(All Formats) मराठी पत्र लेखन 2023| Letter Writing in Marathi

Letter Writing in Marathi: मित्रांनो आजच्या डिजिटल युगात सगळ्यांकडेच मोबाईल आहेत. व्हॉट्सॲप, फेसबूक यासारखे अनेक ॲप्स त्यामध्ये आहेत ज्यांचा वापर करून आपण एकमेकांशी संवाद साधतो. पूर्वीच्या काळी लोकांकडे यापैकी कोणतीही साधने उपलब्ध न्हवती त्यामुळे पत्र लेखन केले जात असे. आज जरी जग एवढ पुढे गेल असलं तरी अनेक कामांसाठी आपल्याला पत्र लेखन करावे लागते.

तर आज आपण पत्र लेखन कसे करावे, पत्र लेखनाचे विविध प्रकार letter writing in marathi formal and informal यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.

Letter Writing in Marathi 2023

पत्र लेखन मराठी 10वी: letter writing in marathi for 10th standard, letter writing in marathi class 9th, letter writing in marathi class 8th, letter writing in marathi new format, aupcharik patra in marathi

पत्र लेखन म्हणजे लेखी स्वरुपातील निरोप होय. आपल्या मनातील भावना आणि विचार दुसर्‍यांपर्यंत पोहचवण्यासाठी पत्र लेखनाचा वापर केला जातो.

पत्र लेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता आपण नवीन पद्धतीनुसार पत्राचे स्वरूप अभ्यासणार आहोत.

पत्र लेखनाचे प्रकार | Types of Letter Writing

पत्र लेखनाचे मुख्य दोन प्रकार पडतात. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. तसेच, औपचारिक पत्र लेखनामध्ये इतर प्रकार पडतात ज्यांचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत.

औपचारिक पत्र Aupcharik patra in marathi

औपचारिक पत्र लेखन ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये Formal Letter Writing असे देखील म्हणतो. कार्यालयीन व व्यावसायिक कामासाठी या पत्र लेखनाचा वापर केला जातो.

letter writing in marathi

औपचारिक पत्र लिहताना पुढील काळजी घ्यावी

  • पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपर्‍यात दिनांक लिहावा.
  • प्रति यांचे नाव दिलेले असल्यास तेच लिहावे तसेच हुद्दही लिहावा.
  • प्रति याचा पत्ता जर प्रश्नपत्रिकेत दिलेला असेल, तर तोच लिहावा.
  • पत्ता लिहिल्यानंतर पत्राचा विषय लिहावा.
  • विषयानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे ‘महोदय/महोदया’ हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम द्यावा.
  • त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी व यातील प्रत्येक परिच्छेदाची सुरवात डावीकडून करावी.
  • ‘आपला विश्वासू’ किंवा यासारख्या शब्दांनी शेवट करून त्याखाली प्रेषकाचे नाव व पत्ता लिहावा.
  • पत्त्यानंतर पत्रलेखकाने स्वत:चा email id लिहावा.

औपचारिक पत्र नमूना फॉरमॅट Formal Letter in Marathi New Format: औपचारिक पत्राचे (Marathi letter format) इतर प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

1. विनंती पत्र Vinanti Patra Lekhan in Marathi

Q. Letter writing in marathi 10th class: परिसरातील चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याला विनंती पत्र लिहा.

दिनांक. 27 जुलै 2023

प्रति,
मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
शहापूर, जिल्हा ठाणे – 421601

महोदय,

सध्या वाशिंद परिसरात विजेचे मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होत आहे. अनेकदा रात्रभर विजच नसते. संपूर्ण परिसर काळोखात बुडून जातो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिति निर्माण झाली आहे.

चोर-दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत आहेत. संध्याकाळनंतर लुटालुटीचे प्रकार घडत आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी घरांवर दरोडे पडू लागले आहेत. कृपया रात्रीच्या वेळी आमच्या परिसरात गस्त वाढवावी आणि आम्हाला दिलासा द्यावा, ही कळकळीची विनंती.

आपला नम्र,

विशाल केशव मोरे
मु.पो. वाशिंद
ता. शहापूर 421604
ईमेल abcd@gmail.com

पहा: 5+ विनंती पत्र नमुने


2. मागणी पत्र Magni Patra in Marathi

Q. Letter writing in marathi class 9th: स्वच्छतेसाठी लागणार्‍या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.

दिनांक. 10 जून 203

प्रति,
वरिष्ठ सेवक
मानवता विद्यालय
नागपुर 3xx 5xx

विषय: स्वच्छता करण्यासाठी लागणार्‍या साहित्याची मागणी करण्याबाबत.

महोदय,

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या शाळेत ‘स्वच्छता अभिमान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

28 जून रोजी शाळेत सकाळी 8:00 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल. कार्यक्रमात विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. स्वच्छतेसंबंधी शाळेला काही साहित्यांची आवश्यकता आहे. कृपया हे साहित्य शाळेला उपलब्ध करून द्यावे .

साहित्याची यादी सोबत जोडत आहे.

  1. झाडू – 15
  2. कुदळ – 05
  3. झाडे – 25
  4. घमेली – 10
  5. फावडे – 05

आ.वि.
विद्यार्थी प्रतिनिधि

पहा: 5+ मागणी पत्र नमुने


3. तक्रार पत्र Takrar Patra in Marathi

Letter writing in marathi class 8th: वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मागवलेल्या रोपांमधील अर्धी रोपे खराब निघाल्याबद्दल शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वनअधिकार्‍यांना तक्रार पत्र लिहा.

दि. 20 जुलै 2023

प्रति,
वन अधिकारी,
सुंदरबन उद्यान, सातारा

विषय: शाळेच्या वृक्षारोपणासाठी मागवलेली रोपे खराब निघाल्याबद्दल

माननीय वन अधिकारी,

माझे नाव कु. शैलेश कदम असून मी सरस्वती हायस्कूल, सातारा येथे इयत्ता 10वी ‘अ’ मध्ये शिकत असून माझ्या वर्गशिक्षकांच्या परवानगीने शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस लक्षात आणू इच्छितो की, आम्ही आमच्या शाळेतील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या उद्यानातून काही रोपे मागविली होती.

आपल्याकडून मागवलेली रोपे जेव्हा मिळाली तेव्हा त्या रोपांपैकी निम्मी रोपे खराब झालेली आढळली आहेत. व प्राप्त रोपांचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसण्यात आले आहे. आम्ही प्रत्येकवेळी आपल्याकडूनच रोपे विकत घेतो व कधीही अशा प्रकारच्या दर्जाची रोपे आम्हाला आढळली नाहीत.

तरी आपण यावर त्वरित लक्ष देऊन आम्हास उत्तम प्रकारची नवीन रोपे लवकरात लवकर पाठविणे. आपण माझ्या तक्रारीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हास खराब रोपे बदलून दुसरी नवीन रोपे त्वरित पाठवाल अशी मी आशा करतो.

प्रेषक,
शैलेश कदम,
सरस्वती हायस्कूल, सातारा
ईमेल – abcd@gmail.com


4. चौकशी पत्र Inquiry Letter in Marathi

Letter writing in marathi formal and informal: एका व्यवसाय मार्गदर्शकाकडे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची चौकशी करणारे पत्र लिहा.

दिनांक. 11 जुलै 2023

आनंद कुमार,
मु.पो. झोडगे,
ता. मालेगाव, जि. नाशिक

प्रति,
मा.श्री. ओमकार गायकवाड

सदर नमस्कार,

विषय: पदव्युतर अभ्यासक्रमाची चौकशी करण्याबाबत

महोदय,

मी, आनंद कुमार, सरस्वती महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. प्रथम आणि द्वितीय वर्षात मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो आहे. यावर्षीही प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

आपण व्यवसाय मार्गदर्शक आहात. आपले वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होणारे लेख माझ्या वाचनात आले. त्याच ओळखीवर आपल्याला पत्र पाठविले आहे. पदवीनंतर पुढे कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, याची चौकशी करण्यासाठीच मी हे पत्र लिहीत आहे. याबद्दल कृपया मला मार्गदर्शन करावे, ही विनंती.

अभ्यासक्रम, त्याचा कालावधी, तो अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहे व त्याचे अंदाजे शुल्क याबद्दलही मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वाचे आहे. तरी वाणिज्य शाखेतील पदवीनंतर शेतीपूरक व्यवसायासाठीचे अभ्यासक्रम कोणकोणते आहेत याबद्दल आपण मार्गदर्शन करावे, ही विनंती.

आपल्याकडून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
आनंद कुमार


5. माफी पत्र Mafi Patra in Marathi

Marathi letter format: वर्गात केलेल्या गैरवर्तनाबद्दल मुख्याध्यापिकांची माफी मागणारे पत्र लिहा.

दि. 23 जुलै 2023

प्रति,
माननीय मुख्याधिपिका,
महात्मा गांधी हायस्कूल,
पटेल मार्ग, औरंगाबाद.

विषय: वर्गात केलेल्या गैरवर्तनाबद्दल मुख्याध्यापिकांची माफी मागणे बाबत.

मा. महोदया,

मी सोनल शाह, आपल्या शाळेत इयत्ता 6वी ‘क’ ची विद्यार्थिनी आहे. हे पत्र आपणास मी केलेल्या गैरवर्तनाबद्दल माफी मागण्यासाठी लिहीत आहे. तरी कृपया माझ्या चुकी बद्दल मला माफ करावे ही नम्र विनंती.

शुक्रवारी आमच्या वर्गात गणिताच्या तासाला कोणीही शिक्षक आले नव्हते. तेव्हा सर्व विद्यार्थी दंगा करत होते. त्यावेळेस मी सर्वांना जोक सांगत होते. ते मुलांना आवडल्यामुळे ते जोरात बाके वाजवू लागली. त्यामुळे वर्गात खूपच गोंधळ निर्माण झाला आणि याचा त्रास आजूबाजूच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही झाला, याची मला जाणीव आहे.

अशी चूक माझ्याकडून भविष्यात कधीही होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. आशा करते तुम्ही मला माफ कराल.

आपली विश्वासू,
सोनल शाह

अनौपचारिक पत्र Informal Letter Writing Marathi

अनौपचारिक पत्र हे ओळखीच्या व्यक्तिला लिहितात. जसे की आपल्या नातेवाईकांना (काका, मामा, मित्रा) पत्र पाठविण्यासाठी आपण या पत्र लेखनाचा वापर करतो.

letter writing in marathi

अनौपचारिक पत्र लिहताना पुढील काळजी घ्यावी

  • पत्राच्या वरच्या बाजूला डाव्या कोपर्‍यात तारीख लिहावी.
  • पत्र कोणत्या व्यक्तिला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा. उदा., शिरसाष्टांग नमस्कार, शि.सा. नमस्कार, साष्टांग नमस्कार, सप्रेम नमस्कार
  • पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.
  • पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.
  • पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा.

अनौपचारिक पत्र नमूना फॉरमॅट Inormal Letter in Marathi New Format: अनौपचारिक पत्राचे (Marathi letter format) इतर प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

1. अभिनंदन पत्र Abhinandan Patra

Q. Letter writing in marathi class 9th: तुमच्या मित्राला सुलेखन वर्गातील सर्वोत्कृष्ट सुलेखनकार हे परितोषिक मिळाले, याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

दि. 15 जुलै 2023

प्रिय राहुल,
सप्रेम नमस्कार.

राहुल, तुझे मनापासून अभिनंदन! सुलेखन वर्गात तुला उत्कृष्ट सुलेखनकार हे परितोषिक मिळाले. आजच आमच्या शाळेत सुलेखनावर एक कार्यक्रम झाला. पाहुणे होते श्री विनय गायकवाड. त्यांनी सुलेखनाचे महत्व समजावून संगितले.

सुलेखन आयुष्यभर उपयोगी पडते. आपल्याला आनंद देते हे त्यांनी पटवून दिले. या प्रसंगी त्यांनी तुझे खूप कौतुक केले. त्यावेळी मला तुझा खूप खूप अभिमान वाटला. राहुल, तू माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा! खूप मोठा सुलेखनकार होणार हे निच्छित! पुन्हा एकदा तुझे अभिनंदन!

तुझा मित्र,
पुष्कर माळी

नाथनिवास
205, अभिनव नगर,
सांगली- xxx xxx
ईमेल abcd@gmail.com


2. आभार पत्र Abhar Patra Lekhan

Informal letter in marathi new format: मित्राचे आभार मानणारे पत्र लिहा.

दिनांक. 29 जुलै 2023

प्रिय मित्र अविनाश,
सप्रेम नमस्कार.

सर्वप्रथम माझ्या वाढदिवसाला तुम्ही सर्व मित्रांनी येऊन माझा आनंद द्विगुनीत केलात त्याबद्दल आपल्या सर्व मित्र परिवाराचे मी माझ्या परिवाराकडून खूप खूप मन:पूर्वक आभार मानतो.

अविनाश, तुझे विशेष आभार मानण्यासाठी मी तुला हे पत्र लिहीत आहे. त्या दिवशी अनेक नातेवाईकांनी, मित्रांनी मला विविध भेटवस्तू दिल्या. त्यात तुझीही भेटवस्तू होती. ती पॅकिंग खोलत असताना माझ्या मनात खूप उत्सुकता होती. तुझी भेटवस्तू पाहून मला खूप आनंद झाला कारण त्यात माझ्या आवडीचे ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र होते. हे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे. त्याचा मला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे तुझे पुन्हा एकदा खूप खूप आभार.

तुझ्या आई-बाबांना सादर प्रणाम सांग व तुझ्या छोट्या भावाला अनेक शुभाशीर्वाद. कळावे.

तुझा लाडका मित्र.

अजिंक्य दवंडे,
मु.पो. शिरवणे
ता. दापोली, जि. रत्नागिरी
पिनकोड. 415711
ajinkyadawande2@gmail.com


3. निमंत्रण पत्र Invitation Letter Marathi

Letter writing in marathi formal and informal: तुमच्या मित्र/मैत्रिणीस पत्र लिहून वाढदिवसासाठी तुमच्या घरी येण्याचे निमंत्रण द्या.

नाव: ……..
पत्ता:…….
दि:……..

प्रिय मित्र/मैत्रीण ……..

हे पत्र मी खास कारणाने लिहीत आहे. माझा वाढदिवस जवळ येत आहे. पुढच्या महिन्यात दहा तारखेला संध्याकाळी आमच्या घरी माझ्या वाढदिवसानिमित्त छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त नि माझ्या काही खास मित्र मैत्रिणींना वाढदिवसाचे निमंत्रण पाठवले आहे. तू देखील न चुकता माझ्या वाढदिवसाला यायचे आहे.

आम्ही वाढदिवसासाठी पाच थरांचा मोठा केक ऑर्डर केला आहे. सर्वांसाठी मी एक खास रिटर्न गिफ्ट देखील घेतले आहे. या निमित्ताने एक जादूचा शो सुद्धा आयोजित केला आहे.

वाढदिवसानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन देखील आयोजित केले आहे. तू वेळ काढून माझ्या वाढदिवसासाठी येशील हा विश्वास आहे. तुझी वाट पाहत आहे.

तुझा मित्र
……….

सारांश: Letter Writing in Marathi Formal and Informal

विद्यार्थ्यांना आता पत्र लेखन Letter Writing in Marathi अगदी सहजपणे करता येईल याची आम्हाला खात्री आहे. लेखात दिलेली सर्व उदाहरणे, नमुने नवीन फॉरमॅट letter writing in marathi new format वर आधारित आहेत. इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

तुम्हाला letter writing in marathi 2023 आधारित हा लेख कसा वाटला, किंवा Patra lekhan in Marathi बद्दल तुमचे काहीही प्रश्न, शंका असल्यास आम्हाला खाली कमेंट करून नक्की विचारा.

Frequently Asked Questions

पत्र लेखन म्हणजे काय स्पष्ट करा?

पत्र लेखन म्हणजे लेखी स्वरुपातील निरोप होय. आपल्या मनातल्या भावना, विचार दुसर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र लेखन केले जाते.

पत्रलेखनाचे किती प्रकार असतात?

पत्रलेखनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखन. तसेच, यामध्ये विनंती पत्र, मागणी पत्र, तक्रार पत्र, अभिनंदन पत्र, चौकशी पत्र, माफी पत्र असे अनेक उप प्रकार पडतात.

मराठी मध्ये पत्र लेखन कसे करावे?

पत्र लेखन करताना विविध पत्राचा प्रकार, आशय समजून घेणे महत्वाचे आहे. याबद्दल अधिक माहिती या लेखात आम्ही दिली आहे.

Sharing Is Caring:

2 thoughts on “(All Formats) मराठी पत्र लेखन 2023| Letter Writing in Marathi”

  1. विद्यार्थ्याच्या सवलतीत मिळालेले जुनी व फाटलेल्या अवस्थेतील पुस्तके आहेत याबद्दल तक्रार करणारे पत्र लिहा

    Reply

Leave a Comment