{सर्व इय्यतेसाठी} माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh

Maza Desh Marathi Nibandh: मित्रांनो आज आपण ‘माझा देश निबंध‘ या विषयावर निबंधलेखण करणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे.

शालेय विद्यार्थ्यांना अनेकदा ‘माझा देश निबंध‘, ‘माझा भारत देश निबंध‘ या विषयांवर निबंधलेखण करावे लागते. बर्‍याचदा हा प्रश्न स्पर्धापरीक्षा आणी भाषणासाठी सुद्धा विचारला जातो.

अशा या भारत देशविषयी माहिती देण्यासाठी आम्ही Maza Desh Nibandh घेऊन आलो आहोत.

चला तर मग सुरुवात करूया… Maza Desh Marathi Nibandh

माझा देश निबंध १० ओळी | Maza Desh Nibandh 10 Line

maza desh nibandh dakhva
  1. माझ्या देशाचे नाव भारत आहे.
  2. हे आशिया खंडात स्थित आहे.
  3. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.
  4. माझा भारत देश हा जगभरात प्रसिद्ध देश आहे.
  5. भारताची राष्ट्रभाषा हिन्दी आहे. |Maza Bharat Desh Nibandh in Marathi
  6. भारत देश हा जगातील ७ व सर्वात मोठा देश आहे.
  7. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
  8. भारताच्या उत्तरेस महान हिमालय आहेत.
  9. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव तिरंगा आहे. |Maza Desh Nibandh
  10. माझा भारत देश मला प्रिय आहे.

माझा प्रिय भारत निबंध ३०० शब्द |Maza Desh Marathi Nibandh

Maza Desh Marathi Nibandh for Class 8 to 12:

“जहाँ डाल-डाल पर,
सोने की चिडिया
करती है बसेरा,
ओ भारत देश है मेरा..
ओ भारत देश है मेरा|”

या कवितेच्या ओळया असतील किंवा “सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा|” या ओळी जगाच्या पाठीवरील अतिविशाल व अनेक महान प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या भारत देशाचे वर्णन करायला पुरेशा आहेत.

सार्‍या जगाला शांतता, समृद्धी, योगा, आयुर्वेद, महान परंपरा, आणि विविधेतून एकतेची शिकवण देणारा भारत देश आपल्या सर्वांसाठी अभिमानाचे आणि गर्वाचे स्फुरण आहे.

२८ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेश असलेल्या आपल्या भारत देशाला संघर्षाचा इतिहास आहे. सार्‍या जगाला हेवा वाटणारी नैसर्गिक संपदा, श्रीमंती, समृद्धी याकडे आकृष्ट होत अनेक परकीय सत्तांनी भारतावर आक्रमण केले. |Maza Desh Nibandh

मुघल सत्तेपासून तर ब्रिटीशांपर्यंत अनेक परकीय सत्तांनी श्रीमंती, वैभव व द्यान लुटण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी लादलेल्या एकशे पन्नास वर्षांच्या गुलामीतून मुक्त्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची बाजी लावली. त्यांच्या या बलिदानातूनच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

संपूर्ण जगामध्ये भौगोलिक निसर्गसंपदेने नटलेला आपला भारत उत्तुंग हिमालयापासून तर निसर्गसंपन्न कन्याकुमारीपर्यंत खुलून दिसतो. जगातल्या अनेक पर्यटकांना भुरळ घालतो.

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या रूपाने आपली एक वेगळी ओळख आहेच. भारतीय संविधानानुसार आपण सर्वधर्म समभावाचे तत्व अंगिकारले आहे.

संस्कृती, भाषा, आचार, विचार, पोशाख, जात, धर्म, वंश, परंपरा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विविधेतून साकारलेली “फक्त भारतीय” असल्याच्या उदात्त भावनेतून दृगोचर झालेली “विविधेतून एकता” संपूर्ण जगामध्ये अवर्णीय ठरते.

भारतातल्या प्रत्येक राज्याची स्वत:ची ओळख, वैशिष्टे आहेत. आज भारताची जागतिक महसत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. Maza Desh Nibandh in Marathi Language

थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी Vision 2020 हे भारतीय महासत्तेचे स्वप्न पाहिले. स्वामी विवेकानंदानी भारताच्या सहिष्णुतेचे दर्शन सार्‍या जगाला घडविले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर व महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलर यांनी भारतीय गुणवैशिष्ट्यांना जागतिक स्वरूप प्राप्त करून दिले.

नद्यांना स्वर्गीय सौंदर्यातून व साधन संपत्तीतून भारताला कृषि व समृद्धीच्या बाबतीत झळाळी प्राप्त झाली आहे. (Maza Desh Marathi Nibandh)

कवि अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे..

“भारत कोई जमीन का
साधारण तुकडा नहीं है,
ये तो जिता जागता
राष्ट्रपुरुष है..
हम जीयेंगे तो इसके लिये,
हम मरेंगे तो इसके लिये|”

या ओळी प्रत्येकाच्या आपल्या देशविषयी असलेल्या भावनांचे प्रतीक आहेत.

असे असले तरी कधीकधी आपला देश दुष्काळ, महापूर, चक्री वादळे, शेजारील राष्ट्रांचे आक्रमण, कोविड 19 च्या महामारी यांसारख्या संकटांनी हादरतो.

जातीय संघर्ष, धार्मिक वितंडवाद, दहशतवाद, प्रांतवाद, या देशाच्या स्थैर्याला व शांततेला आव्हान देतात.

वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याच्या व रोजगाराच्या समस्या निर्माण होतात. परंतु असे असले तरीही भारत हा सतत नव्या उर्जेने मार्गक्रम करीतच राहतो. |Maza Bharat Desh Nibandh in Marathi

प्रत्येक भारतीयाला सतत भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. म्हणूनच या देशातला प्रत्येक नागरिक देशासाठी कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी व प्रसंगी बलिदान देण्यासाठी सिद्ध असतो.

देशातले तरुण आणि लहान बालके या देशाच्या उज्ज्वल भविष्याची पेरणी करत आहेत.

म्हणूनच शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते..

माझा देश.. भारत माझा महान!

हे देखील वाचा:

माझा देश माझा अभिमान निबंध |Maza Bharat Desh Nibandh in Marathi

Maza Desh Nibandh Class 1 to 7

“नव्या युगांचे – नव्या दिशांचे,
गीत, सुर हे गाती..
या मंगल देशाचे आहे,
भविष्य आमच्या हाती !!”

माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारताला हिंदुस्तान असेही म्हणतात. माझ्या देशाची लोकसंख्या सुमारे १ अब्ज २१ कोटी आहे. अनेक भाषा आणि बोली बोलणारे लोक येथे राहतात.

माझा देश धार्मिक विविधतेचा देश आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादि धर्माची लोक येथे एकजुटीने राहतात.

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. |Maza Desh Marathi Nibandh

भारताची सभ्यता आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारावून गेल्याने दरवर्षी लाखो परदेशी नागरिक येथे भेट देण्यासाठी येतात.

अनेक संत, महात्मे येथे जन्माला आले आहेत. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, कबीर, गांधी इत्यादी महापुरुष आपले आदर्श आहेत.

महान हिमालयाने संरक्षित आणि पवित्र गंगेने सिंचित केलेला आपला भारत हा एक स्वतंत्र स्वावलंबी देश आहे.

माझा देश लोकशाहिच्या तत्वावर चालत. इथे सर्वांना प्रगतीच्या समान संधी आहेत.

भारत वेगाने पुढे जात आहे. निरक्षरता, गरीबी, बेरोजगारी इत्यादी समस्यां विरुद्ध माझा भारत देश खंबीरपणे लढत आहे. |Maza Bharat Desh Nibandh in Marathi

माझ्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत.

भारतातील नागरिकांना आशा आहे की माझ्या देशाला त्याचे प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त होईल आणि एक दिवस माझा देश विश्वगुरु बनेल.

माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे.

माझा देश निबंध मराठी 9वी |Maza Bharat Desh Marathi Nibandh

Maza Desh Essay in Marathi

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे||
जरासे राहू द्या…

भारत माझा देश आहे. भारत देश हा आपली संस्कृती व सभ्यतेसाठी विश्वभरात ओळखला जातो. माझा भारत सुंदर व महान आहे. भारत देश हा आशिया खंडात आहे.

भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेस हिमालय पर्वत व दक्षिणेस हिंदी महासागर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगत सातवा क्रमांक आहे.

भारताची राजधानी दिल्ली आहे. माझ्या भारत देशाचे (Maza Desh Nibandh) राष्ट्रगीत जन-गण-मन आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ व राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

भारतात अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, व पर्यटन स्थळे आहेत.

माझा भारत कृषिप्रधान देश आहे. तसेच भारतातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे.

भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. विविध एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्ये आहे. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. येथे अनेक भाषा बोलल्या जातात.

माझा भारत देश अनेक ऋषि मुनी, संत, कलावंत, साहित्यिक, खेळाडू, शूरवीर, यांची जन्मभूमी व कर्मभूमि आहे.

खरोखच माझा भारत महान आहे. (Maza Desh Marathi Nibandh)

मी माझ्या भारत देशावर खूप प्रेम करतो. मी भारतीय असल्याचा मला सदैव अभिमान राहील.

काही महत्वाचे निबंध:

निष्कर्ष: Maza Desh Essay in Marathi

तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला ‘माझा देश निबंध‘ |Maza Bharat Desh Nibandh in Marathi?

जर तुम्हाला माझा भारत देश निबंध आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Maza Desh Bharat Marathi Nibandh मध्ये काही चुका असल्यास तसेच तुम्हाला हवा असलेला निबंध आमच्या वेबसाइट वर उपलब्ध नसल्यास आम्हाला ते नक्कीच कमेन्ट करून कळवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment