता महत्वाची आहे.

असे म्हणतात की, “जिथे स्वच्छता नांदते तिथे देव वास करतो.”

स्वच्छता हा आवश्यक गुण आहे. आपण सर्वांनी नियमित दात घासले पाहिजेत, आंघोळ केली पाहिजे, आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे. हे सर्व निरोगी व शांतिपूर्वक जीवन जगण्यासाठी गरजेचे आहे.

आपण व्यक्तीगत स्वच्छते इतकेच आपल्या घराची, गावाची, व देशाची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

स्वच्छतेच्या माध्यमातून मानवी स्वच्छतेला चालना मिळाली आहे. आपण स्वच्छतेचे महत्व Swachata Che Mahatva नीट समजून घेऊन त्यांचे पालन केले पाहिजे.

आपण सर्वांनी नद्या, नाले, ओढे, विहिरी, तलाव इ. पाण्याचे स्तोत्र स्वच्छ ठेवायला हवेत. घरातील व परिसरातील कचरा हा कचरापेटीच टाकायला हवा. शोषखड्ड्यांचा वापर करायला हवा. कारण आपण अस्वच्छता ठेवली तर अनेक प्रकारची रोगराई सर्वत्र पसरेल.

आपले घर-परिसर स्वच्छ असेल तर आपले मनही प्रसन्न राहते. आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. आपला वेळ व पैसे वाचले जातात.

आई-बाबा व शिक्षक यांनी लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावायला हवी. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर मुलांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून द्यायला हवे.

‘स्वच्छ भारत अभियान’ हे भारताच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे. या अभियानाचा उद्देश गाव, शहर, रस्ते या ठिकाणी स्वच्छता ठेवणे आहे.

या अभियानातून स्वच्छतेचे महत्व |Swachata Che Mahatva लोकांना पटले आहे. लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.

अनेक थोरामोठ्यांनी व गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. स्वच्छता हा स्वस्थ व सुखी जीवनाचा भाग आहे.

स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण स्वच्छ भारत, निरोगी भारत, विकसित भारत हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.

आपल्या देशाचे नाव संपूर्ण देशात उंचावण्यासाठी स्वच्छतेसारख्या जबाबदारीच्या कार्यात प्रत्येकाने आपला वाटा उचलायला हवा. तरच आपला भारत देश स्वच्छ, सुंदर आणि विकसित बनेल.

स्वच्छतेचे महत्त्व यावर निबंध 3 |Swachata Che Mahatva Nibandh Marathi

‘हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे’

किती मोठा अर्थ दडला आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच आपल्याकडे चालत येते. वैयक्तिक स्वच्छता ही निरोगीआरोग्यासाठी आवश्यक असते.

व्यक्तीगत स्वच्छतेईतकीच घराची, गावाची, आणि देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे.

गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता अशी अनेक कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते.

नदीच्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते त्यासाठी नदी स्वच्छतेचे काम आपण हाती घेतले पाहिजे.

आपण नेहमी आपल्या परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतो तसेच देशाच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन काम केल तर नक्कीच आपल देश ही स्वच्छ होईल.

स्वच्छता ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. सभोवताली परिसर स्वच्छ असेल तर रोगराई पळून जाते व आपले मन ही प्रसन्न होते.

आपल्या भारतीय संस्कृतीत असे म्हटले जाते की ‘जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते‘ ते अगदी खरे आहे.

भारताला स्वच्छ ठेवण्यासाठी भारत सरकार कडून अनेक प्रकारची मोहीम राबवली जाते.

पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपला ही यामध्ये खूप मोठा वाटा आहे.

रोगराई वर मात करण्यासाठी सर्व भारतीयांनी एकजूट होऊन वैयक्तिक पातळीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला पाहिजे.

आजही काही प्रमाणावर लोक बाहेर शौचास जाणे यासारख्या सवयीमुळे विविध आजारास करणीभूत ठरत आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराची स्वच्छता खूप महत्वाची असते.

शरीरात घाण आणि रोग नेहमीच एकत्र राहतात त्यामुळे शरीर निरोगी आणि आजरांपासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे.

अनेक थोरमोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला.

शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदीजींचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.

काही महत्वाचे निबंध:

निष्कर्ष: Swachata Che Mahatva Marathi Nibandh

तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला Swachata Che Mahatva स्वच्छतेचे महत्त्व यावर निबंध आवडल असेल तर आम्हाला तुमच्या इयत्तेसकट खाली कमेन्ट करून नक्कीच कळवा.

दिलेले सर्व निबंध स्वच्छतेचे महत्त्व माहिती हे तुम्ही तुमच्या प्रकल्पासाठी तसेच परीक्षा सरावासाठी वापर करून हमखास चांगले गुण मिळवू शकता.

तुमच्या मित्र-मैत्रिणींना Swachata Che Mahatva Marathi Nibandh शेअर करायला विसरू नका.

Sharing Is Caring:

1 thought on “{अतिशय सुंदर } स्वच्छतेचे महत्व निबंध |Swachata Che Mahatva Nibandh”

Leave a Comment