Mazi Aai Nibandh in Marathi: देव सगळीकडेच असू शकत नाही आणि म्हणूनच त्याने आई ला पृथ्वीतलावर पाठवल. मुलांचा सर्वांत पहिलं मार्गदर्शक व गुरु आईच असते. आईचं वर्णन कितीही शब्दांत केल तरी ते अपूरच पडेल.
आज आपण ‘माझी आई माहिती‘ याबद्दल जाणून घेऊया.
Mazi Aai Nibandh आकर्षक कसा लिहावा हेच या पोस्ट द्वारे आम्ही सादर आहे. जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील.
चला तर मग सुरुवात करुयात आपल्या आवडत्या निबंधाला – Mazi Aai Nibandh in Marathi
माझी आई निबंध मराठी 20 ओळी
Aai Nibandh in Marathi: खाली दिलेल्या मूदयांच्या आधारे तुम्ही माझी आई निबंध 10 ओळी, माझी आई निबंध 20 ओळी, माझी आई निबंध 50 ओळी या विषयांवरती निबंधलेखण करू शकता.
- माझ्या आईचे नाव सुपर्णा जोशी आहे.
- माझी आई सर्वात सुंदर, प्रेमळ आणि दयाळू आहे.
- माझी आई मला खूप आवडते. (Mazi Aai Nibandh in Marathi)
- ती दैनंदिन कामे पार पाडते .
- सकाळी लवकर उठते आणि कुटुंबासाठी रुचकर जेवण बनवते.
- माझी आई खूप मेहनती आहे आणि ती नेहमी सांगळ्यांची काळजी घेते.
- ती माझा पहिला गुरु आहे, जी नेहमी मला जीवनाचे बहुमूल्य धडे शिकवत असते.
- आई मला नेहमी खरे बोलायला सांगते.
- माझी आई गरीब लोकांना नेहमी मदद करते.
- माझी आई माझी चांगली मैत्रीण आई जीच्याशी मी मनमोकळेपणाने सगळं बोलते.
- ती नेहमी हसतमुख असते. | Mazi Aai Nibandh in Marathi
- मी कधी रूसले तर ती मला गोडगोड बोलून हसवते.
- माझ्या आनंदात आनंदी आणि दु:खात दु:खी होते.
- तिचा स्वभाव खुप चांगला आहे.
- माझी आई नियमितपणे माझ्या अभ्यास घेते.
- नेहमी सर्वांच्या आवडीचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवते.
- माझी आई नेहमीच माझ्यासाठी प्रार्थना करते आणि माझे रक्षण करते.
- माझ्या चुका माफ करून मला समजावते.
- रात्री झोपताना छान-छान गोष्टी सांगते. | Mazi Aai Nibandh in Marathi
- ती माझ्यावर जिवापाड प्रेम करते आणि अशी आई मला मिळाली याचा मला सदैव अभिमान आहे.
माझी आई कविता | My Mother Poems
निबंध अतिशय सुंदर व आकर्षक बनवण्यासाठी निबंधामद्धे कवितांचा वापर नक्कीच केला पाहिजे. Mazi Aai Nibandh in Marathi लिहण्यासाठी तुम्ही खलील कवितेंचा वापर करून अगदी सहजपणे Mazi Aai Nibandh लिहू शकता.
Aai Marathi Nibandh Poems:
“माझी माय माझी माय,
माझं राऊळ देऊळ..
तिच्या टाचेच्या भेगात,
माझं अजिंठा वेरूळं..”
‘सोन्याच्या झळाळीसाठी आधी बसावे लागतात चटके,
मूर्तीच्या सौंदर्यासाठी आधी खावे लागतात बंदुकीच्या गोळ्या’
‘स्वप्नाच्या पूर्तीसाठी आधी पाहावं लागतं मरण,
तसच आईच्या प्रेमाच्या आस्वादाखाली त्यावर पडावं लागतं विरजण’
“असेल जर मला, मानव जन्म पुन्हा
Mazi Aai Nibandh in Marathi
आई तुझ्या पोटी जन्म घेईन पुन्हा..”
काळजाची हाक असते आई,
नि:शब्द जाग असते आई!
अंतरीचे गूढ असते आई,
ईश्वराचे रूप असते आई!
“आई एक नाव असते,
जगावेगळा भाव असते..
आई एक जीवन असते,
प्रेमळ मायेचे लक्षण असते..”
My Mother Essay in Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द
[ मुद्दे:Mazi Aai Nibandh in Marathi आईच्या आठवणीचा प्रसंग – आईचा दिनक्रम – सर्व कामे उरकण्यात त्वरा – अनेक आघाड्यांवर लढाई – नीटनेटकेपणा व वक्तशीरपणा – यांबाबत अत्यंत कडक – आदर्श जीवनाची ओढ ]
आईसाठी काय लिहू..
आईसाठी कसे लिहू..
आईसाठी पुरतील एवढे
शब्द नाही कुठे..
आईवरती लिहिण्याइतपत
नाही माझे व्यक्तित्व..
समुद्राची शाई, हिमालयची लेखनी, व आकाशाचे कागद करून जरी आईचे गुणगान लिहावयास बसलो तरी आईची माया लिहून संपणार नाही. म्हणूनच म्हणतात, ‘आई’ हे दोन अक्षरे हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवा.
बालपणापासून ते मोठे होईपर्यंत आपल्या मुलाच्या सर्व व्यथा फक्त एखादी आईच समजू शकते.
माझी आई सकाळी साडेपाच ला उठते. सर्वप्रथम माझी व ताईची शाळेची तयारी करते. आमची खाण्यापिण्याची, कपड्यांची तयारी झाली की, त्या दिवशी शाळेतील प्रकल्प वगैरे साहित्य घेतले ना किंवा वेळापत्रकानुसार अभ्यास करून वाहयापुस्तके घेतली ना, हे पाहते.
सकाळी न्याहरी केलीच पाहिजे हा तीच दंडक, न्याहरी केली नाही, तर तिला रागच येतो.
मग ती स्वत:च्या व बाबांच्या जेवणाच्या डब्यांची तयारी करते. आमच्या दुपारच्या जेवणाचीही तयारी करून ठेवते. या काळात विजेच्या वेगाने तिच्या हालचाली होतात. कोणी कामचुकारपणा केलेला तिला खपत नाही.
माझी आई अनेक आघाड्यांवर लढत असते. घरातल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था तीच पाहते. ती नोकरीही करते. संध्याकाळी परतल्यावर पुन्हा घरकामाला जोडून घेते.
मी मनातल्या मनात घरातली कामे मोजली. जेवणखाण करणे, काय शिल्लक आहे व काय आणायचे ते पाहणे ते पाहणे, कपडे धुणे, ते एस्त्रीला देणे, झाडलोट करणे, पाहुण्यांची ऊठबस करणे वगैरे सर्व मिळून पन्नासच्या वर कामे होतात. या सर्वांची ती सुरेख व्यवस्था लावते. काहीही अस्ताव्यस्त पडलेले तिला आवडत नाही.
माझ्या आईचा विशेष म्हणजे ती समानता मानणारी आहे. घरात ताईबरोबर ती मलाही कामे करायला लावते.
कधी कधी मला कंटाळा येतो पण ‘नाही म्हणायची’ माझी टापच नसते.आईला सर्व गोष्टी जागच्या जागी आणि वेळच्या वेळी हव्या असतात. याचा काही वेळा आम्हाला खूप त्रास होतो. पण कोणाचेही काहीच चालत नाही.
माझी आई आमच्या करिअरचा बारकाईने विचार करते. आमचे जीवन दर्जेदार करण्याचा प्रयत्न करणारी माझी आई खरच खूप महान आहे.
माझी आई निबंध मराठी 5वी | Mazi Aai Nibandh in Marathi
Aai Nibandh in Marathi for 5th Standard:
“आई असते खूप प्रेमळ,
प्रेम तिचे फार निर्मळ”
माझी आई खुप गोड आहे. ती दररोज सकाळी लवकर उठते. माझी आई घरातील प्रत्येकाची काळजी घेते. माझी आई जणू आमच्या घराची लक्ष्मीच आहे. मीही आईला देवप्रमाणे मानतो आणि तिच्या प्रत्येक शब्दांच पालन करतो. माझी आई नोकरी सुद्धा करते. ती घर आणि ऑफिस दोन्ही यशस्वीपणे सांभाळते.
माझी आई माझ्या जिवलग मित्रासारखीच आहे. मी चुकलो तर ती मला मार देत नाही; तर प्रेमाने समजावून सांगते. माझ्या दु:खी चेहऱ्यावर हसू आणते. मी आणि माझी बहीण रात्री झोपतो तेव्हा आई आम्हाला छान – छान गोष्टी सांगते. माझी आई माझा आदर्श आहे.
आई हे प्रत्येकाच्या जीवनातील वरदान आहे. जिच्या आशीर्वादाने आपण घडतो त्या आईवर मी खूप – खूप प्रेम करतो!
माझी आई निबंध मराठी 7वी | Mazi Aai Nibandh for Class 7
My Mother Essay in Marathi | Mazi Aai Nibandh
“आई माझा गुरु,
आई माझा कल्पतरू,
सौख्याचा सागरु,
माझी आई”
साने गुरुजींनी लिहिलेल्या या ओळीमध्ये खूप सत्यता आहे. माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी सर्वांत आधी उठून मला शाळेची तयारी करायला मदद करते. माझे आहार पोषण चांगले राहावे यासाठी ती रोज छान पदार्थ करून मला खायला देते. माझी आई मला जुन्या चांगल्या कविता, अभंग, ओव्या शिकवते.
माझा सर्व अभ्यास ती नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूप कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. कधी कधी मी हट्टीपणा केला तर मला ओरडते सुद्धा पण नंतर जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना छान गोष्ट सांगते.
मी आजारी असेल तर माझी औषधे देण्यापासून ते वेळेवर जेवण देण्यापर्यंत सर्व कामे अगदी काळजीने करते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला छान शाबासकी देते. पण कमी मार्क पडले तरीही छान समजूत घालते. अशी माझी प्रेमळ स्वरूप आई मला फार आवडते.
माझी आई निबंध मराठी 12वी
Mazi Aai Nibandh in Marathi for 12th:
“स्वामी तिन्ही जगाचा,
आईविना भिकारी”
स्वामी विविकानंदांचे हे वाक्य अगदीच खर आहे. आई या शब्दातील ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर आणि या दोघांचे संगम म्हणजेच आई होय.
देव स्वत: जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला पाठवले. संपूर्ण जग आईच्या मातृत्वात सामावले आहे.
मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु म्हणजे त्याची आहे असते. माझ्या आयुष्यात सर्वांत प्रभावशाली व्यक्ति म्हणजे माझी आई.
मी माझ्या आईची प्रशंसा व आदर करते. मी आतापर्यंत शिकलेला सर्वांत सुंदर, प्रेमळ, दयाळू शब्द आहे आई. ती फक्त मेहनतीच नव्हे पण तिच्या कामासाठी समर्पित आहे.
प्रत्येक क्षणी, जीवनातील कठीण वाटेवर माझ्या सोबत उभी राहते ती माझी आई. आई सकाळी लवकर आणि तिचे दैनंदिन कार्य चालू करते. मला शाळेत पाठवणे, घरकाम करणे, संध्याकाळी माझा अभ्यास घेणे अशी अनेक कामे ती करते.
आईबद्दल जेवढ लिहाव तेवढ कमीच वाटणार..
माझ्या आईला आमच्या कुटुंबाचे व्यवस्थापक म्हणता येईल कारण ती घरातील प्रत्येक वस्तु व्यवस्थापिक करते. माझी आई आमच्या साठी दररोज नवीन-नवीन स्वादिष्ट पदार्थ बनवते.
आई कधी माया करते तर कधी रागवते देखील पण नेहमी ती आमच्या भाल्याचाच विचार करते.
माझ्या आईला अव्यवस्थिपणा, गबाळेपणा मात्र बिलकुल आवडत नाही. तिच्या या शिकवणीमुळेच मला व्यवस्थिपणाचे महत्व पटले आहे.
आई आम्हाला सुलभ आणि सोप्या पद्धतीने जगभरातील चांगल्या आणि द्यानी गोष्टी समजावून सांगते.
तिला आमच्या बुद्धीचा चांगला अंदाज आहे. जेव्हा एखादी व्यक्ति आपल्या घरी आजारी पडते तेव्हा आई त्याची अत्यंत चांगल्या रीतीने देखभाल करते. माझी आई मला घडवण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत असते. मी कधी रूसले तर गोडगोड बोलून ती मला हसवते.
माझी आई आमच्या कुटुंबाच आधारस्तंभ आहे. ती आमच्या कुटुंबासाठी एक वृक्ष आहे जे आम्हाला छाया प्रदान करतो.
माझी आई सदगुणांची खाण आहे. माझ्या आयुष्याची निर्माता आहे. ती माझी गुरु, माझी मैत्रीण, बहीण, मार्गदर्शक आणि माझी सर्वस्व आहे. अशी आई मला मिळाली त्याचा मला सदैव अभिमान आहे.
मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत माझ्या आईवर भरभरून प्रेम करेन.
महत्वाचे निबंध:
- माझे बाबा अप्रतिम निबंध | Maze Baba Nibandh in Marathi
- माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh
- पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
- मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध {2023} Mi Pakshi Zalo Tar Nibandh
- स्वच्छतेचे महत्व निबंध |Swachata Che Mahatva Nibandh
निष्कर्ष: My Mother Essay in Marathi
आम्ही आशा करतो की तुम्हाला Mazi Aai Nibandh in Marathi (माझी आई मराठी निबंध) नक्कीच आवडलं असेल.
दिलेले सर्व निबंध तुम्ही माझी आई निबंध मराठी 5वी, माझी आई निबंध मराठी 7वी, माझी आई निबंध मराठी 8वी, माझी आई निबंध मराठी 12वी या सर्व इयत्तेसाठी वापरू शकता.
तुमच्या वर्ग मित्र मैत्रिणींना माझी आई माहिती शेअर करायला विसरू नका.
Nice👍
Very nice 👍🙂
खरोखर आपण अप्रतिम निबंध लिहिला आहे.मुलांना अलीकडे मराठी विषय देखील अवघड वाटतो पण आता आपल्या माहितीने तो नक्कीच सोपा जाईल.
धन्यवाद! मराठी विद्यार्थांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे.