विनंती पत्र लेखन मराठी |Vinanti Patra Lekhan in Marathi

Vinanti Patra Lekhan in Marathi: तर विद्यार्थ्यांनो आज आपण उपयोजित मराठी लेखनातील विनंती पत्र लेखन मराठी अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर विनंती पत्रलेखनाचे काही महत्वाचे नमुने देखील आपण या लेखात पाहणार आहोत.

एखाद्या स्थळाला भेट द्यावयाची असेल, कोणाला निमंत्रण द्यायचे असेल, देणगी मागणे, मार्गदर्शन मिळवणे, अशा विविध कारणांसाठी विनंती पत्र लिहतात.

परीक्षेमध्ये पत्र लेखन | Vinanti Patra in Marathi आधारित प्रश्न तुम्हाला नक्की विचारण्यात येतो त्यामुळे तुम्हाला मराठी पत्र लेखन सराव असणे गरजेचे आहे.

चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या विषयाला; Vinanti Patra Lekhan in Marathi !

विनंती पत्र म्हणजे काय?

औपचारिक पत्रलेखनाचा एक भाग विनंती पत्र लेखन आहे.

एखाद्या व्यक्तिला किंवा संस्थेला लिहलेले कोणत्याही स्वरुपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे विनंती पत्र | Vinanti Patra Lekhan in Marathi होय.

विनंती पत्रामध्ये, आपणास मदत मिळावी ही आपली इच्छा असते मात्र मदत करायची की नाही हे संपूर्णपणे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते.

विनंती पत्र लिहताना घ्यावयाची काळजी | Vinanti Patra in Marathi

  • दिलेल्या कृतीचे नीट वाचन करा.
  • कृतीवरून कशाबद्दल व कोणाला विनंती करायची आहे, ते समजून घ्या.
  • विनंतीचे स्वरूप समजून घ्या.
  • विनंती पत्र लेखन करताना आपली भाषा ही विनंती करणारी असायला हवी. आपण विनंतीची भावना करत आहोत असा अर्थ आपल्या पत्रातून निघायला हवी.
  • मुख्य विषयाबरोबरच विनंतीची भावना मुख्य असायला हवी तरच आपणास माहिती अथवा मदत मिळू शकेल.

विनंती पत्र नमुने | Vinanti Patra Lekhan in Marathi

. विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करण्याबाबत विनंती पत्र

विषय – विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.

विनंती पत्र इयत्ता आठवी | Vinanti Patra Lekhan in Marathi

दि, २० मार्च २०२३

प्रति,
माननीय आयोजक
साहित्य सेवा वाचनालय,
साखरवाडी

विषय – विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करण्याबाबत

महोदय,

मी विनया देशमुख महिलाश्रम विद्यालय मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत असून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने सदर पत्र मी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहीत आहे. मागच्या आठवड्यातील आपल्या पत्रानुसार आम्हाला कळाले की, साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. तरी मी आपल्याला अशी विनंती करते की, सदर विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात यावी. त्याचप्रमाणे उत्सुक विद्यार्थ्यांची नावे, इयत्ता मी पत्रात नमूद करत आहे.
विद्यार्थ्यांची नावे: (१) राधिका मारणे – ९ वी, (२) नेहा पाटील – ९ वी, (३) अजय दातार – १० वी, (४) सायली मोरे – १० वी, (४) समीर काळे – ८ वी, (५) मोनिका भोईर – १० वी

कळावे,
आपली नम्र,
कु. विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी
महिलाश्रम विद्यालय
संपर्क – ९०xxxxxxxx
ईमेल – d.vinaya@yahoo.in


२. खेळाचे साहित्य मागण्याकरिता विनंती पत्र

विनंती पत्र इयत्ता आठवी | Vinanti Patra Lekhan in Marathi

दि. १२ फेब्रुवारी २०२२

प्रति,
माननीय मुख्याध्यापक
श्री वरुण पाटील
रामकृष्ण महाविद्यालय
पुणे

विषय – खेळाचे साहित्य मागण्याकरिता विनंती पत्र

माननीय महोदय,

मी आपल्या रामकृष्ण महाविद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. मागच्या वर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत आपल्या विद्यालयाने प्रथम परितोषिक पटकावले आहे. तरी यावर्षीदेखील होणार्‍या क्रिकेट स्पर्धेत आपल्या विद्यालयाला सहभाग घ्यायचा आहे. परंतु आपल्या विद्यालयामध्ये खेळाचे साहित्य कमी पडत असल्याकारणाने सराव करण्यास व्यतय येत आहे.
तरी माझी आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आम्हाला सरावासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे.

आपला विश्वासू,
अ. ब. क


. शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत

Vinanti Patra Lekhan in Marathiवडिलांची परवानगी बदली झाल्यामुळे अमृत गायकवाड हा विद्यार्थी, मा. मुख्याध्यापक, आदर्श विद्यालय, शिरवळ, जिल्हा – सातारा, यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी विनंती अर्ज करीत आहे, असे समजून पत्र लिहा.

दिनांक: २ जून २०२२

प्रति,
मा. मुख्याध्यापक
आदर्श विद्यालय, शिरवळ,
जिल्हा – सातारा.

विषय: शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत.

आदरणीय गुरुवर्य,

सादर नमस्कार.

मी आपल्या शाळेत इ. १० वी मध्ये शिकत आहे. ही शाळा माझी आवडती शाळा आहे. याच शाळेत शिकण्याची माझी इच्छा आहे. परंतु पोलिस खात्यात उपनिरीक्षक पदावर काम करीत असलेल्या माझ्या वडिलांची बदली कोल्हापूर येथे झाली आहे. त्यामुळे मला आपली शाळा सोडावी लागणार आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध ‘महाराष्ट्र हायस्कूल’ मध्ये माझ्या प्रवेशाची व्यवस्था झाली आहे. या शाळेत मला रीतसर प्रवेश मिळवा यासाठी ‘शाळा सोडल्याचा दाखला’ आवश्यक आहे. हा दाखला मिळवा म्हणून मी सदरचा विनंती अर्ज करीत आहे.

तरी माझ्या विनंती पत्राचा सहानुभूतिपूर्वक विचार करून मला शाळा सोडल्याचा दाखला लवकरात लवकर मिळावा, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

अमृत गायकवाड,
१०१, सावली पाटील गल्ली,
शिरवळ, सातारा ४१६५१२
संपर्क- ९८xxxxxxxx
ईमेल – abc@hotmail.com


४. शाळेच्या शुल्क माफिसाठी मुख्याध्यापकांना विनंती पत्र लिहा

विनंती पत्र इयत्ता आठवी | Vinanti Patra Lekhan in Marathi

दि. २८ जानेवारी २०२३

प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
मानवता विद्यालय,
ठाणे.

विषय – शाळेच्या शुल्क माफिसाठी विनंती अर्ज

महोदय,

मी आपल्या शाळेतील इयत्ता दहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझे वडील एका दुकानामध्ये काम करतात. त्यांचा पगार फारच कमी आहे. आम्ही तीन भावंडं आहोत. माझ्या वडिलांना शाळेची फी भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे मला माझे शिक्षण थांबवावे लागेल. मी दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक मिळवते तसेच शालेय उपक्रमात सुद्धा मी बक्षीस मिळवले आहे.

माझी आपणास नम्र विनंती आहे की माझी शैक्षणिक प्रगती लक्षात घेता माझ्या या वर्षाची शाळेची फी माफ करण्यात यावी आणि मला पुढील शिक्षण घेण्यास मदद करावी ही विनंती.

कळावे,
आपली विश्वासू,
अ. ब. क
मानवता विद्यालय

वाचा >> जाहिरात लेखन | Jahirat Lekhan in Marathi


५. शाळेसमोरील कचराकुंडी साफ करणे बाबत

Vinanti Patra Lekhan in Marathiशाळेसमोरील कचर्‍याची विल्हेवाट लावावी, यासाठी महानगरपालिकेच्या घन कचरा विभागास विद्यार्थी प्रतीनिधि या नात्याने विनंती पत्र लिहा.

दिनांक. २५ फेब्रुवारी २०२३

प्रति,
मा. मुख्य अधिकारी
घन कचरा विभाग,
पुणे महानगपालिका,
पुणे – ४११००५

विषय – शाळेसमोरील कचराकुंडी साफ करणे बाबत

महोदय,

मी अ.ब.क. साईनाथ माध्यमिक विद्यालय, वैशाख नगर येथील विद्यार्थी प्रतीनिधि या नात्याने माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने हे पत्र लिहीत आहे.
मागील दहा दिवसांपासून कचराकुंडी साफ करणारे सफाई कामगार व कचरा गोळा करणारी गाडी या परिसरामध्ये आलीच नाही. त्यामुळे शाळेतील कचराकुंडी तुडुंब भरली आहे. कचरा रस्त्यावर पसरत चालला आहे.
रहदारीचा रस्ता असल्याने कचरा विखुरला जात आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवस आहेत. दुर्गंधीही खूपच पसरली आहे व परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीच्या आजारांची भीती वाटत आहे. याबाबतीत आपण लक्ष घालून आमच्या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी. आणि कचराकुंडी साफ करून औषध फवारणीचे आदेश द्यावेत, ही नम्र विनंती.

कळावे,

आपला नम्र
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतीनिधी

श्री. साईनाथ माध्यमिक विद्यालय,
वैशाख नगर, पुणे – ४११००५
ईमेल – sainathmv@gmail.com


६. मॅरथॉन स्पर्धेत सहभागी होणेबाबत विनंती पत्र

Vinanti Patra Lekhan in Marathiजागृती युवा मंच आयोजित मॅरथॉन स्पर्धा, आकर्षक बक्षिसे, नाव नोंदणी सुरू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्यवस्थाकास विनंती करणारे पत्र लिहा.

दि. २२ मार्च २०२३

प्रति,
मा. व्यवस्थापक
जागृती युवा मंच,
सावरकर मार्ग, नाशिक

विषय – मॅरथॉन स्पर्धेत सहभागी होणेबाबत

माननीय महोदय,

मी अ. ब. क. नाशिक येथे राहणारा विद्यार्थी आहे. आपल्या ‘जागृती युवा मंचाद्वारे’ आयोजित मॅरथॉन स्पर्धेची जाहिरात मी वाचली. मागील वर्षी माझ्या मित्राने या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा जिंकली होती व आकर्षक बक्षीसही मिळवले होते. या स्पर्धेविषयी माझ्या मनात खूप उत्सुकता वाढली आहे. म्हणून या वर्षी मी आपल्या स्पर्धेत भाग घेऊ इच्छितो.
या स्पर्धेचे जे प्रवेश शुल्क आहे ते मी आपल्या मंचाकडे येऊन भरेल. तरी कृपया मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी द्यावी, ही विनंती.
स्पर्धा केव्हा आहे, किती अंतराची आहे, तिचा मार्ग कसा आहे याचे पत्रक मला मिळाले आहे व त्याप्रमाणे मी तयारीही करीत आहे.
तरी पुन्हा विनंती की मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी व परवानगी द्यावी.

आपला विश्वासू,
अ. ब. क.
विवेकानंद मार्ग, नाशिक.
abc12@gmail.com

पुढे वाचा:

सारांश – Vinanti Patra Lekhan in Marathi

दिलेले नमुने विनंती पत्र इयत्ता आठवी तसेच इतर सर्व इयत्तेसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यानी पत्राचा विषय नीट लक्षात घेऊन त्याधारे विनंती पत्र लिहण्याचा सराव करावा.

तुम्हाला Vinanti Patra Lekhan in Marathi विषयावर लिहिलेला हा लेख कसा वाटला तसेच अजूनही कोणत्या विषयावर पत्र लेखन नमुने हवे असतील तर आम्हाला खाली कमेन्ट करून नक्की सांगा.

तसेच, तुमच्या वर्ग मित्रांना हा पोस्ट शेअर करायला विसरू नका.

3 thoughts on “विनंती पत्र लेखन मराठी |Vinanti Patra Lekhan in Marathi”

Leave a Comment