(PDF) शब्दांच्या जाती व उदाहरणे | Shabdanchya Jati in Marathi

Shabdanchya Jati in Marathi: मराठी व्याकरणातील एक महत्वाचा घटक म्हणजे ‘शब्दांच्या जाती‘. ज्यांनाच इंग्लिश मध्ये part of speech in marathi and english असे म्हटले जाते. शिष्यवृती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये अनेकदा shabdanchya jati marathi grammar आधारित दोन तीन प्रश्न हमखास विचारले जातात.

तर आज आपण अगदी सोप्या भाषेत शब्दांच्या जाती व उदाहरणे parts of speech in marathi with definition and examples pdf अभ्यासणार आहोत.

शब्दांच्या जाती Shabdanchya Jati in Marathi

विद्यार्थ्यांना अनेकदा shabdanchya jati marathi vyakaran शिकण्यास अडथळा येतो. मराठी भाषेत शब्दांचे प्रकार अनेक आहेत त्याचप्रमाणे शब्दांच्या जाती 8 नेमक्या कोणत्या आहे हेच त्यांच्या लक्षात राहत नाही. चला तर मग अगदी सोप्या भाषेत shabdanchya jati meaning समजून घेवूया.

मराठी भाषा ही अनेक अगणित शब्दांपासून बनलेली आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोईस्कर व्हावे म्हणून शब्दांच्या 8 जाती तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द या दोन प्रमुख जाती आहेत.

shabdanchya jati in marathi
shabdanchya jati marathi grammar

अ) विकारी शब्द

वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात, विकारी म्हणजेच बदल घडणारे.

विकारी शब्दांच्या जाती खालीलप्रमाणे:

  • नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद

1. नामाची व्याख्या: प्रत्यक्ष दिसणार्‍या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला व्याकरणात “नाम” असे म्हणतात.

उदा., गोपाल, सिता, अजय, विद्या, सानिल, अस्मिता

अधिक वाचा

2. सर्वनामाची व्याख्या: नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणार्‍या विकारी शब्दाला “सर्वनाम” असे म्हणतात.

उदा., ते, त्यांनी, त्यांना, तो, ती, ते

3. विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणार्‍या शब्दाला “विशेषण” असे म्हणतात.

उदा., चांगला, हिरवा

4. क्रियापद: क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय.

उदा., भारताने क्रिकेट मॅच जिंकली., गाय दूध देते.

अधिक वाचा

आ) अविकारी शब्द

व्याकरणात एकूण 4 अविकारी शब्दांच्या जाती आहेत. त्या खालीलप्रमाणे:

  • क्रियाविशेषण अव्यय
  • शब्दयोगी अव्यय
  • उभयान्वयी अव्यय
  • केवलप्रयोगी अव्यय

1. क्रियाविशेषण अव्यय: क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.

उदा., राधिका मोठयाने बोलते.

2. शब्दयोगी अव्यय: शब्दांना जोडून येणार्‍या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यये म्हणतात. (शब्दयोगी अव्यये स्वतंत्र येत नाहीत. मुळची ही क्रियाविशेषणे असतात आणि शब्दाला जोडून आल्यास शब्दयोगी अव्यये होतात.)

उदा., पक्षी झाडावर बसला.

3. उभयान्वयी अव्यय: उभय म्हणजेच दोन. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा., पहाट झाली आणि रस्त्यावर माणसे धावू लागली.

4. केवलप्रयोगी अव्यय: मनातील आनंदाच्या, दुखाच्या, आश्चर्याच्या, तिरस्काराच्या इ. प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करणार्‍या अविकारी शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा., ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!

Quiz | अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा

Part of Speech in Marathi and English: शब्दांच्या जाती व उदाहरणे आधारित प्रश्नमंजुषा खाली दिली आहे.

Q1. शब्दांच्या एकूण …….. जाती आहेत.

अ)आठ ब)दहा क)बारा ड)तेरा

Q2. नाम, सर्वनाम, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?

अ)विकारी ब)अविकारी क)एकवचनी ड)अनेकवचनी

Q3. योग्य पर्याय निवडा.

  • शब्दाच्या मूळ रुपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय.
  • प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात.

अ)अयोग्य ब)योग्य क)अ आणि ब दोन्ही योग्य

Q4. वाक्यात उपयोग होताना ज्या शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्यास …….. म्हणतात.

अ)प्रत्यय ब)प्रकृती क)परिवर्तन ड)विकार

Q5. अव्यायालाच …….. म्हणतात.

अ)विकारी शब्द ब)पद क)अविकारी ड)शब्द विकृती

Q6. योग्य पर्याय निवडा.

  • विकारी म्हणजेच सव्यय होय.
  • अविकारी म्हणजे अव्यय होय.

अ)दोन्ही योग्य ब)पहिला योग्य क)दोन्ही अयोग्य ड)यापैकी नाही

Q7. जे शब्द मनातील उत्कट भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात?

अ)केवलप्रयोगी अव्यय ब)उभयान्वयी अव्यय क)क्रियाविशेषण अव्यय ड)यापैकी नाही

Q8. वाक्य म्हणजे काय?

अ)अर्थपूर्ण शब्द समूह ब)अर्थपूर्ण अक्षर समूह क)अर्थपूर्ण पद ड)यापैकी नाही

Q9. अक्षर म्हणजे अर्थपूर्ण ……..?

अ)शब्द ब)अक्षर क)वाक्य ड)यापैकी नाही

Q10. योग्य जोड्या लावा.

अ)सर्वणाम- विकारी
ब)क्रियापद- विकारी
क)उभयान्वयी- अविकारी
ड)क्रियाविशेषण- अविकारी

1.अ ब क 2.ब क ड 3.अ ब ड 4.वरील सर्व

उत्तरे– 1(अ), 2(अ), 3(ब), 4(ड), 5(क), 6(अ), 7(अ), 8(अ), 9(अ), 10(4)

सारांश: Shabdanchya Jati Marathi

विद्यार्थ्यांना आता shabdanchya jati marathi vyakaran पुर्णपणे समजला असेलच अशी आम्हाला खात्री आहे. पोलिस भरती, तलाठी भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये शब्दांचे प्रकार, अविकारी शब्दांच्या जाती, नामाची व्याख्या, सर्वनामाची व्याख्या, केवलप्रयोगी अव्यय, अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

त्यामुळे यावर अधिक मजबूत पकड मिळवण्यासाठी तुम्ही shabdanchya jati balasaheb shinde हे पुस्तक वाचू शकता. तसेच या लेखात उपलब्ध करून दिलेल्या शब्दांच्या जाती pdf (parts of speech in marathi with definition and examples pdf) चा वापर करू शकता.

Shabdanchya jati marathi grammar बद्दल तुम्हाला अजूनही काही शंका असल्यास आम्हाला कमेंट करून विचारा.

Leave a Comment