प्रसंग लेखन मराठी 8वी, 9वी, 10वी | Prasang Lekhan in Marathi

Prasang Lekhan in Marathi: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित मराठी व्याकरणातील एक महत्वाचा घटक म्हणजेच प्रसंग लेखन Prasang Lekhan विषयाचा अभ्यास करणार आहोत.

आपल्या सोबत घडलेल्या, अनुभवलेल्या किंवा आपण पाहिलेल्या व्यक्तींचे, वस्तूंचे, घटनांचे हुबेहूब वर्णन इतरांना सांगणे किंवा लिहिणे याचा प्रसंग लेखनामध्ये समावेश होतो.

परीक्षेमध्ये 8 गुणांसाठी प्रसंग लेखनावर आधारित प्रश्न विचारला जातो त्यामुळे आकर्षक पद्धतीने Prasang Lekhan कसे करावे याबद्दल सखोल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

प्रसंग लेखन म्हणजे काय? Prasang Lekhan in Marathi

आपण पाहिलेला एखादा प्रसंग, एखादे दृश्य त्याचे हुबेहूब केलेले लेखन, शब्दचित्र म्हणजेच प्रसंग लेखन prasang lekhan in marathi होय.

प्रसंग लेखनामध्ये केवळ बाह्यवर्णन करणे अपेक्षित नसते तर त्या प्रसंगातून बघणार्‍या व्यक्तीच्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या, कोणते विचार आले याचे वर्णन करणे अपेक्षित असते.

प्रसंग लेखन नमुने: prasang lekhan in marathi 10th class, prasang lekhan in marathi 9th class, prasang lekhan in marathi 8th class

प्रसंग लेखन करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा

  • प्रसंग लेखन हे तुमच्या स्वत: च्या विचाराने आणि स्वत:च्या शैलीत लिहिलेले असावे.
  • प्रसंग लेखनाची रचना मुद्देसूद असली पाहिजे.
  • Prasang Lekhan सुरुवात आकर्षक असली पाहिजे.
  • भाषा ही विषयाला शोभेल अशी असली पाहिजे. समाजातील संदर्भ, मोठ्या व्यक्तींचे विचार, चालू घडामोडींवरील समर्पक उल्लेख त्यात आला असावा.
  • Prasang Lekhan करताना भाषा ही सुंदर, अर्थपूर्ण, रचनात्मक, म्हणी व वाक्प्रचार यांचा वापर करून स्पष्टपणे अर्थ व्यक्त करणारी असावी.
Note ⇒ प्रसंग लेखनाचे खाली दिलेले काही नमुने निबंध स्वरुपात आहेत. तरी विद्यार्थ्यांनी शब्द रचना बदलून हवे तसे बदल करून प्रसंग लेखन करावे. 

1. प्रसंग लेखन मी पाहिलेला अपघात

Prasang Lekhan in Marathi 10th ClassPrasang lekhan in marathi mi pahilela apghat

एकदा मी नेहमीप्रमाणे सकाळी माझ्या मित्रांसोबत शाळेत जात होतो. मी आणि माझे मित्र गप्पा मारत चाललो होतो. शाळेत जाण्याचा आमचा नेहमीचा रस्ता. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती.

शाळेजवळ गेल्यावर अचानक मला मोठा आवाज ऐकू आला. काय झाले हे पाहण्यासाठी लोक धावू लागले. रस्त्यावर लोकांची खूप गर्दी जमा झाली. एका वाहन चालकाचे मोठ्या वळणावर गाडीचा ताबा सुटला होता आणि तो रस्त्यावरील एका खांब्यावर आदळला होता.

मी व माझे मित्र आम्ही धावत तेथे गेलो. चालक खूप गंभीर जखमी झाला होता. लोकांनी त्याला कारमधून बाहेर येण्यास मदत केली. त्याच्या कपाळावर एक मोठी जखम झाली होती आणि खूप रक्तस्राव होत होता.

गर्दीमधील एका माणसाने त्याच्या घरातील मंडळींना अपघाताची सूचना दिली व त्याला लगेच एका कारमधून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.

जोरदार धडकेमुळे गाडीचा चक्काचूर झाला होता. जमावामधील एका व्यक्तीने पोलिसांना अपघात झाल्याचे कळवले. लगेच तेथे वाहतूक पोलिसांचे पथक आले आणि त्यांनी जमावाला दूर केले. मग त्यांनी त्यांचा तपास चालू केला. तो एक भयानक अनुभव होता. अजूनही मी त्या अपघाताच्या आठवणीने माझा थरकाप उडतो.

2. प्रसंग लेखन अकस्मात पडलेला पाऊस

Prasang Lekhan in Marathi 9th ClassPrasang lekhan in marathi akasmat padlela paus

१७ जूनला आमची शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाली म्हणजे नवे कपडे, नवी पुस्तके, नवीन डबा सार काही नवं. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. संपूर्ण उन्हाळा अंगाची लाही लाही झाली होती.

पहिलाच दिवस असल्याने आम्ही सर्व शाळेत खूप आनंद घेत होतो. सुट्टीत काय काय केलं हे आम्ही आमच्या शिक्षकांना सांगत होतो. अचानक वातावरणात बदल झाला. थंडगार वारा शरीराला स्पर्श करून जाऊ लागला. त्या हवेचे हवेचे रूपांतर वावटळीत झाले. ढगांचा गडगडाट आणि प्रचंड पावसामुळे सारे वातावरण बिघडून गेले.

आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली होती आणि मुसळधार पाऊस पडू लागला. मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. परिसरातील लोकांची एक प्रकारची धांदल उडाली.

जो तो आपला जीव वाचावा यासाठी सुरक्षित जागी जाऊ लागला. थंडगार सरीचा स्पर्श करण्यासाठी मी शाळेतील खिडकीतून हात बाहेर काढला आणि पावसाला स्पर्श केला. थंडगार पाणी माझ्या हाताला स्पर्श करून जात होते. शाळा सुटण्याची वेळ झाली होती.

आता घरी कसे जायचे हा मनात प्रश्न होता. पण हा अविस्मरणीय प्रसंग मला प्रत्येक्षात अनुभवायचा होता. म्हणून मी शाळा सुटण्याची वाट पाहू लागलो. शेवटी भर पावसात शाळा सुटली. सर्व पालक आपापल्या मुलांना घेऊन जाऊ लागले. मी मात्र घर जवळ असल्याने पावसातच घरी पळत सुटलो पण समोर आईला पाहून खूप घाबरलो.

आईने माझ्यासाठी छत्री आणली होती. सारे वातावरण थंड झाले होते. सारे प्राणी, पक्षी, झाडे आनंदाने डोलत होते. या पावसाने सार्‍यांच्याच चेहर्‍यावर समाधान आणि आनंद आणला होता.

3. प्रसंग लेखन माझे बालपण

Prasang Lekhan in Marathi 8th ClassPrasang lekhan in marathi maze baalpan

आसपासच्या मुलांना कधी खेळताना पाहिले की, माझ्या लहानपणीच्या आठवणींना पाझर फुटतो. आणि मग त्यांमध्ये मी हरवून जातो. मला माझे सगळे बालपण नक्कीच आठवत नाही. पण जेव्हा कधी या आठवणी आठवतात त्या मनाला फार सुखावतात. कितीतरी आठवणींनी माझे बालपण सजले आहे.

एकदा आमच्या विहीरीतला गाळ काढण्याचे काम चालू होते. माझे बाबासुद्धा विहिरीत उतरले होते. मी काकुळतीला येऊन मलाही विहिरीत उतरवायला सांगत होते, मग बाबांना अचानक काहीतरी सुचले. माझ्या काकांना त्यांनी सांगितले की एका बादलीला रस्सी बांध आणि त्यातून त्याला खाली सोड.

मग मी एखाद्या सम्राटासारखा विहिरीत उतरलो होतो. त्या वेळी मित्रांचा गोंगाट आणि ओरडणे मला अजूनही चांगलच आठवतयं.

एकदा झाडावर चढलो. थोडे उंचीवर गेल्यानंतर खाली बघितले आणि रडायला सुरुवात केली. मित्रांनी केवढी थट्टा केली! नदीवर पोहायला गेलो असताना पाण्याच्या भीतीने तिकडून पळत सुटलो. माकडांनी एकदा हातातील भाकरी पळवली तेव्हा परत कधी माकड दिसले तर लांबूनच पळायचो.

मी लहान होतो तेव्हा खूप खेळायचो. मोबाईल म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नव्हतं. त्यामुळे मैदानी खेळात आमचा खूप रस होता.

लहानपणीची शाळा आठवली की त्याच आठवणीमध्ये रमन होऊन सर्व गोष्टी आठवतात. मित्रांच्या डब्यातून जेवण करायची वेगळीच मज्जा. जेवायची वेळ झाली की क्रिकेटची बॅट आणि बॉल घेऊन मैदानावर जाऊन खेळायचं. हे सर्व मला चांगल्या प्रकारे आठवते.

जसं जसं मोठे होत गेलो तसतसा आनंद कमी होऊ लागला. आठवीनंतर थोड बालपण कमी झाल्यासारख वाटायला लागलं आणि नंतर मग दहावीमध्ये गेल्यानंतर जास्त टाईम अभ्यासातच गेला. माझे बालपण खूप आनंदात गेले आणि ते मजेचे क्षण मला अजूनही आठवत आहेत.

4. प्रसंग लेखन मराठी कौतुक सोहळा

Prasang Lekhan in Marathi Prasang lekhan kautuk sohala (Prasang lekhan mi anubhav le la kautun sohala)

‘लेकी वाचवा’ अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोहित पाटील याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे; त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन!

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी बक्षीस समारंभाच्या वेळी चषक देऊन माझे खास कौतुक केले. माझे लेखन आणि वाचनकौशल्य, अभ्यासू वृत्ती इत्यादि गुणांचेही कौतुक केले गेले. त्यामुळे माझे आईवडीलही माझ्यावर खूप खुश झाले होते.

माझ्या आईवडिलांनी लहानपणापासूनच विविध प्रेरणादायी पुस्तके, वृत्तपत्रे वाचण्याची प्रेरणा दिली. सिंदबादच्या सफरी, महाभारत, रामयणपर्यंतची पुस्तके नेहमी वाचनात आली. यातून माझे लेखन आणि विचार करण्याची क्षमता ही खूप वाढली. आणि मी लिहीत गेलो. त्यातील काही लेखक शाळेच्या वार्षिकात छापले गेले. माझा हुरूप त्यामुळे वाढला.

दहावीत गेल्यानंतर मी शाळेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेतला आणि लिखानावर विशेष प्राधान्य दिले. त्यामुळे आजच्या कौतुक सोहळा यासाठी मी पात्र ठरलो आहे.

मी मांडलेल्या या विचारांचे सगळ्यांनी कौतुक केले. कृतज्ञता व्यक्त करताना माझ्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणार्‍या पालक व शिक्षक यांचे मी मनापासून आभार मानले.

5. प्रसंग लेखन परितोषिक वितरण समारंभ

Prasang Lekhan in MarathiPrasang lekhan in marathi paritoshik vitaran samarambh

दरवर्षी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. विशेषत: पावसाच्या दिवसांत ‘इनडोअर गेम्स’ सुरू होतात. खेळात स्वत: भाग घेताना जितका आनंद वाटतो, तितकाच आनंद दुसर्‍याला प्रोत्साहन देण्यातही मिळतो.

खेळांच्या स्पर्धांबरोबरच वक्तृत्व, काव्यगायन तसेच कथाकथनाच्याही स्पर्धा होतात. दुसर्‍या सत्रात मैदानी खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यांत काही सांघिक स्पर्धा असतात, तर काही वैयक्तिक स्वरुपाच्या असतात.

स्पर्धेत कुणीतरी विजयी होणार, कुणीतरी हरणार हे निश्चितच! मात्र सांघिक विजयाचा जल्लोष आगळावेगळाच! डिसेंबर महिना आला की, स्नेहसंमेलनाचे दिवस येतात. वर्गावर्गांचे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमांमध्ये वेशभूषेचा कार्यक्रम औरच रंगत आणतो.

या सर्व प्रकारच्या स्पर्धा पार पडल्यावर सर्वांना हवाहवासा वाटणारा शाळेच्या बक्षीस समारंभाचा दिवस उजाडतो. बक्षीस समारंभाच्या दिवशी शाळा सजवली जाते. मुलांच्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्यात येते.

शाळेच्या मैदानात मोठे व्यासपीठही उभारलेले असते. आमच्या शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभाची वेळ संध्याकाळी होती; पण दुपारपासूनच विद्यार्थी, पालक आणि पाहुणे मंडळी जमू लागली. साडेपाच वाजता पाहुणे आले, तेव्हा शाळेच्या घोषपथकाने त्यांचे स्वागत केले. ईशस्तवन, स्वागतगीत आणि दोन-चार करमणुकीच्या कार्यक्रमानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आमच्या मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रथम त्यांनी शाळेच्या प्रगतीबाबत थोडक्यात माहिती सांगितली. मग परितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. शाळेत झालेल्या विविध स्पर्धांतील विजयीवीरांची नावे पुकारली जात होती.

यशस्वी विद्यार्थी व्यासपीठावर जाऊन आपले बक्षीस स्वीकारत होते. त्यावेळचा विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद अवर्णीनीय होता. शाळेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून दहावीतील एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती. पाहुण्यांनी जेव्हा त्याचा सत्कार केला, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्यांना बक्षिसे मिळाली नव्हती, त्यांचे चेहरे निराशेने झाकोळलेले दिसत होते.

विद्यार्थ्यांना नव्या पराक्रमासाठी प्रेरणा देणार्‍या अशा समारंभांची खरोखरच अत्यंत गरज आहे, याची मला या बक्षीस समारंभामुळे खात्री पटली.

अधिक वाचा >>

सारांश: Prasang Lekhan

विद्यार्थ्यांनो, मराठी व्याकरण आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि उत्तम शब्दरचना, प्रभावी प्रसंग लेखन करण्यासाठी तुम्हाला सरावाची जास्तीत जास्त गरज आहे. त्यासाठी तुम्ही नियमितपणे वाचन-लेखन करत रहा जेणेकरून Prasang Lekhan in Marathi तुम्ही अगदी सहजपणे लिहू शकता.

प्रसंग लेखन विषय काही शंका असल्यास तसेच तुम्हाला हवे असलेले प्रसंग लेखन नमुने यामध्ये नसल्यास आम्हाला कमेंट करून कळवा. याव्यतिरिक्त अधिक महितीसाठी तुम्ही आमचा विद्यार्थी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता.

Leave a Comment