मागणी पत्र लेखन मराठी | Magni Patra in Marathi

Magni Patra in Marathi: आज आपण मागणी पत्र मराठी आणि त्यावर आधारित काही महत्वाचे नमुने अभ्यासणार आहोत. औपचारिक पत्रलेखनाचा एक भाग म्हणजेच मागणी पत्र लेखन आहे.

एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजेच मागणी पत्र | Magni Patra Lekhan in Marathi होय.

या लेखात दिलेले मागणी पत्र इयत्ता नववी, 10वी तसेच इतर सर्व इयत्तेसाठी उपयुक्त ठरेल.

परीक्षेमध्ये तुम्हाला शालेय वस्तू मागणी पत्र, क्रीडा साहित्य मागणी पत्र, पुस्तक मागणी पत्र, मागणी पत्र निबंध, रोपांची मागणी करणारे पत्र अशा अनेक विषयांवर पत्र लेखन विचारले जाते.

चला तर मग सुरुवात करूया: Magni Patra in Marathi

मागणी पत्र लेखन करताना घ्यावयाची काळजी | Magni Patra in Marathi

  • दिलेल्या कृतीचे नीट वाचन करून कोणत्या वस्तूची अथवा सेवेची मागणी करायची आहे ते समजून घ्या.
  • मागणी पत्रात ज्या गोष्टीची आपण मागणी करत आहोत त्या गोष्टीचा उल्लेख स्पष्ट असावा. (यादी करावी)
  • वस्तु अथवा सेवेचा मोबदला कोणत्या मार्गाने देणार आहात, त्याचा उल्लेख करावा. उदा. रोख, धनादेश, इंटरनेट बँकिंग इ.
  • मागणी पत्र करत असताना विषय मोजक्या शब्दात लिहावा.
  • पत्राची भाषा विनंतीची असावी. मुख्यत: वस्तूंच्या मागणीवर पत्रात भर द्यावा.

मागणी पत्र लेखन मराठी नमुने

1. पुस्तक मागणी पत्र | Pustak Magni Patra in Marathi

Magni Patra in Marathi 10th Classशालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांचे मागणी करणारे पत्र लिहा.

दि. १२ जानेवारी २०२३

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
सुबोध विद्यालय,
शनिवार पेठ,
पुणे – ४१५६१२

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तक मागणी

महोदय,

आपण आमच्या शाळेच्या ग्रंथलायसाठी नेहमीच पुस्तके पुरवत असता. या वर्षी आमच्या शाळेत मराठी भाषा दिनानिम्मीत मराठी पुस्तकांवर आधारित वाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रंथालयात प्रसिद्ध लेखकांचे कथा व कादंबरीचे पुस्तक असणे आवश्यक आहे. त्यामुळे खालील यादीत दिलेली पुस्तके आपल्या प्रतिनिधि बरोबर शाळेच्या कार्यालयात वेळेत पाठवण्याची कृपा करावी.

पुस्तकांची यादी:

पुस्तकांची नावे लेखक नग
बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर
अग्निपंख डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
स्वामी रणजीत देसाई
ययाती वि. स. खांडेकर

कळावे,

आपला कृपाभिलाषी,
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधि,
सावे विद्यालय, पुणे.
ईमेल – xxxxx@gmail.com


2. रोपांची मागणी करणारे पत्र

Magni Patra in Marathi 9th Classशाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत पत्र (मागणी पत्र) लिहा.

दिनांक. 25 मार्च 2023

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
सदाहरित ट्रस्ट
राममंदिर मार्ग,
नाशिक – xxxxxx

विषय – शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.

महोदय,

मी अ. ब. क., विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय, नाशिक या विद्यालयचा विद्यार्थी प्रतिनिधि या नात्याने आमच्या माननीय मुख्याध्यापकांच्या संमतीने आपणास हे पत्र लिहीत आहे.
या वर्षी आमच्या शाळेला २५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचे औचित्य साधून आम्ही आमच्या शाळेच्या मैदानात रोपे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व्व ही लक्षात येण्यास मदत होईल.
त्यामुळे या रोपांच्या लागवडीसाठी आम्हाला खालील रोपांची मागणी करवायची आहे.
यादी – गुलाब (१० रोपे), मोगरा (१० रोपे), झेंडू (१० रोपे), तुळस (५ रोपे), आणि चाफा (५ रोपे).
कृपया रोपांचे बिल किती झाले ते ही कळवावे व वरील यादीतील रोपे लवकरात पाठविण्यात यावी ही विनंती.

कळावे,

आपला विश्वासू,
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधि
विद्या मंदिर विद्यालय
नाशिक – xxxxxx
ईमेल – xxx@gmail.com


3. शाळेसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र

Magni Patra in Marathi 8th Classविद्यार्थी प्रतिनिधि या नात्याने शाळेत पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

दि. १२ डिसेंबर २०२२

प्रति,
मा. व्यवस्थापक,
सरस्वती पुस्तकालय,
अप्पा बळवंत चौक,
गळा नं. ३,
पुणे – ३०

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणेबाबत

महोदय,
मी अ.ब.क. वाघीरे विद्यालय, सासवड, शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधि असून मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने आपणास हे पत्र पाठवत आहे.
आजच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या पुस्तकालयातून खरेदी केलेल्या पुस्तकांवर १०% सवलत मिळणार असल्याचे मी वाचले. आपण देत असलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी आम्ही आपल्या पुस्तकालयातून पुस्तके खरेदी करण्यासाठी इच्छुक आहोत. यासाठी पुस्तकांची यादी आपणास पाठवत आहोत.
पुस्तकांची यादी:

पुस्तके नग
श्यामची आई १०
गरुडझेप १५
पत्रास कारण की २५
मृत्युंजय१०
आई समजून घेताना २०

सवलत वजा करून येणारी देय रक्कम आणि टपालखर्च अशी एकूण किती रक्कम येते ते कृपया शाळेच्या ईमेल वर कळवावे. त्या उत्तरातच आपण आपल्या बँक खात्याचा तपशील कळवावा.

कळावे,

आपला नम्र,
अ.ब.क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
वाघीरे विद्यालय,
सासवड – ४१२३०१
ईमेल – abc@gmail.com


4. क्रीडा साहित्य मागणी पत्र | Krida Sahitya Magni Patra in Marathi

Magni Patra in Marathi Class 10खेळासाठी लागणार्‍या खेळाच्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.

दिनांक: 05 फेब्रुवारी 2023

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
परांजपे खेळ भंडार,
स.गो. बर्वे मार्ग,
कुर्ला, मुंबई – xxxxx

विषय – क्रीडा साहित्य मागणी करणेबाबत

माननीय महोदय,
मी नवरत्न शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधि आहे. आमच्या शाळेमध्ये होणार्‍या विविध क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडा साहित्याची गरज आहे. शाळेमध्ये दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु क्रीडा साहित्याच्या अभावी विद्यार्थी सराव करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना स्पर्धेत सहभागी होता येत नाही.
क्रीडा साहित्याचा वाढत्या किमतीमुळे ते विकत घेणे शाळेला शक्य नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे.
कृपया सहानुभूतिपूर्वक विचार करावा आणि आमची मागणी मान्य करावी. ही विनंती.
आवश्यक साहित्यांची यादी सोबत जोडली आहे.

साहित्य नग
बॅट १०
स्टंप ४ सेट
सीझन बॉल १०
हेलमेट
स्पोर्ट्स शूज ३ जोडे

कळावे,
आपला नम्र,
अ.ब.क
विद्यार्थी प्रतिनिधि
नवरत्न विद्यालय, कुर्ला २२


5. शालेय वस्तू मागणी पत्र

Magni Patra in Marathi 10th विज्ञान प्रातिनिधि या नात्याने प्रयोगशाळेतील साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.

दि. 10 मार्च 2023

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
सुयश केमिकल फार्मा,
शिवाजीनगर,
पुणे – 23

विषय – प्रयोगशाळेतील साहित्याची मागणी करणेबाबत

महोदय,
मी अ.ब.क. ज्ञानदीप विद्यामंदिर, चिंचवड शाळेची विज्ञान प्रातिनिधि असून मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने आपणास हे पत्र लिहीत आहे.
दरवर्षी आमची शाळा आपल्याकडून साहित्य खरेदी करत असते. यावर्षी देखील आम्ही आपल्याकडून प्रयोग शाळेला लागणारे साहित्य खरेदी करू इच्छितो.
तरी आपण दरवर्षीप्रमाणे यावेळी ही किमतीवर सवलत द्यावी ही आमची अपेक्षा आहे.
साहित्याची यादी पुढीलप्रमाणे:

साहित्य संख्या
चंचूपात्र १०
सुक्ष्मदर्शिका ०३
ड्रॉपर १०
काचकांडी १०
तापमापी ०५

वरील साहित्याची एकूण किंमत व आपल्या बँकेचा तपशील आम्हाला मेलद्वारे कळवावा. आणि पैसे पोहचताच साहित्य शाळेच्या पत्त्यावर पाठवावे.

आपली विश्वासू,
अ.ब.क.
विज्ञान प्रातिनिधि
ज्ञानदीप विद्यालय,
चिंचवड, पुणे ३२
ईमेल – xxxx@gmail.com

वाचा>> जाहिरात लेखन | Jahirat Lekhan in Marathi


6. दिवाळीसाठी सजावटीच्या साहित्याची मागणी करणारे पत्र

Magni Patra Lekhan in Marathiदिवाळीसाठी सजावटीच्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.

दिनांक: २२ ऑक्टोबर २०२२

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
प्रगती जनरल स्टोअर्स,
न. पू. चौक,
नाशिक – ४५

विषय – दिवाळीसाठी सजावटीच्या साहित्याची मागणी करणे बाबत

महोदय,
मी अ.ब.क. मुळत: नाशिक मध्ये राहणारा आहे. आता दिवाळी जवळ आली आहे आणि त्यासाठी सजावटीसाठी लागणारे साहित्य मागणीसाठी मी हे पत्र लिहीत आहे.
दरवर्षी आम्ही आपल्याच दुकानातून सजावटीचे साहित्य खरेदी करत असतो. यावर्षी देखील लागणारे सर्व साहित्य आम्ही आपल्याच दुकातून खरेदी करू इच्छितो.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्हाला सवलत मिळावी अशी आमची अपेक्षा करत आहोत.
सजावटीच्या साहित्याची यादी खाली देत आहोत.

लागणारे साहित्य संख्या
मोठे आकाशकंदील
छोटे आकाशकंदील
पणत्या १०
विद्युत दीपमाळा १०

एकूण होणारी रक्कम मला ईमेलद्वारे कळवावी. सोबतच तुमचा अकाऊंट तपशील जोडावा.
पैसे पोहचताच साहित्य लवकरात लवकर माझ्या पत्त्यावर पाठवावे ही विनंती.

आपला विश्वासू,
अ.ब.क.
कस्तुरभा सोसायटी,
नाशिक – ४५
ईमेल – abc@yahoo.in

पुढे वाचा:

सारांश – Magni Patra Lekhan in Marathi

तर विद्यार्थ्यांनो आज आपण मागणी पत्र लेखन | Magni Patra in Marathi पाहिले. मागणी पत्र अगदी सोप्या व आकर्षक पद्धतीने कसे लिहावे हे अभ्यासले.

या लेखात दिलेल्या सर्व मराठी मागणी पत्र नमूण्यांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल याची आम्हाला खात्री आहे.

जर आपल्याला Magni Patra in Marathi लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. तसेच अजूनही कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास आम्हाला कमेन्ट करून कळवा.

MPSCMarathi ब्लॉग द्वारे तुम्हाला लागणारी शैक्षणिक माहिती पुरवण्याचे आमचे काम असेच चालू राहील.

धन्यवाद!

Sharing Is Caring:

8 thoughts on “मागणी पत्र लेखन मराठी | Magni Patra in Marathi”

  1. छान लेखन आहे आम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल .

    Reply
    • क्लास 10
      जवाहर नवोदय विद्यालय
      मागणी पत्र 2023नुसार पत्र लिहावे ही विनंती.
      CBSE board वाल्या मुलांना उपयोगी पडेल
      पत्र मध्ये पूर्ण प्रश्न आसवे हि विनंती

      Reply
      • दिलेली मागणी पत्रे उदाहरणे (फॉरमॅट) सर्व इयत्तेसाठी उपयुक्त आहेत. तुम्हाला काही ठराविक विषयांवर मागणी पत्रे हवी असल्यास आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच ते उपलब्ध करून देऊ.

        Reply
  2. विद्यार्थ्याच्या सवलती मिळालेले जुनी व फाटलेला वस्तीतील पुस्तके आहेत त्याबद्दल तक्रार करणारे पत्र लिहा

    Reply

Leave a Comment