क्रियापद व त्याचे प्रकार | Kriyapad in Marathi

Kriyapad in Marathi: आज आपण मराठी व्याकरणातील क्रियापद या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला क्रियापद काय आहेक्रियापदाचे प्रकार माहित असणे महत्वाचे आहे.

MPSC राज्यसेवा, तलाठी भरती, पोलिस भरती, स्कॉलरशिप परीक्षा, तसेच नवोदय परीक्षा अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये क्रियापदांवर आधारित प्रश्न नक्की विचारले जातात.

आपण जरी मराठी माध्यमातून शिकलेलो असलो तरी व्याकरणाचे पुरेसे ज्ञान नसल्याने आपण परीक्षांमध्ये हातातले गुण गमावून बसतो.

चला तर मग आज अगदी सोप्या भाषेत क्रियापद Kriyapad in Marathi, क्रियापदाचे प्रकार आणि क्रियापदाची उदाहरणे जाणून घेवूयात.

क्रियापद म्हणजे काय?

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो वाक्याच्या शेवटी येतो त्याला क्रियापद | Kriyapad in Marathi असे म्हणतात. क्रिया दर्शविणे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणे, काळ दर्शविणे, हे क्रियापदाचे कार्य असते.

उदाहरणार्थ, 1) सचिन क्रिकेट खेळतो. 2) शेतकरी शेतात राबतात.

वरील उदाहरणांमध्ये खेळतो आणि राबवतो हि क्रियापदे आहे.

क्रियापदाचे प्रकार

Kriyapad in Marathi – क्रियापदाचे मुख्यत: दोन प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद.

अ) सकर्मक क्रियापद | Sakarmak Kriyapad

सकर्मक क्रियापदामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते.

ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची / क्रियेची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

सकर्मक क्रियापद उदाहरणे

  1. गणेशने पतंग उडवला. (पतंग उडवण्याची क्रिया)
  2. श्वेताने फणस खाल्ले. (फणस खाण्याची क्रिया)
  3. दादाने सायकल आणली. (सायकल आणण्याची क्रिया)
  4. सविताने पेटी वाजवली. (पेटी वाजवण्याची क्रिया)

वरील उदाहरणांमध्ये उडवला, खाल्ले, आणली, आणि वाजवली हि सकर्मक क्रियापदे आहेत.

ब) अकर्मक क्रियापद | Akarmak Kriyapad

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ –

  • मी रस्त्यात पडलो.
  • दादा घरात आला.
  • सुनीता उद्या येईल.

सकर्मक आणि अकर्मक क्रियापद कसे ओळखावे?

सकर्मक अकर्मक म्हणजे काय – मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरणातील काही विषय अगदी नीटपणे समजून घ्यायचे असतील विशेषत: प्रयोग तर तुम्हाला वाक्यातील सकर्मक आणि अकर्मक क्रियापद ओळखता येणे गरजेचे आहे.

त्यामुळे या विषयावर आम्ही अधिक भर दिला आहे जेणेकरून तुम्ही ते सहजपणे ओळखू शकता.

आता आपण शिकलो की वाक्यात कर्म असेल तर ते सकर्मक क्रियापद आणि जर कर्म नसेल तर ते अकर्मक क्रियापद होय.

पण, वाक्यात कर्म आहे की नाही ते कस ओळखायचं?

त्यासाठी आम्ही खाली काही ट्रिक्स दिल्या आहेत ज्या वापरुन तुम्ही अगदी सहजपणे वाक्य नेमकं कोणत आहे ते ओळखू शकता.

वाक्यातील कर्ता शोधणे – वाक्यातील क्रियापद शोधून त्याला ‘णारी, णारा, णारे’ हे प्रत्यय लावून प्रश्न विचारा.

वाक्यातील कर्म शोधणे – कर्त्याला ‘काय, कोणाला, कोणाचं’ हे प्रश्न विचारा.

चला तर मग काही उदाहरणे पाहुयात आणि दिलेल्या ट्रिक्स वापरुन वाक्याचे प्रकार शोधूयात.

Kriyapad Examples in Marathi

  • उदाहरण 1. आई भाजी आणते.

वरील वाक्यात ‘आणते’ या क्रियापदाला ‘आणणारी कोण?’ हा प्रश्न विचारल्यास आपल्याला ‘आई’ हे उत्तर मिळते. म्हणजेच या वाक्यात ‘आई’ हा शब्द कर्ता आहे.

आता कर्त्याला ‘काय आणते?’ हा प्रश्न विचारल्यास आपल्याला उत्तर ‘भाजी‘ असे मिळते म्हणजेच हे वाक्यातील कर्म झाले.

आत, या वाक्यात कर्म आहे म्हणजेच हे वाक्य सकर्मक आहे.

  • उदाहरण 2. रमेश छान लिहतो.

आता या वाक्यात ‘लिहणारा कोण?’ तर रमेश (कर्ता). रमेश काय/कोणाला/कोणास लिहतो असा प्रश्न विचारल्यास ‘छान’ हे उत्तर बरोबर येत नाही त्यामुळे या वाक्यात कर्म नाही.

आणि म्हणूनच हे वाक्य अकर्मक आहे.

  • उदाहरण 3. विदूषक प्रेक्षकांना हसवतो.

या वाक्यात ‘हसवणारा कोण?’ विदूषक (कर्ता). ‘कोणाला हसवतो?’ प्रेक्षकांना (कर्म).

आणि वाक्यात कर्म आहे म्हणजे ते वाक्य सकर्मक वाक्य आहे.

लक्षात घ्या: या ट्रिक्स ना काही अपवाद सुद्धा आहेत. वाक्यामध्ये काही क्रियापदे अशी असतात जी मूळची अकर्मक असतात आणि ती वाक्यामध्ये आल्यास ते वाक्य सकर्मक भासते. 
  • उदाहरण 4. मला दूध आवडते.

आता वरील वाक्यामध्ये ‘आवडणारे कोण?’ दूध (कर्ता), पण जरी ‘काय/कोणाला/कोणास’ हे ‘मला’ या शब्दासाठी बरोबर वाटत असले तरी ते कर्म नाही कारण दुधाची क्रिया ही माझ्यावर म्हणजेच ‘मला’ या शब्दावर होत नाही.

आणि म्हणूनच हे अकर्मक क्रियापद आहे.

Kriyapad in Marathi: जर वाक्याच्या शेवटी 'आवडते, आवडतो, आवडतात, आहे, असतो, पाहिजे, वाटते' ही क्रियापदे वाक्यात मुख्य क्रियापदासारखे काम करत असतील तर ते वाक्य अकर्मक असते. 

त्यामुळे कृतीपत्रिकेत दिलेले वाक्य सकर्मक आहे की अकर्मक हे ओळखण्यासाठी तुम्हाला नियमित सरावाची गरज आहे.

क्रियापदाचे अन्य प्रकार

Kriyapad in Marathi: क्रियापदाचे काही अन्य प्रकार सुद्धा आहेत. चला तर मग त्यांचाही अभ्यास करून घेऊ.

1. द्विकर्मक क्रियापद

द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय? – ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) आजीने नातीला गोष्ट सांगितली. 2) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात.

2. उभयविध क्रियापद

जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते, त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात.

उदा. त्याने गाडीचे दार उघडले. त्याच्या गाडीचे दार उघडले.

3. सहाय्यक क्रियापद

जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धतुसाधिताला सहाय्य करणार्‍या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात.

उदा. 1) राम सकाळी खेळत असतो. 2) पक्षी गाणे गाऊ लागले.

4. संयुक्त क्रियापद

धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

संयुक्त क्रियापद उदाहरण – घरासमोर मुले खेळू लागली.

या वाक्यामध्ये ‘खेळू’ हे धातुसाधित तर ‘खेळू’ हे सहाय्यक क्रियापद आहे.

5. प्रयोजक क्रियापद

जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्‍या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो, त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.

उदा., | Kriyapad in Marathi

  • त्याने त्याच्या मित्राला बंद खोलीतून सोडविले.
  • मातोश्री जिजाबाईंनी छत्रपती शिवरायांना घडविले.

6. शक्य क्रियापद

वाक्यामधील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते, त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. 2) आता राणी अक्षर गिरवते.

7. साधित क्रियापद

विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणार्‍या धातूंना साधित धातू असे म्हणतात व अशा साधित धातूंना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदास साधित क्रियापद असे म्हणतात.

उदा., | Kriyapad in Marathi

  • माझ्या घरातील वस्तू तो नेहमी हाताळतो.
  • रस्त्यात भीक मागणार्‍या लहान मुलाला पाहून माझे डोळे पाणावले.

8. सिद्ध क्रियापद

या, जे, कर, उठ, बस असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू असे म्हणतात. व या धातूना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) आम्ही सकाळी लवकर उठतो. 2) बाळ शांत निजला.

9. अनियमित क्रियापद

मराठीत काही धातू असे आहेत ज्यांना काळाचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोड्या वेगळ्याच अर्थाने चालतात, त्यांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. 2) असे वागणे बरे न्हवे.

10. भावकर्तुक क्रियापद

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदांना भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात.

उदा., | Kriyapad in Marathi

  • मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.
  • मुंबईला जाताना पोहोचण्यापूर्वीच उजाडले.

11. होकारार्थी क्रियापद / करणरूप क्रियापद

वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असेल तर त्याला होकारार्थी क्रियापद म्हणतात.

उदा. 1) मी सकाळी नियमित व्यायाम करते. 2) सर्वांनी वृक्षारोपण करावे.

12. नकारार्थी क्रियापद / अकरणरूप क्रियापद

वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान नकारार्थी असेल तर त्याला नकारार्थी क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ –

  • परवानगी शिवाय आत येऊ नये.
  • घराजवळ कचरा करु नये.

पुढे वाचा:

सारांश: Kriyapad in Marathi

तुम्हाला आता क्रियापद आणि क्रियापदाचे सर्व प्रकार अगदी सहजपणे समजले असतील अशी आम्हाला खात्री आहे.

Kriyapad in Marathi विषयावर काही शंका असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा. तसेच, पोस्ट आवडले असल्यास तुमच्या वर्ग मित्रांना शेअर करा.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment