Samvad Lekhan in Marathi: आधुनिक काळात संवादाचे महत्व जवळजवळ संपत चाललेल आहे. इंटरनेटच्या मदतीने लोक सोशल मीडिया वर गप्पा मारण्यात मग्न आहेत त्यामुळे खर्या संवादाचे महत्व नष्ट होत चालले आहे.
दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्या की त्यांचे बोलणे सुरू होते. त्या एकमेकींचे कुशल विचारतात, माहिती देतात-घेतात त्यावेळी विषय, आशय, वेळ यांचे कोणतेच बंधन न ठेवता त्या एकमेकांशी बोलतात. अशा बोलण्यास संवाद म्हणतात.
संवाद लेखनाचे प्रमुख उद्दीष्ट विद्यार्थ्यांना सुसंवादी बनवणे. ‘संवाद कौशल्य’ हा प्रभावी व्यक्तिमत्वाचा अपरिहार्य पैलू आहे. उत्कृष्ट संवाद साधणारी व्यक्ती त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वत:चे वेगळेपण सिद्ध करते.
आजच्या लेखामध्ये आपण संवाद लेखन Samvad Lekhan in Marathi आणि त्यावर आधारित नमुने पाहणार आहोत. खालील संवाद लेखन इयत्ता 7वी, 8वी, 9वी सर्व इयत्तेसाठी उपयुक्त ठरेल.
संवाद लेखन म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ठ विषयावर दोन किंवा अधिक दोन किंवा अधिक लोकांनी व्यक्त केलेली मत मतांतरे, त्या विषयी केलेले विचार, चिंतन आणि विषयानुरूप केलेले सुसंगत संभाषण म्हणजे संवाद मराठी होय.
आपणास हव्या असलेल्या विषयाची माहिती घेण्यासाठी अथवा देण्यासाठी त्या विषयावरचे चिंतन व विषयानुरूप सुसंगत असे संभाषण म्हणजे संवाद होय. हेच विचार लिहून दाखविण्यास संवाद लेखन | Samvad Lekhan in Marathi म्हणतात.
संवाद लेखन असे करावे / करू नये
आकर्षक संवाद लेखन Samvad Lekhan in Marathi कसे करावे आणि काय टाळावे हे सविस्तर समजून घेण्यासाठी खलील तक्ता पहा.
असे असावे | असे असू नये |
---|---|
1. संवाद कोणा कोणात सुरू आहे, याची स्पष्ट कल्पना लेखनातून यावी. | 1. हो – नाही स्वरूपाचे संवाद नसावेत. |
2. संवादातील दोन व्यक्ति भिन्न स्तरावरील (वय, व्यवसाय, लिंग) असतील तर त्या नुसार भाषा बदलती असावी. | 2. बोलणे पाल्हाळिक नसावे. |
3. संवादातील वाक्ये सोपी, सुटसुटीत, अनौपचारिक असावीत. | 3. मध्येच बोलणे थांबवल्याची भावना नसावी. |
4. संवादाचा योग्य समारोप असावा. | 4. संवाद ओढून-ताणून केलेला नसावा. |
5. संवादातील वाक्ये चटकदार असावीत. | 5. संवाद मुद्दे सोडून भरकटणारा नसावा. |
6. संवाद वाचल्यावर त्या विषयावरचा सर्वांगीण विचार वाचकापर्यंत पोहोचावा. | 6. संवाद अपेक्षाभंग करणारा नसावा. |
7. संवादाचा शेवट परिणामकारक असावा. | 7. संवाद लेखन कंटाळवाणा नसावा. |
संवाद लेखनासाठी आवश्यक बाबी
- संवाद लेखनाच्या विषयाला दोन किंवा अधिक भिन्न दृष्टीकोन असायला हवेत.
- संवाद लेखनातील भाषा बोलणार्या व्यक्तीच्या तोंडी शोभेल अशी असावी.
- संवादातील |Samvad Lekhan in Marathi वाक्ये लांबलचक असू नयेत.
- संवादात केवळ प्रश्नोत्तरे नसावीत. (विधानार्थी व उद्गारार्थी वाक्ये वापरावीत)
- संवाद लेखनात एकाच व्यक्तीचे लांबलचक भाषण नसावे.
- संवादात खटके, उत्तर-प्रत्त्युतरे असावीत म्हणजे संवाद जीवंत वाटतो.
- Samvad Lekhan in Marathi ऐकताना किंवा वाचताना कथानक पुढे पुढे सरकत गेले पाहिजे.
- संवादाच्या सुरूवातीस स्थळ, काळ, प्रयोगविषयक सूचना असाव्यात.
- संवाद लेखनाचा शेवट नेहमी परिणामकारक असावा.
संवाद लेखन मराठी 9वी
1. दोन मित्रांमधील संवाद लेखन
संवाद लेखन in English: सकाळी लवकर उठण्याचे फायदे
संजय: अरे विजय, कसा आहेस?
विजय: संजय, मी ठीक आहे! तू कसा आहेस?
संजय: मी पण ठीक आहे! पण तू शाळेत यायला नेहमी उशीर का करतोस? जर तू दररोज इतका उशीरा आलास, तर तु अडचणीत येशील.
विजय: हो रे, तुझं म्हणणं बरोबर आहे. खरचं, मी नेहमी वेळेवर यायचा प्रयत्न करतो, पण मला शक्य होत नाही.
संजय: का नाही शक्य होत तुला? तू सकाळी किती वाजता उठतोस?
विजय: मी सहसा सकाळी ९ वाजता उठतो. खरं तर, मी रात्री उशीरा पर्यंत टीव्ही पाहत असतो, आणि मग झोपायला उशीर होतो.
संजय: अरे आपण लवकर उठले पाहिजे आणि लवकर उठण्याचे फायदे मिळवले पाहिजेत. तुला ही म्हण माहीत नाही का? “लवकर झोपणे आणि लवकर उठणे माणसाला निरोगी, श्रीमंत आणि शहाणा बनवते!”
विजय: चल! या सगळ्या गोष्टींवर तुझा विश्वास आहे?
संजय: होय नक्कीच!
विजय: बर! सांग मग लवकर उठण्याचे काय फायदे आहेत?
संजय: म्हणीप्रमाणे, ते आपल्याला निरोगी, श्रीमंत आणि शहाणे बनवते.
विजय: पण मला शाळेसाठी वक्तशीर होण्यास याची कशी मदत होईल?
संजय: जर तु सकाळी लवकर उठलास तर, तुला नाश्ता करायला, गृहपाठ करायला भरपूर वेळ मिळेल. त्यानंतर तुझी आंघोळ करून शाळेसाठी तयार होऊ शकतोस आणि वेळेपूर्वी आधी पोहचू शकतोस.
विजय: हो रे तुझे बरोबर आहे. सकाळी लवकर उठून मी माझ्या वेळेचा अजूनही सदुपयोग करू शकतो. आणि मी सकाळी नदी किनारी फेर फटका मारायलाही जाऊ शकतो, खर तर मला आवडते ते!
संजय: नक्कीच! सकाळी लवकर उठले तर मन आणि शरीर ताजेतवाने राहते.
विजय: होऊ, तुझे म्हणणे बरोबर आहे. मी अंधारात होतो. रात्री उशीरा झोपण्यापेक्षा मी लवकर झोपत जाईन, आणि सकाळी लवकर उठत जाईन.
संजय: हा निच्छितच छान निर्णय आहे. उद्या आपण दोघे जाऊयात, नदीकाठी फेरफटका मारायला.
विजय: होय नक्कीच, मी तुला उद्या सकाळी भेटेन.
2. संवाद लेखन मराठी पुस्तक आणि मोबाईल
Samvad Lekhan in Marathi: पुस्तक आणि मोबाईल यांमधील संवाद
मोबाईल: या काळामध्ये सगळेच माझा वापर करतात. कोणी कामासाठी, कोणी अभ्यास करण्यासाठी तर कोणी गेम खेळण्यासाठी. तुला तर सगळे विसरतचं चालले आहेत.
पुस्तक: अरे माझं अस्तित्व तुझ्या पहिले या जगात आले आहे.
मोबाईल: पण आता तर जास्त माझा उपयोग होतो ना! सगळ्या गोष्टींसाठी लोक माझा वापर करत आहेत.
पुस्तक: हो मी मानतो की तुझे पण अस्तित्व या जगात महत्वाचे आहे.
मोबाईल: या काळात माझे अस्तित्व तुझ्याहूनही महत्वाचे झाले आहे.
पुस्तक: पण मोबाईल घेऊन घरबसल्या कोणी डॉक्टर, इंजिनीअर, पोलिस, शिक्षक तर नाही बनत ना..? त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि तुझे अस्तित्व ही माझ्यामुळेच आहे.
मोबाईल: ते कसं काय?
पुस्तक: तुला बनवायला ही सर्वप्रथम माझा अभ्यास करावा लागला होता. तुझ्या मधले ‘अ,ब,क,ड’ असे अक्षर पुस्तकातून मोबाईल मध्ये रूपांतरित करून टायपिंग हा प्रकार आला.
मोबाईल: मला माफ कर! मला वाटले माझे अस्तित्व तुझ्यापेक्षाही महत्वाचे आहे.
पुस्तक: जाऊ दे, तुला समजले ना..
मोबाईल: होय!
पुस्तक: साधू संतांच्या काळापासून तर आतापर्यंत माझा वापर होत आहे आणि ही परंपरा अशीच चालत राहावी अशी मी आशा करतो.
3. शिक्षक आणि विद्यार्थी संवाद लेखन मराठी
Samvad Lekhan in Marathi – विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद लिहा.
विद्यार्थी: सर, या वर्षी सहलीला आपण कुठे जायचं?
शिक्षक: विद्यार्थ्यांनो, यावेळी सिंहगडावर सहलीला जायचे आहे.
विद्यार्थी: सिंहगड नको सर, दुसरीकडे कुठेतरी सहलीला न्या.
शिक्षक: विद्यार्थ्यांनो तुम्हीच सुचवा चांगल ठिकाण मग.
विद्यार्थी: सर आरे कॉलनी, सर येतूर जंगल, सर एलिफंटा.
शिक्षक: अरे, सर्वांनी गोंधळ घालू नका. एकेकाने सांगा. मग आपण विचार करू व ठरवू. ‘आशा, तुला कोठे सहल जावी असे वाटते?’
विद्यार्थिनी (आशा): सर, आपण पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्य पहायला जावे असे मला वाटते. त्या ठिकाणी आपल्याला अनेक पशू, पक्षी, प्राणी व वनवाश्यांच्या गमती-जमती पाहता येतील व त्यांच्याशी संवाद साधता येईल.
शिक्षक: विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आवडणार्या ठिकाणाचे नाव कागदावर लिहा. आपण सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून एक नाव ठरवू.
विद्यार्थी: बरोबर सर, कोणावर ही अन्याय नाही. सगळ्यांना समान संधी.
संवाद लेखन मराठी 8वी
1. संवाद लेखन आई व मुलगा मराठी
Samvad Lekhan in Marathi: आई व मुलगा संवाद लेखन मराठी
आई: श्याम (मुलगा) आलास कां बाळ, भिजलास बघ. जा कपडे बदल आधी.
श्याम: अगं आई, फार नाही भिजलो आता कपडे बदलतो.
आई: श्याम या गाठोड्यात काय आहे?
श्याम: अगं आई, माझे कपडे व माझ्या लाडक्या भावासाठी मी आणलेला हा कोट.
आई: श्याम, हा कोट कोणाचा? कोणी दिला तुला? मोरूकडे द्यावयाचा आहे का?
श्याम: नाही, मी पुरूषोत्तमसाठी शिवून आणला आहे.
आई: पैसे रे कुठले ? फी साठी दिलेले पैसे खर्च तर नाही खर्च केलेस ना तू?
श्याम: नाही आई. मी फी साठी दिलेले पैसे नाही खर्च केले.
आई: कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? चोरले तर नाहीस ना?
श्याम: आई खरचं सांगतो मी कोणाचे पैसे घेतले नाही व चोरीही केली नाही. मला बाबांनी खाऊसाठी दिलेले पैसे मी जमा करून हा कोट आणला.
आई: छान! तु खरचं खूप समजूतदार आहेस बघ. असच नेहमी खर बोल आणि नेहमी चांगले कार्य कर.
श्याम: होय आई!
2. संगणकाचा महिमा संवाद लेखन
Samvad Lekhan in Marathi: संगणकाचा महिमा या विषयावर आजोबा व नात यांतील उत्कृष्ट संवाद
आजोबा: बरेच दिवस झाले चेन्नईला येऊन! मला मुंबईला गेले पाहिजे.
शिवानी (नात): आजोबा तुम्ही तर खूप दिवस राहणार आहे असं म्हटले होते.
आजोबा: अगं दिवसभर मी एकटा असतो घरात. इथे मराठी वर्तमानपत्र सुद्धा मिळत नाही मग मी वेळ कसं घालवणार?
शिवानी: एवढंच ना आजोबा! तुम्हाला रोज वर्तमानपत्र वाचायला मिळेल याची व्यवस्था मी करते.
आजोबा: ते कसं शक्य आहे बुवा?
शिवानी: आजोबा, हे संगणकाच युग आहे. नेटवरून काही सेकंदातच जगातील कोणतीही गोष्ट आपण घरबसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो. आता जगात अशक्य असं काहीच राहील नाही.
आजोबा: पोरी, हे सगळं मी ऐकलंय खरं…
शिवानी: आजोबा, मी नेट सुरू ठेवलय. कोणतं वर्तमानपत्र वाचायचंय तुम्हाला?
आजोबा: ‘सकाळ’ वर्तमानपत्र वाचायची माझी इच्छा आहे.
शिवानी: थांबा! मी आता ते वर्तमानपत्र तुम्हाला वाचायला उपलब्ध करून देते. हे घ्या.
आजोबा: अरे व्वा! सगळी पाने दिसायला लागली की इथे. सगळ्या बातम्या वाचतो आता.
शिवानी: आजोबा, तुम्ही आता तुमच्या मित्रांना ईमेल पण करू शकता.
आजोबा: खरंच पोरी, ‘संगणकाचा महिमा अगाध आहे’. या संगणकाने संपूर्ण जगाला एकदम जवळ आणलंय!
संवाद लेखन मराठी 7वी
Samvad Lekhan in Marathi: खालील संवाद लेखन मराठी इयत्ता 7वी तसेच इतर इयत्तेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत.
1. संवाद लेखन मराठी झाड व झोका
झोका: झाडदादा, बघ ना झोके घेताना किती मज्जा येते!
झाड: तू मजेत आहे हे बघून मलाही आनंद मिळतो.
झोका: मी तर तुझ्याच खांद्यावर खेळतो.
झाड: अरे, तुझ्याप्रमाणेच अनेक पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळतात, बागडतात.
झोका: होय रे, त्या वेळी किती छान दिसतोस तू!
झाड: जेव्हा मूलं तुझ्यासोबत झोके घेतात, तेव्हा किती हर्षभरीत होतोस तू!
झोका: तेच आपलं जीवन नाही का?
झाड: खरं आहे रे. दमला भागला वाटसरु माझ्याकडे येतो, तेव्हा मी त्याच्यावर सावली धरतो.
झोका: हेच ते, हेच ते. तू पाहतोस ना हल्ली पावसातही मुले झुंडीने येतात माझ्याकडे.
झाड: त्या वेळी वरून पाऊस बरसत असतो आणि तुझ्या मनात आनंद बरसत असतो.
झोका: खूप धमाल येते रे!
झाड: हेच आपले सवंगडी! हेच आपले नातेवाईक!
झोका: खरंय रे, ते आपल्या साथीने आनंद मिळवतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो.
झाड: सगळेजण असेच आनंदात राहू दे.
2. संवाद लेखन दुकानदार आणि ग्राहक मराठी
Samvad Lekhan in Marathi: दुकानदार आणि ग्राहक यांमधील संवाद लेखन
ग्राहक मुलगा: अहो, दुकानदारकाका!
दुकानदार: काय रे बाळा? काय हवंय तुला?
ग्राहक: एक किलो साखर.
दुकानदार: ही घे एक किलो साखर.
ग्राहक: ही एक किलो आहे का?
दुकानदार: हो. आम्ही आधीच एक-एक किलोच्या पिशव्या तयार केल्या आहेत.
ग्राहक: ठीक आहे, एक किलो साखरेचे किती पैसे?
दुकानदार: अठ्ठावीस रुपये.
ग्राहक: हे घ्या पैसे. ही पन्नास रुपयांची नोट आहे. मला बावीस रुपये परत द्या.
दुकानदार: अरे व्वा! तुझं गणित चांगलं आहे! हे घे तुझे उरलेले बावीस रुपये.
ग्राहक: धन्यवाद, काका!
पुढे वाचा:
- जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan in Marathi
- प्रसंग लेखन मराठी | Prasang Lekhan in Marathi
- संवाद लेखन निबंध
निष्कर्ष – Samvad Lekhan in Marathi
तुम्हाला संवाद लेखन मराठी विषयावर लिहिलेलं हे पोस्ट आवडलं असेल अशी आम्ही आशा करतो. लेखात काही चुका आढळल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.
Samvad Lekhan in Marathi लेखातून तुम्हाला मदद झाली असल्यास तुमच्या वर्ग मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करायला विसरू नका.
MPSCMarathi द्वारे अशीच उपयुक्त शैक्षणिक माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद!