[10 ओळी] माझी आई निबंध Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines

Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझी आई या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. शाळांमध्ये आणि अनेकदा परीक्षेमध्ये Majhi Aai Nibandh विचारला जातो.

चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या आवडत्या निबंधाला सुरुवात करूया.

माझी आई निबंध 300 शब्द Mazi Aai Marathi Nibandh

Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines: Mazi Aai Marathi Nibandh 1

आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. अस म्हणतात की देव स्वत: या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो.

माझी आई सुद्धा मला घडविण्यात दिवस रात्र कष्ट घेत असते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते.

घरातील प्रत्येक व्यक्तिला काय हव नको याकडे तिचे लक्ष असते.

मी कधी आजारी पडले तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. माझी आई मला काय चांगले व काय वाईट या बद्दलही सांगत असते. मी कधी रूसले तर गोड बोलून ती मला हसवते. मी स्वत:ला भाग्यवान समजते कि देवाने मला एवढी प्रेमळ आई दिली आहे.

हे देखील पहा: {2023} आई बेस्ट मराठी निबंध Mazi Aai Nibandh in Marathi


Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines: Majhi Aai Marathi Nibandh 2

जो शब्द उच्चारताच आभाळाएवढी शक्ती अंगात संचारते जिच्या वात्सल्यापुढे सार्‍या जगाचे प्रेम फिके पडते, ती महान शक्ती किंवा तो महान शब्द म्हणजे आई!

आई या शब्दात दोनच अक्षरे आहेत; पण किती सामर्थ्य आहे या शब्दांत! आईची महती सांगायला खरेच माझे शब्दभांडार अपुरे पडते.

माझी आई माझा गुरु, कल्पतरू, सौख्याचा सगरू, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार आणि अमृताची धार आहे. मी जन्माला येण्या अगोदरपासून माझ्यावर खूप खूप प्रेम करणारी आणि माझ्या पावला-पावलाला होणार्‍या चुका पोटात घालणारी ती माऊली म्हणजे अमृताचा मूर्तिमंत झराच!

छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजामाता, प्रभू रामचंद्रांना घडवणारी माता कौशल्या तसेच महात्मा गांधी, ए.पी.जे. अब्दुल कलाम आदि महान व्यक्तींना घडवणार्‍या त्यांच्या माता आणि माझी माय यांच्यात मला तरी काहीही फरक वाटत नाही.

मी महान बनण्यासाठी माझी आई रात्रंदिवस कष्ट सोसते. थोर व्यक्तींच्या कथा मला सांगते. माझ्या अनेक चुका आई पोटात घालते; पण त्या चुकांवर कधीच पांघरून घालत नाही.

माझे प्रेरणास्थान म्हणजे माझी आई. माझ्या आईच्या प्रेरणेमुळेच माझ्यात गरुडासारखे पंखात बळ येते. जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग सुचतात. वाममार्गाकडे झुकलेली पावले सन्मार्गाकडे वळतात.

अशीच आई सर्वांना लाभो हीच माझी देवा चरणी प्रार्थना!

Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines

majhi aai nibandh in marathi 10 lines

Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines: Majhi Aai Nibandh in Marathi 20 Lines, Majhi Aai Nibandh in Marathi 50 Lines

काळजाची हाक असते आई,
नि:शब्द जाग असते आई!
अंतरीचे गूढ असते आई,
ईश्वराचे रूप असते आई!

  1. माझ्या आईचे नाव सरिता आहे.
  2. ती खूप प्रेमळ आहे.
  3. ती दररोज सकाळी लवकर उठते.
  4. माझी आई छान स्वयंपाक करते.
  5. ती नेहमी आनंदी असते.
  6. ती घरातील प्रत्येकाची काळजी घेते.
  7. माझी आई माझी चांगली मैत्रीण आहे.
  8. ती मला अभ्यासात मदत करते.
  9. माझी आई मला छान-छान गोष्टी सांगते.
  10. माझी आई मला खूप आवडते.

माझी आई निबंध मराठी 20 ओळी

Majhi Aai Nibandh in Marathi 20 Lines: Majhi Aai Nibandh in Marathi 50 Lines, Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines

आई एक नाव असते,
जगावेगळा भाव असते…
आई एक जीवन असते,
प्रेमळ मायेचे लक्षण असते…

  1. माझ्या आईचे नाव मिनल आहे.
  2. माझी आई खूप प्रेमळ आणि दयाळू आहे.
  3. ती माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे.
  4. माझी आई दर सकाळी लवकर उठते.
  5. आई दैनंदिन कामे नियमित पार पाडते.
  6. माझ्या शाळेची सर्व तयारी माझी आई करून देते.
  7. माझी आई नेहमी सर्वांच्या आवडीचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवते.
  8. आम्ही सर्वजण आईला घरातील अन्नपूर्णा असे म्हणतो.
  9. माझी आई मला अभ्यासातही मदत करते.
  10. ती मला नेहमी शौर्‍याच्या गोष्टी सांगत असते.
  11. माझी आई आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.
  12. ती घरातील सर्वांची काळजी घेते.
  13. मी कधी चुकलो तर ती मला समजावून सांगते.
  14. माझी आई नेहमी मला नेहमी खरे बोलायला सांगते.
  15. मी आजारी पडलो तर आई माझी खूप काळजी घेते.
  16. माझी आई गरीब लोकांना नेहमी मदत करते.
  17. नवीन गोष्टी करण्यासाठी आई मला नेहमी मदत करते आणि प्रोत्साहन देखील देते.
  18. कुटुंबाच्या सुख-दुखात आई नेहमी सहभागी होते.
  19. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते.
  20. आणि म्हणूनच माझी आई मला खूप आवडते.

माझी आई निबंध 50 ओळी

Majhi Aai Nibandh in Marathi 50 Lines: Majhi Aai Nibandh in Marathi 20 Lines, Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines

आई एक श्वास असते,
जिव्हाळ्याची रास असते…
आई एक आठवण असते,
प्रेमाची साठवण असते…

  • माझ्या आईची नाव सीता आहे.
  • आई हा अनमोल शब्द आहे.
  • आई या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे.
  • माझी आई एक गृहिणी आहे.
  • ती खूप गोड आहे.
  • आई हे प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे.
  • माझी आई दररोज सकाळी लवकर उठते आणि तिचे दैनंदिन काम सुरू करते.
  • आई आमच्या घराची लक्ष्मी आहे.
  • माझी आई माझी प्रेरणा, गुरु, व जिवलग मैत्रीण आहे.
  • माझी आई सर्वात सुंदर, प्रेमळ आणि दयाळू आहे.
  • माझी आई कुटुंबातील सर्वांसाठी मधुर खाद्यपदार्थ बनविते, म्हणून आम्ही तिला घरची अन्नपूर्णा असे म्हणतो.
  • माझ्या शाळेची सर्व तयारी माझी आईच करून देते.
  • माझी आई मला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत करते.
  • ती मला नेहमी योग्य गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करते.
  • माझी आई नेहमी मला रामायण, महाभारतातील कथा सांगते.
  • माझी आई आमच्या कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ आहे.
  • ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझी मला खूप आवडते.

अधिक निबंध वाचा:

सारांश: My Mother Essay in Marathi

विद्यार्थ्यांना माझी आई निबंध Majhi Aai Nibandh in Marathi 10 Lines नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या आई बद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल दोन शब्द नक्कीच कमेन्ट मध्ये टाका. मराठी निबंध लेखन, व्याकरण आणि उपयुक्त शालेय महितीसाठी आमच्या वेबसाईट पुन्हा भेट नक्की द्या.

धन्यवाद!

Leave a Comment