100+ समूहदर्शक शब्द मराठी | Samuh Darshak Shabd

Samuh Darshak Shabd: आजच्या लेखात आपण मराठी व्याकरण ‘समूहदर्शक शब्द‘ या विषयावर अभ्यास करणार आहोत, ज्यांनाच इंग्रजी मध्ये Collective Nouns असे म्हणतात.

ज्या शब्दातून आपल्याला समूह असल्याचा बोध होतो त्या शब्दांना समूहदर्शक शब्द | Samuh Darshak Shabd असे म्हणतात.

स्पर्धा परीक्षा, नवोदय परीक्षा, तसेच स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना Samuh Darshak Shabd विषयावर अनेक वेळा प्रश्न विचारले जातात, परंतु पुरेशी माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना बरोबर उत्तरे देता येत नाहीत.

आज आपण 100 पेक्षा जास्त समूह दर्शक शब्द अभ्यासणार आहोत जेणेकरून तुम्ही अगदी सहजपणे या विषयावर पूर्ण गुण मिळवू शकता.

चला तर मग जाणून घेऊया… Samuh Darshak Shabd in Marathi | समूहदर्शक शब्द मराठी

समूहदर्शक शब्द 100 | Samuh Darshak Shabd

क्र.शब्दसमूहदर्शक शब्द
1. लोकांची गर्दी, जमाव
2. फुलांचा
Fulancha Samuh Darshak Shabd
गुच्छ
3. लमाणांचा / उंटांचा तांडा
4. उतारूंची झुंड, झुंबड
5. वाळूचा ढीग
6. तारकांचा पूंज
7. किल्ल्यांचा जुडगा
8. लोकप्रतींनिधीची संसद
9. साधूंचा जथ्था
10.आदिवासींचा समूह
11.केळीचा घड
12.लतावेळीचा कुंज
13.पक्षांचा
Pakshyancha Samuh Darshak Shabd
थवा
14.मधमाशांचे मोहोळ
15.वारकर्‍यांची दिंडी
16.संतांची मांदियाळी
17.मुंग्यांची रांग
18.वाचकांचा मेळावा
19.सैनिकांची पलटण, तुकडी
20.समूहदर्शक शब्द लाकडाची मोळी
21.समूहदर्शक शब्द खेळाडूचा संघ
22.जहाजांचा काफिला
23.वस्तूंचे भांडार
24.वानरांची / माकडांची टोळी
25.माणसांचा घोळका
26.दरोडेखोरांची टोळी
27.विमानांचाताफा
28.मेंढरांचा कळप
29.भाकरीची / पोळ्यांचीचवळ
30.महिलांचे मंडळ
31.करवंदीचीजाळी
32.भाताची लोंबी
33.हत्तीचा कळप
34.गवताचीपेंढी, गंजी
35.गव्हाची ओंबी
36.पोत्यांचीथप्पी
37.गुलाबांचा ताटवा
38.काजूंची गाथण
39.भक्तांचीरांग, लोंढा
40.मडक्यांची उतरंड
41.फळझाडयांचेउपवन
42.आंब्यांचीआढी
43.तार्‍यांची आकाशगंगा
44.घोड्यांची तुकडी
45.पंत्यांची माळ, आरास
46.द्राक्षांचा घड, घोस
47.केसांचाझुबका
48.खाटिकांचीचाळ
49.विचारवंतांची परिषद
50.खेचरांचे टोळके
51.केसांची बट
52.प्रश्नपत्रिकांचा संच
53.केळ्यांचा लोंगर
54.घरांची चाळ, आळी
55.हरणांचा कळप
56.ढगांचेघनमंडल
57.नोटांचे पुंडके
58.विटांचा ढिगारा
59.उपकरणांचा संच
60.कवितांचा संग्रह
61.नावांची यादी, सूची
62.खारकांचा ढीग
63.पालेभाज्यांची गड्डी
64.कार्यकर्त्यांची संघटना
65.नारळाची पेंड
66.बालवीरांचेपथक
67.आंब्याच्या झाडांची राई
68.गंथप्रेमींचे साहित्य संमेलन
69.फळांचा घोस
70.कालिंगडाचा ढीग, डोंगर
71.फुलझाडांचा ताटवा
72.दूर्वाची जुडी
73.धान्याची रास
74.आंब्याची अढी
75.नाण्यांची चळत
76.केसांचा पुंजका
77.भांड्यांची उतरंड
78.मुंग्यांची रांग
79.विद्यार्थ्यांचा गट
80.प्रवाशांची झुंबड
81.समूहदर्शक शब्द बांबूचे बेट
82.वाद्यांचा वृंद
83.ऊसाची मोळी
84.वह्या-पुस्तकांचा गठ्ठा
85.वेलींचा ताटवा, कुंज
86.माशांचीगाथण
87.गुरांचा समूहदर्शक शब्द / गाईगुरांचेखिल्लार
88.कडब्याची पेंढी
89.समूहदर्शक शब्द मुलांचाघोळका
90.समूहदर्शक शब्द भाजीचीजुडी

वाचा >> वाक्य आणि वाक्याचे प्रकार

समूहदर्शक शब्द स्वाध्याय

Samuh Darshak Shabd

प्र. 1) रिकाम्या जागी योग्य समूह दर्शक शब्द | Samuh Darshak Shabd निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

1. सकाळ झाली की पक्ष्यांचा …… आकाशात दिसू लागतो.
(अ) कळप (ब) गट (क) पुंजका (ड) थवा

2. पूर्वी घराघरात मडक्यांची …… असे.
(अ) रास (ब) उतरंड (क) थप्पी (ड) अढी

3. जंगलातील प्राणी …… करून राहतात.
(अ) गट (ब) घोळका (क) कळप (ड) जमाव

4. दुकानात नारळांचा …… पडला होता.
(अ) घोस (ब) जुडगा (क) घड (ड) ढीग

5. वारुळाजवळ मुंग्यांची …… लागली होती.
(अ) रास (ब) झुंबड (क) रांग (ड) कळप

  • समूहदर्शक शब्द मराठी pdf
  • Samuh Darshak Shabd 50

प्र. 2) दिलेला समूह दर्शक शब्द | Samuh Darshak Shabd कोणत्या गटासाठी वापरला जातो तो निवडा.

1. गुच्छ : (अ) गवताचा (ब) भाजीचा (क) दुर्वांचा (ड) फुलांचा

2. ताफा : (अ) प्राण्यांचा (ब) विमानांचा (क) माणसांचा (ड) पक्ष्यांचा

3. राई : (अ) नारळांची (ब) फुलांची (क) केळ्यांची (ड) आम्रवृक्षांची

4. झुंबड : (अ) उतारुंची (ब) मुंग्यांची (क) पक्ष्यांची (ड) गाड्यांची

5. तुकडी : (अ) वाहनांची (ब) भाज्यांची (क) सैनिकांची (ड) चोरांची

6. टोळी : (अ) मुंग्यांची (ब) पोलिसांची (क) शिक्षकांची (ड) चोरांची

समूह दर्शक शब्द Quiz

योग्य समूह दर्शक शब्द | Samuh Darshak Shabd निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

Samuh Darshak Shabd in Marathi वर आधारित खलील टेस्ट सोडवा. पाहुयात किती गुण मिळतात ते तुम्हाला..

1. जसे लाकडांची मोळी, तसा किल्ल्यांचा ……..
(अ) ताटवा (ब) जुडगा (क) जुडी (ड) गुच्छ

2. दिलेल्या समूह दर्शक शब्द शी न जुळणारा पर्याय निवडा.
ढीग: (अ) विटांचा (ब) दगडांचा (क) माणसांचा (ड) कालिंगडांचा

3. गटाशी न जुळणारा पर्याय निवडा.
(अ) झुंड (ब) थवा (क) जमाव (ड) मोळी

4. अधोरेखित शब्दाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

धान्याचा मोठा ढीग बाजारात लागला होता.
(अ) साठा (ब) संच (क) रास (ड) चळत

5. जसे, गवताची गंजी; तशी ……. जुडी. (2017)
(अ) केसांची (ब) पानांची (क) फळांची (ड) पालेभाजीची

6. जशी प्रवाशांची झुंबड, तशी माशांची ……. (2018)
(अ) रास (ब) जुडी (क) थप्पी (ड) गाथण

पुढे वाचा:

सारांश: Collective Nouns in Marathi

विद्यार्थ्यांना आता समूह वाचक शब्द | Samuh Vachak Shabd in Marathi अगदी सहजपणे समजले असतील अशी आम्ही आशा करतो.

नेहमी वापरले जाणारे समूहदर्शक शब्द आपल्या लक्षात असतात. बर्‍याच वेळा परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आपल्या नेहमीच्या वापरात नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो त्यामुळे तुम्हाला या शब्दांची सराव करण्याची जास्त गरज आहे.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या वर्ग मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची जास्त मदद होईल.

लेखात काही चुका आढळल्यास किंवा इतर कोणत्याही विषयावर तुम्हाला माहिती हवी असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

परीक्षेत वारंवार विचारले जाणारे काही समूहदर्शक शब्द: Samuh Vachak Shabd in Marathi

समूहदर्शक शब्द भाजीची?

समूहदर्शक शब्द: भाजीची – जुडी

समूहदर्शक शब्द प्राण्यांचा?

Samuh Darshak Shabd in Marathi Pranyancha: प्राण्यांचा – कळप

समूहदर्शक शब्द धान्याची?

समूहदर्शक शब्द: धान्याची – रास

समूहदर्शक शब्द केळीचा?

समूहदर्शक शब्द: केळीचा – घड, केळ्यांचा – लोंगर

समूहदर्शक शब्द लाकडाची?

समूहदर्शक शब्द: लाकडाची – मोळी

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

5 thoughts on “100+ समूहदर्शक शब्द मराठी | Samuh Darshak Shabd”

  1. खुप छान 👌
    असच महत्वाचे प्रश्न, माहिती आम्हाला हवी आहेत.

    Reply

Leave a Comment