नाम व नामाचे प्रकार | Namache Prakar in Marathi

Namache Prakar in Marathi: आजच्या पोस्ट मध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शब्दांच्या आठ जातींपैकीच एक महत्वाचा घटक नाम आहे.

जगातील कोणत्याही दिसणार्‍या किंवा न दिसणार्‍या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. उदा. मोर, गणेश, स्वरा, चेंडू, हिमालय, गंगा इत्यादी.

नामाचे एकूण तीन प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, व भाववाचक नाम.

पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक तसेच अनेक परीक्षांमध्ये नामावर आधारित विचारले गेलेले काही महत्वाचे प्रश्न देखील आज आपण अभ्यासणार आहोत.

चला तर मग पाहूया – Namache Prakar in Marathi

नामाचे प्रकार किती | Namache Prakar in Marathi

१. सामान्य नाम | Marathi Grammar Naam

Namache Prakar – जे नाव एकाच गटातील समूहातील अनेक वस्तूंना, प्राण्यांना, गोष्टींना दिले जाते, अशा नावाला सामान्य नाम असे म्हणतात.

सामान्य नाम उदाहरणे – मुलगा, चित्र, पर्वत, तारा, घर, माणूस, चांदी, शहर, पुस्तक इत्यादी.

  • माणूस दूर उभा आहे.
  • तारा चमचम चमकत आहे.
  • पुस्तक खूप जाड आहे.

सामान्य नामाचे पुन्हा दोन उपप्रकर पडतात. ते खालीलप्रमाणे –

अ) समुदायवाचक सामान्य नाम

Namache Prakar – वाक्यातील ज्या शब्दातून संपूर्ण समुहाचा बोध होतो त्या नामाला समुदायवाचक सामान्य नाम असे म्हणतात. उदा. जुडगा, थवा, संघ, गट, कुटुंब, वर्ग इत्यादी.

उदाहरणार्थ:

  • हा सातवीचा वर्ग आहे.
  • मैदानात क्रिकेट चा संघ क्रिकेट सराव करत आहे.

ब) पदार्थवाचक सामान्य नाम

Namache Prakar – जे पदार्थ संख्यामध्ये न मोजता इतर परिमाणानी मोजले जातात, त्याला पदार्थवाचक सामान्य नाम असे म्हणतात. उदा. तांदूळ, दूध, साखर, चांदी, सोने, तेल इ.

उदाहरणार्थ:

  • भांड्यात चार लिटर दूध आहे.
  • मोनिकाने ४ तोळे सोने खरेदी केले.

2. विशेष नाम | Naam in Marathi

विशेष नामाची व्याख्या – एखाद्या वस्तूला किंवा प्राण्यांना आपण ज्या विशेष नावाने ओळखतो, त्या नामास विशेष नाम म्हणतात.

विशेष नामाचे प्रकार एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव, स्थान, किंवा वस्तूचे नाव दर्शवणार्‍या शब्दाला विशेष नाम म्हणतात. उदा. भारत, अमेरिका, हिमालय, गंगा, गोदावरी, रमेश इ.

विशेष नाम उदाहरण मराठी:

  • रमेश एक चांगला खेळाडू आहे.
  • भारत माझा देश आहे.

3. भाववाचक नाम | Bhav Vachak Naam in Marathi

Namache Prakar – ज्या नामामुळे एखाद्या व्यक्ती, प्राणी व पदार्थांमधील गुणांचा भावनांचा अथवा धर्माचा बोध होतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.

भाववाचक नामाचे उदाहरण. राग, सुंदर, हुशार, उदास, आळशी, प्रेम, प्रामाणिक, मेहनती इत्यादी.

भाववाचक नाम उदाहरण मराठी

  • सतीश वर्गातील सर्वात हुशार मुलगा आहे.
  • निकिता खूप सुंदर दिसते.
  • समीरा आळशी मुलगी आहे.

नामाचे वाक्य प्रश्नसंच

नामाचे वाक्य 10 – परीक्षेमध्ये नामावर आधारीत प्रश्न अशा प्रकारे विचारले जावू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यानी Namache Prakar in Marathi नीटपणे समजून घेणे गरजेचे आहे.

Namache Prakar in Marathi Questions

1. मराठी व्याकरणात नामाचे मुख्य किती प्रकार आहेत.
अ) 2 ब) 3 क) 4 ड) 1

2. ‘गर्व’ या नामाचा प्रकार ओळखा
अ) विशेषणाम ब) सामान्यनाम क) भाववाचक नाम ड) धर्मवाचक नाम

3. दिलेल्या पर्यायातून सामान्य नाम नसलेला शब्द निवडा.
अ)घर ब) मुलगी क) माणूस ड) चंद्र

4. ‘हुशारी’ या शब्दाची जात ओळखा.
अ)विशेषण ब)भाववाचक नाम क)सामान्य नाम ड) विशेष नाम

5. ‘लेखणी’ या नामाचा प्रकार Namache Prakar ओळखा.
अ)सामान्य नाम ब) विशेषणाम क) भाववाचक नाम ड)धर्मवाचक नाम

6. नामाचे तीन प्रकार कोणते ते ओळखा.
अ)नाम, सर्वनाम, विशेषण ब)सर्वनाम, विशेषण, क्रियापद क)सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम ड) यापैकी नाही

7. ज्या नामांनी सजीव व निर्जीव मधील भाव, गुणधर्म यांचा बोध होतो त्यास ——– म्हणतात.
अ)सामान्य नाम ब)विशेषनाम क)भाववाचक नाम ड)निर्जीव नाम

8. दिलेल्या पर्यायातून भाववाचक नाम कोणते ते ओळखा.
अ) पुस्तक ब) लेखणी क) शांतता ड)हिमालय

9. एखादी विशिष्ट वस्तू, व्यक्ती, प्राणी, ठिकाण यांना दिलेले नाव म्हणजेच ——— होय.
अ)समूहवाचक नाम ब)विशेषनाम क)भाववाचक नाम ड)गुणवाचक नाम

10. विशेष नाम हे ——— असते.
अ)गुणवचक ब)भाववाचक क)व्यक्तीवचक ड)यापैकी नाही

Namache Prakar in Marathi Answers

1(ब), 2(क), 3(ड), 4(ब), 5(अ), 6(क), 7(क), 8(क), 9(ब), 10(क)

पुढे वाचा:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नामा चे प्रकार किती?

नामाचे एकूण तीन प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, व भाववाचक नाम.

नामाची व्याख्या काय आहे?

वस्तूच्या किंवा पदार्थाच्या ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात.

सामान्य नाम म्हणजे काय?

एकाच जातीच्या पदार्थांच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात.

भाववाचक नाम म्हणजे काय?

ज्या नामाने वस्तू किंवा प्राण्यांमधील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात.

सारांश: Namache Prakar in Marathi

विद्यार्थ्यांना आता नाम व नामाचे प्रकार | Namache Prakar in Marathi अगदी सहजपणे समजले असतील अशी आम्ही अशा करतो.

MPCMarathi.com वर तुम्हाला नेहमी अशीच उपयुक्त शैक्षणिक माहिती मिळत राहील.

जर तुम्हाला Marathi Grammar Naam हा लेख आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच Namache Prakar in Marathi मध्ये काही चुका आढळल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

1 thought on “नाम व नामाचे प्रकार | Namache Prakar in Marathi”

Leave a Comment