5+ अभिनंदन पत्र लेखन मराठी |Abhinandan Patra Lekhan in Marathi

Abhinandan Patra Lekhan in Marathi: विद्यार्थ्यांनो आजच्या लेखात आपण अभिनंदन पत्र लेखन कसे करावे याची माहिती जाणून घेणार आहोत. जसे की तुम्हाला माहीतच आहे की पत्र लेखनाचे मुख्यत: दोन प्रकार आहेत औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन. पत्र लेखनाचे इतरही काही उप प्रकार पडतात ज्याबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

अभिनंदन पत्र लेखन हा अनौपचारिक पत्रलेखनाचा प्रकार आहे. यामध्ये कौटुंबिक पत्र लिहिली जातात म्हणजेच आपले आई-बाबा, मित्र, लहान भाऊ-बहीण अशा जिव्हाळ्याच्या व्यक्तींना अनौपचारिक पत्र पाठवले जाते.

आज आपण अभिनंदन पत्र कसे लिहावे, किंवा त्याचा फॉरमॅट कसा असावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच काही नमुने (abhinandan patra lekhan in marathi pdf) देखील अभ्यासणार आहोत.

Abhinandan Patra Lekhan in Marathi

विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला अनेकदा अभिनंदन पत्र इयत्ता दहावी तसेच इतर इयत्तेसाठी abhinandan patra lekhan वर प्रश्न विचारला जातो ज्यामध्ये बहिणीला अभिनंदन पत्र, मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र मराठी इ. कृती दिली जाते.

  • वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल आपल्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
  • चित्रकला स्पर्धेत मित्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र.
  • तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा.

अभिनंदन पत्र लेखन कसे करावे? (फॉरमॅट)

Abhinandan Patra Lekhan in Marathi
  1. अभिनंदन पत्र लिहिताना कृतीपत्रिकेच्या डाव्या कोपर्‍यात सर्वात पहिले दिनांक आणि त्याखाली ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता लिहावा.
  2. त्याखाली ‘प्रिय’ या शब्दापासून पत्र लेखनाची सुरुवात केली जाते कारण आपण आपल्या प्रियजनांना पत्र लिहीत असतो. उदा. प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय समीर इ.
  3. त्यानंतर खाली सन्मानपूर्वक शब्दाचा वापर करावा म्हणजेच आई-बाबांसाठी पत्र लिहीत असल्यास ‘साष्टांग नमस्कार असे लिहितात, तसेच लहान भावंडांना किंवा मित्र-मैत्रिणींना पत्र लिहिताना ‘सप्रेम नमस्कार’ असे लिहिले जाते.
  4. त्याखाली पत्राचा मजकूर लिहावा.
  5. मजकूर लिहिल्यानंतर खाली ‘कळावे’ या शब्दाचा वापर करावा आणि त्याखाली ‘तुझा/तुझी’ आणि त्यापुढे तुमचे त्या व्यक्तीशी असलेले नाते लिहावे.
  6. सर्वांत शेवटी आपला पत्ता, ईमेल आयडी, आणि मोबाईल नंबर या गोष्टींचा उल्लेख करावा.

1. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल आपल्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Abhinandan Patra Lekhan in Marathi:

दिनांक. 12 जून 2023
विद्या कॉलनी, विश्रामबाग,
सांगली 418124

प्रिय मित्र समीर,
सप्रेम नमस्कार

सर्वप्रथम तू जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल तुझे, तुझ्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन!

समीर कालच वर्तमानपत्रात तुझ्या फोटोसकट तुझ्या यशाची बातमी वाचली आणि अभिमानाने छाती फुलून आली. तू माझा मित्र असल्याचा सार्थ अभिमान वाटला. खर म्हटलं तर तू लहानपणापासूनच वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धत भाग घ्यायचास व यश मिळवायचास पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये तू पहिला नंबर पटकावलास ही खूप मोठी गोष्ट आहे.

तुला पुढे असेच यश मिळत जावो व तू राज्यभर चांगला वक्ता म्हणून प्रसिद्ध होवो हीच अपेक्षा करतो. आपण लवकरच भेटूया. तुझ्या आई-बाबांना सादर प्रणाम सांग. पुन्हा एकदा तुझे खूप खूप मन:पूर्वक अभिनंदन!

कळावे,
तुझा जिवलग मित्र, भावेश मोरे
क्रांतिनगर, कांदिवली पूर्व,
मुंबई 400101
ईमेल – bhaveshmore@gmail.com

2. चित्रकला स्पर्धेत मित्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र

Abhinandan Patra Lekhan in Marathi

दिनांक. 12 जून 2023
स्मिता कॉलनी, रामबाग,
सातारा 418124

प्रिय शुभम,
सप्रेम नमस्कार

आजच्या सकाळ वृत्तपत्रात पाहिल्याच पानावर तुझा फोटो आणि राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आल्याची बातमी वाचली. खूप आनंद झाला. त्याबदल तुझे हार्दिक अभिनंदन!

मला माहित आहे की, याअगोदर ही तू आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होतास. तेव्हापासून तुझ्या यशाची कमान चढत गेली. तुला तुझ्या आई-बाबांनी व चित्रकलेच्या सरांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.

असाच यापुढेही तू यशस्वी हो. मला खात्री आहे की तू भविष्यात नक्की एक खूप मोठा चित्रकार होशील. तुझ्या यशाबद्दल तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन!

कळावे,
तुझा मित्र, अ.ब.क.
रामनगर, मालाड पूर्व,
मुंबई 400101
ईमेल – xyz@gmail.com

3. तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा.

Abhinandan Patra Lekhan in Marathi

दिनांक. 18 मार्च 2023
एकनाथ बिल्डिंग, रानडे रोड,
सोलापूर 418124

प्रिय अंकिता,
अनेकोत्तम आशीर्वाद.

आज सकाळीच दैनिक ‘सकाळ’ मध्ये तू शालेय पावसाळी क्रीडा प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावल्याची बातमी वाचली आणि आनंदाला पारावार राहिला नाही. या उत्तुंग कामगिरीसाठी तुझे खूप-खूप अभिनंदन!

लहानपणापासूनच तुला धावण्याची खूप आवड होती. गेल्या अनेक दिवसांपासून तुझा सराव देखील सुरू होता. आज स्पर्धा जिंकून तू या यशाला गवसणी घातली. खूप आनंद झाला. यापुढेही सातत्य टिकवून ठेव.

मी, आई-बाबा इकडे मजेत आहोत. लवकरच तुला भेटायला येणार आहोत.

कळावे,
तुझा लाडकी बहीण , अ.ब.क.
विरा नगर, ठाणे पूर्व,
मुंबई 400301
ईमेल – xyz@gmail.com

हे देखील पहा >>

सारांश: Abhinandan Patra Lekhan in Marathi

आम्ही आशा करतो की Abhinandan Patra Lekhan in Marathi कसे लिहावे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली आहे. तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

तुम्हाला हा लेख कसा वाटला तसेच तुम्हाला इतर कोणत्याही विषयाची माहिती हवी असल्यास आम्हाला आम्हाला खाली कमेन्ट करून नक्की कळवा. शालेय उपयुक्त महितीसाठी आम्हाला पुन्हा भेट द्यायला विसरु नका.

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment