50+ घर दर्शक शब्द | Ghar Darshak Shabd Marathi

Ghar Darshak Shabd: नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या लेखामध्ये घर दर्शक शब्दांचा अभ्यास करणार आहोत.

माणसांच्या घराप्रमाणे प्राण्यांचीही राहण्याची ठिकाणे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वत:च बनवतात तर काहींची घरे नैसर्गिक असतात. त्यांच्या घरांसाठी वेगवेगळी नावे दिलेली आहेत.

प्राण्यांच्या घरांना दिलेल्या या शब्दांनाच घर दर्शक शब्द | Ghar Darshak Shabd असे म्हटले जाते.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणार्‍या विद्यार्थ्यांना Ghar Darshak Shabd माहीत असणे गरजेचे आहे. विशेषत: स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा अश्या अनेक परीक्षेमध्ये घर दर्शक शब्द, पिल्लू दर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द असे प्रश्न विचारले जातात.

चला तर मग आज आपण जाणून घेवूयात: इयत्ता 5वी ते 12 वी सर्व वर्गांसाठी उपयुक्त परीक्षेला येणारे अत्यंत महत्वाचे Ghar Darshak Shabd

घर दर्शक शब्द मराठी | Ghar Darshak Shabd

घर दर्शक शब्द
प्राणी / पक्षीघर दर्शक शब्द
1. पक्ष्यांचे घरटे
2. कोळ्याचे जाळे
3. वाघाची गुहा, डोंगरकपारी
4. गुरांचा गोठा
5. कोंबडीचे खुराडे
6. घुबडाची ढोली
7. सिंहाची गुहा
8. घोड्याचा तबेला, पागा
9. चिमणीचे घरटे
10. मुंग्यांचे वारूळ
11. हत्तीचा अंबारखाना, हत्तीखाना
12. मधमाशांचे पोळे, मोहोल
13. पोपटांचा पिंजरा, ढोली
14. माणसाचे घर
15. कावळ्याचे घरटे
16. उंदराचे बीळ
17. सापाचे वारूळ, बीळ
18. उंटाचे, सांडणी पीलखाना
19. वटवाघूळ पडक्या भिंती
20. माकड झाडावर
21. मासा पाणी
22. सुगरणीचा खोपा
23. कबुतराचे खुराडे
24. कुत्र्याचे कुत्राघर
25. सशाचे बीळ
26. मेंढी मेंढवाडा
27. अस्वलाचे डोंगर कपारी
28. विंचू दगडाच्या फटीत
29. शेळीकोंडवाडा
30. बदक पाणी
31. मोर झाडावर
32. डुक्कर डुक्करवाडा
33. म्हैस गोठा

वाचा >> वाक्य आणि वाक्याचे प्रकार

प्र. 1) प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी निवडा

1. (अ) कोंबडी – जाळे (ब) मधमाशी – पोळे (क) घोडा – गोठा (ड) कोळी – मोहोल

2. (अ) गोठा – उंट (ब) घर – कोंबडी (क) तबेला – घोडा (ड) ढोली – सिंह

3. (अ) कोंबडी – गोठा (ब) घोडा – तबेला (क) मुंग्या – घर (ड) माणूस – घरटे

प्र. 2) चुकीच्या पर्यायाची जोडी निवडा.

1. (अ) पक्षी – घरटे (ब) सिंह – गुहा (क) साप – बीळ (ड) मधमाशी – जाळे

2. (अ) कोंबडी – खुराडे (ब) कोळी – घरटे (क) पोपट – पिंजरा (ड) वाघ – जाळी

3. (अ) साप – वारूळ (ब) मधमाशी – पोळे (क) घुबड – गोठा (ड) ससा – बीळ

4. (अ) वाघ – घरटे (ब) कोळी – जाळे (क) सिंह – गुहा (ड) पोपट – ढोली

घर दर्शक शब्द Quiz

1. सापाच्या घराला …… म्हणतात.
(अ) पिंजरा (ब)तबेला (क) जाळी (ड) बीळ

2. ….. हा प्राणी गुहेत राहतो.
(अ) बैल (ब) सिंह (क) घोडा (ड) हत्ती

3. मधमाशीच्या घराला ….. म्हणतात.
(अ) घरटे (ब) घर (क) मोहोळ (ड) जाळे

4. घुबडाच्या घराला ….. म्हणतात.
(अ) गोठा (ब) ढोली (क) घरटे (ड) पिंजरा

5. आयत्या बिळात राहणारा कोण?
(अ) उंदीर (ब)घूस (क) साप (ड) पाल

6. ढेकूण राहतात ती जागा –
(अ)ढोली (ब) लाकडाच्या / भिंतीची फट (क) बीळ (ड) वारूळ

7. जसा हत्तीचा अंबारखाना तसा घोड्याचा …..
(अ) खुराडा (ब) गोठा (क) पागा (ड) पिंजरा

पुढे वाचा:

निष्कर्ष: Ghar Darshak Shabd Marathi

विद्यार्थ्यांना आता Ghar Darshak Shabd अगदी नीटपणे समजले असतील अशी मला खात्री आहे. दिलेल्या उदाहरणांचा सराव केलात तर तुम्हाला घर दर्शक शब्द विषयावर हमखास पूर्ण गुण मिळतील.

तुम्हाला घर दर्शक शब्द विषयावर लिहिलेला हा पोस्ट कसा वाटला ते आम्हाला खाली कमेन्ट करून नक्की कळवा. तसेच तुमच्या वर्ग मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment