Batmi Lekhan in Marathi: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण उपयोजित मराठी मधील बातमी लेखन विषयाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. यामध्ये बातमी म्हणजे काय?, बातमीचे शीर्षक कसे असावे?, मराठी बातमी लेखन कसे करायचे? याची सर्व माहिती आम्ही या लेखात दिली आहे.
आजचे युग हे माहितीचे युग आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रसारमाध्यमे यांमुळे जग खूप जवळ आले आहे. जगाच्या कानाकोपर्यात झालेल्या घटनांची अचूक माहिती आपल्याला दूरदर्शन, आकाशवाणी, वर्तमानपत्र अशा विविध माध्यमांतून सविस्तरपणे मिळते.
आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातम्यांपासून ते अगदी राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातम्या आपल्याला कळतात.
विविध क्षेत्रातील माहिती पुरवणे, ताज्या घडामोडी, समाजप्रबोधन करणे आणि परिस्थिची जाणीव बातमीद्वारे कळवणे हे Marathi Batmi Lekhan मुख्य उद्देश असते.
बातमी म्हणजे काय? | Batmi Lekhan in Marathi
‘बातमी’ हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे (बातमी लेखण करणे) हे आज महत्वाचे कौशल्य ठरते.
बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणार्या नियोजित कार्याचीही होते. ज्यात काय घडले?, कधी घडले?, कोठे घडले?, कसे घडले?, कोण-कोण उपस्थित होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच बातमी.
बातमीची विविध क्षेत्रे: शैक्षणिक, कृषी, वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, दैनंदिन घटना.
बातमी लेखनासाठी आवश्यक गुण – How to write batmi lekhan marathi
- लेखन कौशल्य
- भाषेचे उत्तम ज्ञान
- व्याकरणाची जाण
- सोपी, सुटसुटीत वाक्यरचना
- चौफेर वाचन
बातमी लेखन करताना लक्षात घेण्याचे मुद्दे
- बातमीचे शीर्षक कसे असावे? – बातमीचे शीर्षक अगदी कमीत कमी शब्दांत एका लाईन मध्ये लिहावे. शीर्षक एवढे आकर्षक असले पाहिजे की ते वाचून संपूर्ण बातमी समजली पाहिजे.
- बातमी कोणी दिली आहे – बातमी लेखनामध्ये बातमी कोणी दिली आहे याचा उल्लेख करणे महत्वाचे आहे. जसे की आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतीनिधिकडून इत्यादि.
- स्थळ आणि दिनांक – बातमी कधी घडली, कोठे घडली, स्थळ, वेळ आणि दिनांक काय होता हे नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे.
- मुख्य बातमी – बातमी लेखनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्य बातमी. बातमी कशा संबंधित आहे आणि मुद्द्याला अनुसरून बातमी लिहिणे महत्वाचे आहे.
बातमी लेखन विषय नमुने | News Writing in Marathi
चला तर काही बातमी लेखन विषय/नमुने यांचा सराव करूया. जेणेकरून तुम्ही अगदी सहजपणे बातमी लेखन करू शकता आणि पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता.
News Writing in Marathi: बातमी लेखन इयत्ता दहावी, बातमी लेखन मराठी 8वी, बातमी लेखन मराठी 9वी, Batmi Lekhan in Marathi 9th Class, बातमी लेखन मराठी शिक्षक दिन, बातमी लेखन फोटो, बातमी लेखन मराठी 10 वी 2023, बातमी लेखन अविचाराने ओढवला भीषण अपघात, बातमी लेखन विषय
1. बातमी लेखन मराठी शिक्षक दिन
बातमी लेखन इयत्ता दहावी – Batmi lekhan shikshak din marathi / batmi lekhan shikshak diwas in marathi
शिक्षक दिन उत्साहात साजरा
पुणे, दिनांक 5 सप्टेंबर: आजच्या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपति यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी पुणे येथील श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यानी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
शिक्षक दिवस कार्यक्रमाची योजना विद्यार्थ्यानी शिक्षकांच्या मदतीने आखली व कार्यक्रम योग्यरित्या पार पाडला. शाळेच्या मध्य सुट्टीनंतर विद्यालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि इतर शिक्षकांना शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी शिक्षकाचे महत्व, समाजात असलेली शिक्षकाची गरज या विषयी भाषणे दिली.
आजच्या कार्यक्रमामध्ये भाषण स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये विविध वर्गातील विधार्थ्यांनी आपापली भाषणे सादर केली. विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रगीताने पार पडले.
2. बातमी लेखन अविचाराने ओढवला भीषण अपघात
News Writing in Marathi: बातमी लेखन मराठी 8वी, बातमी लेखन मराठी 9वी
सेल्फी काढताना मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथील 1500 फूट खोल दरीत पडून मृत्यू
दिनांक 15 जुलै, माथेरान
आमच्या प्रतिनिधीमार्फत,
माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका महिलेचा सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात 1500 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना 14 जुलै रोजी दुपारी घडली. सुमारे चार-पाच तासांच्या कठीण प्रयत्नांनंतर मृतदेह पोलिसांना शोधण्यात यश आले. वनिता देसाई (32) असे या महिलेचे नाव असून माथेरानच्या लुईसा पॉइंट या ठिकाणी ही घटना घडली.
पावसाळ्याच्या सुंदर, निसर्गरम्य वातावरणात अनेकांची पावले माथेरानकडे वळतात. मुंबईतील देसाई कुटुंब आपल्या परिवारासोबत माथेरानला फिरण्यासाठी आले होते.
दुपारच्या जेवणानंतर हे सर्वजण माथेरानच्या प्रसिद्ध लुईसा पॉइंट येथे फिरायला गेले होते. या वेळी वनिता या आपल्या मुळसोबत कड्याजवळ उभे राहून सेल्फी काढत असताना, जोरदार वार्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या 1500 फूट खोल दरीत कोसळल्या.
या घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि अपघात झालेल्या कुटुंबीयांना सहाय्य केले.
सेल्फीच्या नादात आजवर अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अशा अनेक घटना घडताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे सेल्फीचा मोह टाळावा.
सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन पोलिसांनी सर्व पर्यटनप्रेमींना केले आहे.
3. बातमी लेखन क्रीडा महोत्सव कार्यक्रम
Batmi lekhan in marathi 10th class – Krida mahotsav batmi lekhan in marathi
क्रिकेटच्या बादशहाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे, 6 एप्रिल 2023
आमच्या बातमीदारांकडून,
“मेहनत, एकाग्रता, निष्ठा, चिकाटी या गुणांवर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात महान कार्य करू शकता. यशाचा हिमालय, पराक्रमाचे शिखर तुम्ही गाठू शकता” असा मोलाचा संदेश प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. आदर्श क्रीडा मंदिर शाळेच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
‘आदर्श विद्या मंदिरचा’ वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या प्रशस्त मैदानावर सुरू झाला. साक्षात क्रिकेटचे दैवत समोर असल्याने सर्व खेळाडू मन लावून खेळत होते. खो-खो, लंगडी, कबड्डी हे सर्वच खेळ खूप चुरशीचे झाले. कबड्डीचे डाव तर खूप रंगले.
सर्वत्र खूप उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थी खेळांचा मनमुराद आनंद घेत होते. प्रेरणा देत होते. आरोळ्या ठोकत होते. सर्व वातावरण भारावून गेले होते.
सचिन तेंडुलकर यांनी सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले, कौतुक केले. सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीने पालकांनी एकच गर्दी केली होती. त्यांच्यातही उत्साह दिसून येत होता.
4. बातमी लेखन भव्य विज्ञान प्रदर्शन
Batmi lekhan in marathi 9th class
अभिनव विद्यालय नागपूर येथे ‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न
दि. 24 मे 2023, नागपूर
आमच्या प्रतीनिधींकडून,
दिनांक 15 मे ते 18 मे दरम्यान अभिनव विद्यालय, नागपूर येथे ‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुहास माने आणि प्रमुख पाहुणे श्री आशिष वाघ यांनी उद्घाटन केले.
या प्रदर्शनात इतर एकूण 50 शाळांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी विविध कल्पनांनी आपले प्रकल्प सादर केले. या अवसरी विज्ञान नाटिकापण सादर करण्यात आली. उत्कृष्ट प्रकल्पांना प्रथम परितोषिक देखील देण्यात आले. प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत होती.
सर्व शाळांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
5. बातमी लेखन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
Batmi lekhan in marathi 8th class
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमास उदंड प्रतिसाद
दिनांक. 16 जानेवारी, पुणे
आमच्या वार्ताहराकडून,
1 जानेवारी ते 15 जानेवारी ‘मराठा भाषा संवर्धन पंधरवडा’ या निमित्ताने शाळाशाळांकडून मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम आयोजित केले जावेत, या उपक्रमास शहरातील सर्वच शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
आमच्या प्रतिनिधींनी काही शाळांमध्ये स्वत: जाऊन या उपक्रमाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांसाठी बहुतांश शाळांमधून वाचन तासांचे आयोजन केले होते. याबरोबरच भाषेचे महत्व विशद करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने सर्वच शाळांमध्ये ग्रंथ दिंडी, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील 100 शाळांमधून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला. दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ हा विद्यार्थी हिताचा उपक्रम शाळांमधून राबवला जाईल, अशी ग्वाही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली.
पुढे वाचा >>
सारांश: Batmi Lekhan in Marathi
तर विद्यार्थ्यांनो, मराठी बातमी लेखन कसे करायचे Batmi Lekhan in Marathi याची आता तुम्हाला चांगलीच कल्पना आली असेल अशी आम्हाला खात्री आहे.
या लेखात दिलेले बातमी लेखन नमुने Batmi lekhan in marathi 10th class ssc board, Batmi lekhan in marathi 9th class, Batmi lekhan in marathi 8th class, Batmi lekhan in marathi 7th class सर्व इयत्तेसाठी उपयुक्त आहेत.
Batmi Lekhan in Marathi आधारित हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर नक्की करा. तसेच काही शंका असल्यास आम्हाला खाली कमेंट करून कळवा.
बातमी म्हणजे काय?
एखाद्या घडलेल्या घटनेची थोडक्यात माहिती सांगणे किंवा अनुसरण करणे म्हणजेच बातमी लेखन होय. यामध्ये बातमी कुठे, केव्हा, कधी घडली या सर्व प्रश्नांचा उल्लेख होतो.
बातमीचे शीर्षक कसे असावे?
कमीत कमी शब्दात बातमीचे शीर्षक असावे. शीर्षक वाजताच बातमी विषयी कुतूहल निर्माण होते, आशय कळतो, उत्सुकता वाढते म्हणून आकर्षक शीर्षक महत्वाचे असते.
मराठी बातमी लेखन कसे करायचे?
मराठी बातमी लेखन करताना बातमीचे शीर्षक, बातमी कोणी दिली, स्थळ व दिनांक, मुख्य बातमी आणि तपशील लिहिणे महत्वाचे ठरते. अशा प्रकारे आकर्षक बातमी तुम्ही लिहू शकता.
Thank you so much 🙏🙏
We are glad you like it. keep visiting for more helpful content.
सुंदर आहे. मला लय मदत जाला आहे.
धन्यवाद प्रशांत! तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
Very good
👍👍👍 good😊😊