Vibhakti in Marathi: मराठी व्याकरणातील विभक्ती व विभक्तीचे प्रकार याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. स्पर्धा परीक्षा, नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा अशा अनेक परीक्षांमध्ये विभक्ती प्रत्यय ओळखा तसेच विभक्तीचे उदाहरण आधारित प्रश्न विचारले जातात.
मराठी व्याकरणाचे पुरेसे ज्ञान नसल्याने आपण हातातले गुण गमावून बसतो. आज आपण विभक्ती म्हणजे काय, द्वितीय चतुर्थी विभक्ती फरक, तसेच विभक्ती प्रत्यय तक्ता पाहणार आहोत.
विभक्ती म्हणजे काय मराठी
नाम, सर्वनाम, विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या रूपाने दाखविले जातात, त्यांना विभक्ती |Vibhakti in Marathi असे म्हणतात.
तसेच, शब्दांना जोडल्या जाणार्या अक्षरांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात.
विभक्ती व विभक्तीचे प्रकार
Vibhakti in Marathi: विभक्तीचे एकूण आठ प्रकार पडतात.
1. प्रथमा विभक्ती – प्रथमा विभक्ती मध्ये नाम किंवा सर्वनामाला कोणताही प्रत्यय लागत नाही. उदा. फळ, फूल
2. द्वितीया विभक्ती – द्वितीया विभक्ती मध्ये एकवचन नामास ‘स, ला, ते‘ तसेच अनेकवचन नामास ‘स, ला, ना, ते‘ असे प्रत्येय लागतात. उदा. फळास, फळांना
3. तृतीया विभक्ती – तृतीया विभक्ती मध्ये एकवचन नामास ‘ने, ए, शी‘ तसेच अनेकवचन नामास ‘नी, शी ही‘ असे प्रत्येय लागतात. उदा. फळाने, फुलाने, फुलाशी
4. चतुर्थी विभक्ती – चतुर्थी विभक्ती मध्ये एकवचन नामास ‘स, ला, ते‘ तसेच अनेकवचन नामास ‘स, ला, ना, ते‘ असे प्रत्येय लागतात. उदा. फुलास, फळांस, फुलांना
5. पंचमी विभक्ती – पंचमी विभक्ती मध्ये एकवचन व अनेकवचन नामास ‘ऊन, हून‘ असे प्रत्येय लागतात. उदा. फळातून, फळाहून, फुलातून
6. षष्ठी विभक्ती – षष्ठी विभक्ती मध्ये एकवचन व अनेकवचन नामास ‘चा,ची, चे, च्या‘ असे प्रत्येय लागतात. उदा. फळाचा, फळाचे, फुलांची, फुलांच्या
7. सप्तमी विभक्ती – सप्तमी विभक्ती मध्ये एकवचन व अनेकवचन नामास ‘त, ई, आ‘ असे प्रत्येय लागतात. उदा. फळात, फुलांत
8. संबोधन विभक्ती – संबोधन विभक्ती हे प्रथमे चेच रूप मानले जाते. त्याचा क्रियापदाशी काहीही संबंध नसतो. (यामध्ये कुठलेच प्रत्येय येत नाही)
द्वितीय चतुर्थी विभक्ती फरक
Vibhakti in Marathi: द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती मध्ये प्रत्येय सारखे असल्यामुळे या प्रकारचे विभक्ती उदाहरण ओळखताना अनेकदा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो.
आता आपल्याला माहीत आहे की प्रत्येय बघून आपण विभक्तीचे प्रकार ठरवतो, परंतु द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती मध्ये मात्र प्रत्येय सारखेच (स, ला, ना, ते) आहे.
तर मग नेमकं द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती कसं ओळखावं?
चला तर मग द्वितीय चतुर्थी विभक्ती फरक नीटपणे समजून घेवू. यासाठी विद्यार्थ्यांना वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता येणे महत्वाचे आहे.
- जर वाक्यात कर्माला ‘स, ला, ना, ते’ प्रत्येय लागत असेल म्हणजेच जर कारकार्थ कर्म असेल तर ते वाक्य द्वितीय विभक्तीचे असते.
- कर्म सोडून इतर शब्दांना जर ‘स, ला, ना, ते’ प्रत्येय लागत असेल तर ते चतुर्थी विभक्ती असते.
उदाहरणे:
- त्याने कुत्र्याला मारले. (द्वितीय)
- तो गाडीस लटकून गेला. (चतुर्थी)
- त्याच्या डोळ्याला धार लागली. (चतुर्थी)
- तो पुण्याला गेला. (चतुर्थी)
विभक्ती प्रत्यय तक्ता
विभक्ती आणि विभक्ती प्रकार समजून घेण्यासाठी तुम्ही विभक्ती प्रत्यय तक्ता पाठ करून ठेवू शकता. ‘झाड’ शब्द वापरुन तयार केलेला खालील विभक्ती तक्ता पहा.
विभक्ती | एकवचन प्रत्येय | अनेकवचन प्रत्येय | उदाहरणे |
---|---|---|---|
प्रथमा | – | – | झाड, झाडे |
द्वितीया | स, ला, ते | स, ला, ना, ते | झाडास, झाडांना |
तृतीया | ने, ए, शी | नी, शी, ई, ही | झाडाने, झाडांशी |
चतुर्थी | स, ला, ते | स, ला, ना, ते | झाडास, झाडांना |
पंचमी | ऊन, हून | ऊन, हून | झाडाहून, झाडांहून |
षष्ठी | चा, ची, चे | चा, ची, चे | झाडाचा, झाडांचा |
सप्तमी | त, ई, आ | त, ई, आ | झाडात, झाडांत |
संबोधन | – | नो | झाडा, झाडांनो |
हे देखील पहा >> क्रियापद व त्याचे प्रकार | Kriyapad in Marathi
विभक्ती प्रत्यय ओळखा
Vibhakti in Marathi: स्पर्धा परीक्षांमध्ये विभक्ती विषयावर अनेकदा विचारले गेलेले काही महत्वाचे प्रश्न सरावसंच.
1. ‘फुलांनी’ या शब्दातील विभक्तीचा प्रकार कोणता? (अमरावती २०१२)
2. बापाने मुलीला शाळेत घातले. या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? (नागपूर २०१२)
3. कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? (वाशिम २०१२)
4. ‘पुण्याहून’ या शब्दातील विभक्ती कोणती? (हिंगोली २०१२)
5. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते? (वर्धा २०१३)
6. विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे? (नागपूर २०१३)
7. तृतीया विभक्ती प्रत्यय कोणते? (रायगड २०१३)
8. पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा – पावसाचा काही भरवसा नाही. (रायगड २०१३)
9. ‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती? (उस्मानाबाद २०१४)
10. वाक्यातील विभक्ती ओळखा – सरला माधुरीपेक्षा उंच आहे. (यवतमाळ २०१४)
11. कर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? (यवतमाळ २०१४)
12. ‘मी तिला पुस्तक दिले’ हे कोणते कारक आहे? (नागपूर २०१४)
13. पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा – मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले. (गडचिरोली २०१४)
पुढे वाचा:
- अव्यय मराठी व्याकरण | Avyay in Marathi
- समास मराठी व्याकरण | Samas in Marathi
- प्रयोग मराठी व्याकरण | Prayog in Marathi
- अलंकार मराठी Alankar in Marathi
- शब्दांच्या जाती | Shabdanchya Jati
सारांश: Vibhakti in Marathi
विद्यार्थ्यांना आता विभक्ती व विभक्तीचे प्रकार | Vibhakti in Marathi नीटपणे समजले असेल अशी आम्हाला खात्री आहे.
परीक्षेदृष्टीने एक-एक गुण महत्वाचा आहे त्यामुळे मराठी व्याकरणाचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला Vibhakti in Marathi वर लिहिलेला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच, लेखात काही चुका आढळल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.
Good mam
धन्यवाद! अधिकाधिक माहितीसाठी आमच्या साईट ला सतत भेट देत रहा.
Thank You Mam….🙏
Kk
Khup Chan & easy aahe explanation
धन्यवाद स्नेहल.
Very nice
Thank you, Sanjay.