Maze Baba Nibandh in Marathi | माझे बाबा अप्रतिम निबंध

Maze Baba Nibandh in Marathi: बाबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कणखर व्यक्तिमत्त्व उभ राहत. जितकी प्रेमळ आई तितकेच बाबा कडक आणि शिस्तप्रिय. आईसारखेच बाबा ही आपल्या सगळ्यांना प्रिय असतात.

ज्याप्रमाणे आपल्याला आईच्या ममतेची आवश्यकता असते तशीच आपल्याला बाबांच्या प्रेमाचीही गरज असते.

माझे बाबा निबंध मराठी 10 ओळी | Maze Baba Nibandh in Marathi 10 Lines

majhe baba nibandh

My Father Essay in Marathi 10 Lines माझे बाबा ( वडिलांविषयी माहिती ) १० ओळींमध्ये लिहा.

  1. माझे बाबा अत्यंत हुशार आणि मनाने अतिशय प्रेमळ आहेत.
  2. माझ्या बाबांचे नाव समीर आहे आणि ते शेतकरी आहेत.
  3. माझे बाबा मला खूप आवडतात.
  4. माझे बाबा माझ्या कलागुणांना चालना देतात.
  5. माझ्याकडून एखादी चूक झाल्यास ते मला समजावून सांगतात.
  6. माझे बाबा मला अभ्यासात मदत करतात व प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या मागे ठामपणे उभे राहतात. |Maze Baba Nibandh in Marathi
  7. माझ्या बाबांना पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे, व तीच सवय त्यांनी मला लावली आहे.
  8. ते मला सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जातात.
  9. माझे बाबा माझे मार्गदर्शक, शिक्षक, व मित्र आहेत.
  10. असे माझे बाबा मला खूप खूप आवडतात.

My Father Essay in Marathi

मातृदेवो भव | पितृदेवो भव

आपल्या आयुष्यात आई आणि बाबा या दोघांचे ही समान महत्व आहे. ते दोघेही देवासमान आहेत. तरीही आईवरी लेख, कविता अनेक लिहिल्या आहेत. पण वडिलांवर भव्य-दिव्य असे लेखन झालेले दिसून येत नाही.

बाबांचे व्यक्तिमत्त्व हे चार ओळींत बंदिस्त लिहिण्यासारख नाही. म्हणूनच मला वाटते की, बाबांवर कविता, लेख जास्त पाहावयास मिळत नाही.

आज मी आमच्या शाळेतील एक आदर्श विद्यार्थी आहे. मला घडविण्यामागे माझ्या बाबांचा मोलाचा वाटा आहे. माझे बाबा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ते स्वत: शिस्तप्रिय, विद्यार्थिप्रिय, व समाजप्रिय शिक्षक असल्याने आमच्या कुटुंबावर खूप चांगले संस्कार झाले आहेत.

बाबांच्या खंबीर आधारमुळेच आमचे घर उभे आहे. ते स्वत: खूप संकटातून शिकले. शून्यातून त्यांनी विश्व उभारले. माझे बाबा जितके कठोर तितकेच ते प्रेमळही आहेत. अगदी फणसासारखा त्यांचा स्वभाव आहे.

मी शाळेतील, शाळेबाहेरील अनेक स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवतो. मला बक्षीस मिळाल्यावर आई जवळ घेते तर माझे बाबा मला माहित नसताना गोड खाऊ आणतात.

माझी एखादी चूक झाल्यावर माझे बाबा मला रागावतात. कारण माझे व्यक्तिमत्व चांगले बनावे असे त्यांना वाटते. आपला मुलगा भविष्यात एकही चूक करू नये म्हणून ते सदैव दक्ष राहतात.

खरच आई घराचे मांगल्य असते, तर बाबा घराचे आधार असतात. आई समईतल्या ज्योतीप्रमाणे असते आणि बाबा जणू समईप्रमाणेच असतात. म्हणूनच ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते.

एखादी वाईट घटना घडली तर आई रडून मोकळी होते, पण सांत्वन मात्र बाबांना करावे लागते.

आमच्या कुटुंबाचा आधारवड माझे बाबा आहेत.बाबांना नोकरी असूनही ते आमचे घर काटकसरीने चालवतात. पैशाचा योग्य वापर करतात. आजी-आजोबांची खूप काळजी घेतात. त्यांना कधीही दुखवत नाहीत.

कामावरुन घरी आल्यावर दररोज थोडा वेळ आजी-आजोबांबरोबर गप्पा मारतात. सुट्टीदिवशी आमच्या सर्व कुटुंबाला ते वेळ देतात.

माझे बाबा मला खूप खूप आवडतात. त्यांनी शाळेत तसेच आमच्या घरासमोर खूप झाडे लावली आहेत.

मला नेहमी वाटते की, आपण कधीही आईचे कौतुक जरूर करावे पण त्याचवेळी बाबांचे कष्ट विसरू नये.

देवकी-यशोदेचे कौतुक करावे पण त्याचवेळी पुरात डोक्यावरुन पुत्राला घेवून जाणारा बाप वासुदेव आठवावा.

चालताना चुकून ठेच लागली तर तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडतो ‘आई ग’! पण समोर मोठा साप पाहिला की मुखातून शब्द बाहेर पडतो – बाप रे!

मला खूप अभिमान आहे की, माझे बाबा माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. |Maze Baba Nibandh in Marathi

“अनंत उपकार बाबा तुमचे,
घडवले माझे आदर्श जीवन
भरारी घेताना यशाच्या नभात
जपून ठेवेन संस्कारांचे धन..”

माझे बाबा कविता | माझे वडील निबंध मराठी

माझे बाबा निबंध मराठी: Maze Baba Nibandh in Marathi लिहिण्यासाठी कविता आणि चारोळ्यांचा वापर करा जेणेकरून वडिलांविषयी माहिती तुम्ही अप्रतिमपणे लिहू शकता.

खाली दिलेल्या कविता तुम्ही बाबा वर निबंध लिहिण्यासाठी नक्की वापरा.

“वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं,
खंबीर आधारच दुसर नाव असतं..”

“खिसा रिकामा असला तरी, ‘नाही’ कधी म्हणाले नाही,
माझ्या बाबांपेक्षा ‘श्रीमंत’ मी कुणी पहिला नाही..”

डोळ्यात न दाखवताही,
आभाळाएवढं प्रेम करतो.
त्याला ‘वडील’ नावाचा,
राजा माणूस बोलतात.

“काबाडकष्ट करून तो,
मातीमध्ये स्वत:चा घाम गाळतो.
सुगंधी मखमल फुलांनी तो,
मुलांचे भविष्य सजवून देतो.”

“बाबा, दणकट बाहू आहेत तुमचे
सांगा कसा बरं मी खाली पडेन?
तुम्हीच माझा आधारवड,
शेवटपर्यंत मी तुम्हाला जपेण.”

Majhe Baba Nibandh | माझे बाबा निबंध

|Maze Baba Nibandh in Marathi

आपल्या जीवनात आईप्रमाणेच बाबांचेही महत्त्व खूप आहे. ते कडक शिस्थप्रिय असले तरी मनाने प्रेमळ असतात.

माझे बाबा एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. आमच्या कुटुंबात आम्ही एकूण चार सदस्य आहोत. माझे बाबा आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत.

माझ्या बाबांचे शिक्षण जास्त नाही तरीसुद्धा त्यांना अतिशय व्यवहारद्याण आहे. त्यांच्याकडे प्रत्येक शब्दांची उत्तरे असतात.

माझे बाबा रोज रात्री कामावरुन घरी आल्यानंतर माझा अभ्यास घेतात. माझ्यासाठी रोज काहीतरी खायला आणतात. मला आवश्यक सर्व गोष्टी ते मला घेऊन देतात.

त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे. ते फार प्रेमळ तसेच दयाळू आहेत. कधी-कधी ते आम्हाला वाईट गोष्टींसाठी रागावतात आणि चांगले वळण लावतात.

मला माझे आई-बाबा दोघेही फार आवडतात. मी लहानपणापासून माझ्या बाबांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला आहे. मला मोठे होऊन माझ्या बाबांसारखे व्हयायचे आहे.

Maze Baba Nibandh in Marathi 500 Words

‘माझे बाबा’ म्हटलं की बाबांविषयी काय बोलावे तेच कळत नाही. पण आईच तस नाही. आई हा नेहमीच सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. क्वचितच अश्या व्यक्ति सापडतील ज्यांना आई विषयी माया नाही.

अनेक लेखक आणि कवींसाठी आई हा असा विषय आहे की ज्यावर ते अनेक लेख किंवा काव्य लिहू शकतात. परंतु वडिलांवर काही भव्य दिव्य लेखन किंवा काव्य केलेलं कधी माझ्या वाचनात आले नाही.

पण हे अस का? बाबा आपल्यासाठी काहीच करत नाहीत का?

आई ही मायाळू, दयाळू, प्रेमाची मूर्ति सर्व काही आहे परंतु आपल्या जीवनात वडिलांचा काय स्थान आहे ह्या बद्दल आपण जास्त विचार का नाही करत?

वडिलांचा खंभीर आधार आहे म्हणूनच तर आपल घर भक्कम उभ असत हे आपण किती सहजपणे विसरून जातो.

वडील म्हणजे रागीट, कडक स्वभावाचे असेच चित्र बहुधा आपल्या मनासमोर उभे असते. मित्र-मैत्रिणींच्या घरी जाताना आई म्हटलं तर आपण बिनधास्त जातो. पण जर त्यांच्या घरी बाबा आहेत अस म्हटलं तर आपण सांगतो की ‘तू खालीच ये बाहेरच भेटूया’.

का असते वडिलांची एवढी भीती आपल्या मनात? |Maze Baba Nibandh in Marathi

मला वाटतं याची सुरुवात तेव्हापासून होते, जेव्हापासून घरातले सर्वजण सांगायला लागले ‘पसारा आवर बाबा येतील, अभ्यास कर नाहीतर बाबांना सांगेन, हे केलस तर बाबा रागवतील.’

हे सर्व ते आपल्याला शिस्त लावण्यासाठी करत असतील कदाचित पण त्यामुळे नकळत आपल्या मनात वडिलांविषयी आदर आणि सोबतच भीती सुद्धा तयार होत असते.

ज्या गोष्ठींसाठी आपण आईकडे बिनधास्त हट्ट करतो, बाबांना त्याविषयी विचारायला सुद्धा घाबरतो.

प्रत्येकाच्या घरी असते तीच परिस्थिति आमच्या घरीही आहे. सकाळी बाबा ऑफिससाठी निघेपर्यंत सर्व काही अगदी शिस्तीत करायच; आणि जस बाबांच पाऊल बाहेर पडले की मग आपण घरचे राजे.

मग आई कितीही ओरडू देत किंवा कितीही रागवू देत आपण मात्र आपल्या सवडीने मौज मजा करत काम करणार. संध्याकाळी बाबांची घरी यायची वेळ झाली की मग लगेच पुस्तक समोर घेऊन अभ्यासाला बसायचं.

क्लास टीचर समोर आपण निर्धास्तपणे वागतो पण प्रिन्सिपल आले की कसे शिस्तीत राहतो अगदी तसच घरीसुद्धा.

आई कडे सगळे लाड चालतात पण बाबांसमोर मात्र गुणी बाळ बनून राहावं लागत. पण धाकासोबतच बाबांचा आपल्या सर्वांना किती आधार असतो.

जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा नकळत उच्चार निघतात ‘आई ग’ पण जेव्हा प्रचंड भीत वाटते तेव्हा आपण काय बोलतो? ‘बाप रे’ कारण भीती वाटत असली की आपल्याला नकळतच वडिलांच्या आधाराची गरज भासते.

घरात किंवा कुटुंबात काहीही समस्या आली तर बाबा म्हणतात ‘तुम्ही काळजी करू नका मी बघतो काय करायच ते.’ एक साधस वाक्य पण किती धीर मिळतो बाबांच्या या बोलण्याने.

बाबा आहेत तोपर्यंत काळजी करायची काही गरज नाही. आई जर संपूर्ण घराची सेवा करत असेल तर बाबांच्या आधाराने संपूर्ण घर चालत असते.

एकदा माझे बाबा बाहेरगावी गेले होते. मला वाटले की बाबा घरी नसतील म्हणजे किती मज्जा! काहीही करा, कसही वागा, आई जास्त रागावणार नाही.

पण जस जशी संध्याकाळ होऊ लागली तशी बाबांची कमी जाणवू लागली. कधी वाटलही नव्हतं एवढी बाबांची उणीव जाणवली. सारखं वाटू लागलं की आता बाबा येतील, आता बाबा येतील.

रात्र झाली तरी शांत झोप येईना. बाबा घरी नसल्यामुळे एक विचित्र अशी भीती वाटू लागली. जेव्हा दोन दिवसानंतर बाबा घरी आले तेव्हा घर पुन्हा पूर्ववत झाले. बाबांच्या आधाराचे महत्व तेव्हा जाणवले.

बाबा म्हणजे फक्त आधारच न्हवे ते आईचे कडक स्वरूप असतात. कोणत्याही सणासुदीला, समारंभाला घरातील सर्वांना कपडे घेतात पण स्वत:ला मात्र घेत नाहीत. ‘अरे माझ्याकडे बरेच कपडे आहेत.’ असा बहाणा करतात.

घरच्यांचाच न्हवे तर त्यांच्या भाव-बहीणींचाही विचार करतात आणि सर्वांनाच आधार देतात.

आजही माझे काका, बाबांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही मोठे काम करत नाहीत. बाबा फक्त आमच्या वर्तमानाचाच नाही तर आमच्या भविष्याचा सुद्धा विचार करतात.

समाजातील एक जबाबदार व्यक्ति म्हणून मला पुढे जाऊन माझ्या वडिलांसारखे व्हायला नक्कीच आवडेल जे कधी मायेने तर कधी शिस्थीने आमचे चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करतात.

काही महत्वाचे निबंध:

निष्कर्ष – Maze Baba Nibandh in Marathi

Maze Baba Nibandh in Marathi दिलेला निबंध हा सर्व इयत्तेसाठी उपयुक्त आहे. तुम्ही हा निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता.

बाबा निबंध, माझे बाबा दहा ओळी निबंध, माझे वडील माझे प्रेरक निबंध, वडिलांविषयी माहिती, Majhe Baba Nibandh in Marathi, My Father Essay in Marathi, Majhe Baba.

तर मित्रांनो Maze Baba Nibandh in Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला खाली कमेन्ट करून नक्कीच कळवा.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment